मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

पुढील प्रश्‍नाचे उत्तर सुमारे १५० ते २०० शब्दांत स्पष्ट करा. बुद्धिमापन चाचण्यांचे विविध प्रकार फायद्यांसह स्पष्ट करा. - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील प्रश्‍नाचे उत्तर सुमारे १५० ते २०० शब्दांत स्पष्ट करा.

बुद्धिमापन चाचण्यांचे विविध प्रकार फायद्यांसह स्पष्ट करा.

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

  1. वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या: ज्या बुद्धिमापन चाचण्या एका वेळी केवळ एकाच व्यक्तीला देता येतात, त्या बुद्धिमापन चाचण्यांना वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या म्हणतात. बीने यांची बुद्धिमापन चाचणी, वेश्लर यांची बुद्धिमापन चाचणी, डॉ. भाटीया यांची कृती बुद्धिमापन चाचणी, कोहेस् यांची ब्लॉक डिझाईन टेस्ट इत्यादी वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणे आहेत.
    वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्यांचे फायदे:
    1. मानसशास्त्रज्ञाला चाचणी देणाऱ्या व्यक्तीशी सुसंवाद प्रस्थापित करता येतो.
    2. मानसशास्त्रज्ञाला चाचणी देणाऱ्या व्यक्तीच्या भावना, मनःस्थिती, हावभाव इत्यादींविषयीची अधिक माहिती मिळू शकते.
    3. सामूहिक चाचण्यांच्या तुलनेत वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या सर्जनशील विचारांचे मापन करण्यात अधिक सक्षम असतात.
  2. सामूहिक बुद्धिमापन चाचण्या: ज्या बुद्धिमापन चाचण्या एका वेळी एकाहून अधिक म्हणजेच अनेक व्यक्तींना देता येतात, त्या बुद्धिमापन चाचण्यांना सामूहिक बुद्धिमापन चाचण्या म्हणतात. पहिल्या महायुद्धाच्या काळात सैनिकांची सैन्यात भरती करण्यासाठी सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांचा वापर करण्यात आला. सामूहिक बुद्धिमापन चाचण्या प्रामुख्याने मोठ्या समुदायाच्या बुद्धिमापनासाठी उपयुक्त ठरतात. आर्मी अल्फा टेस्ट, आर्मी जनरल क्लासिफिकेशन टेस्ट, रॅव्हन्स यांची स्टँडर्ड प्रोग्रेसिव्ह मॅट्राइसेस इत्यादी सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणे आहेत.
    सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांचे फायदे:
    1. सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांमध्ये वेळ, पैसा व श्रम यांची बचत होते.
    2. सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांमध्ये चाचणी घेणाऱ्या मानसशास्त्रज्ञाची भूमिका अत्यल्प असते. त्यामुळेया चाचण्या घेण्यासाठी खास प्रशिक्षणाची आवश्यकता असतेच असे नाही.
  3. भाषिक बुद्धिमापन चाचण्या: ज्या बुद्धिमापन चाचण्या बुद्धिमापनासाठी भाषेचा (शब्दांचा किंवा अंकांचा) वापर करतात, त्या बुद्धिमापन चाचण्यांना भाषिक बुद्धिमापन चाचण्या म्हणतात. या चाचण्यांमध्ये चाचणी देणाऱ्या व्यक्तीला चाचणीतील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी भाषेचा वापर करावा लागतो. आर्मी आल्फा टेस्ट, वेश्लर अँडल्ट इंटेलिजन्स स्केल (WAIS) इत्यादी भाषिक बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणे आहेत.
    भाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे फायदे:
    1. भाषिक बुद्धिमापन चाचण्या उच्चस्‍तरीय क्षमतांचे मापन करतात.
    2. या चाचण्या सामान्य व सामान्यापेक्षा जास्‍त बुध्दीच्या व्यक्‍तींमध्ये फरक करू शकतात.
  4. अभाषिक बुद्धिमापन चाचण्या: ज्या बुद्धिमापन चाचण्या बुद्धिमापनासाठी चित्रे, आकृत्या, भौतिक वस्तू इत्यादींचा वापर करतात, परंतु कुठेही भाषेचा वापर केला जात नाही. त्या चाचण्यांना अभाषिक बुद्धिमापन चाचण्या म्हणतात. या चाचण्यांमध्ये चाचणी देणाऱ्या व्यक्तीला चाचणीतील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी भाषेचा वापर करावा लागत नाही. अभाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे (१) कृती चाचणी आणि (२) पेपर-पेन्सिल चाचणी असे दोन प्रकार पडतात. कोह यांची ब्लॉक डिझाईन टेस्ट, अलेक्झांडर यांची पासअलाँग टेस्ट, मेरिल पाल्मर यांची ब्लॉक बिल्डिंग टेस्ट, डॉ. भाटिया यांची अभाषिक बुद्धिमापन चाचणी इत्यादी अभाषिक कृती बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणे आहेत. रॅव्हन्स यांची स्टँडर्ड प्रोग्रेसिव्ह मॅट्राइसेस, रॅव्हन्स यांची कलर प्रोग्रेसिव्ह मॅट्राइसेस, इत्यादी अभाषिक पेपर-पेन्सिल बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणे आहेत.
    अभाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे फायदे:
    1. इतर भाषिक व्यक्तींना, निरक्षर व्यक्तींना आणि लहान मुलांना अभाषिक बुद्धिमापन चाचण्या देता येतात. कृती चाचण्या प्रामुख्याने बौद्धिक अक्षम व्यक्तींच्या बुद्धिमापानासाठी उपयुक्त ठरतात.
    2. अभाषिक बुद्धिमापन चाचण्या संस्कृतीमुक्त असल्यामुळे दुसऱ्या संस्कृतीत वापरता येतात.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×