मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

बुद्धिमत्ता म्हणजे काय? - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

बुद्धिमत्ता म्हणजे काय?

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

मानव हा त्याच्याजवळ असणाऱ्या उच्चतम आणि अद्वितीय बुद्धिमत्तेमुळेच सर्वश्रेष्ठ ठरला आहे. मानवाने त्याच्याजवळ असणाऱ्या बुद्धिमत्तेच्या देणगीवर प्रगतीची नवनवीन क्षेत्रे काबीज केली आहेत. जगाला समजून घेण्यासाठी, तर्कनिष्ठ विचार करण्यासाठी आणि आव्हानांना सामोरे जाताना उपलब्ध संसाधनांचा उपयोग करून घेण्यासाठी वापरली जाणारी व्यापक क्षमता, म्हणजे “बुद्धिमत्ता” होय. विविध मानसशास्त्रज्ञांनी त्यांच्या दृष्टीकोनांनुसार बुद्धिमत्तेच्या निरनिराळ्या व्याख्या दिल्या आहेत.

  1. लेविस टर्मन यांच्या मते, ‘अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय.’
  2. डेव्हिड वेश्लर यांच्या मते, ‘सहेतुक कृती करण्याची, तर्कशुद्ध विचार करण्याची आणि परीवेशाशी प्रभावीपणे जुळवून घेण्याची व्यक्तीची सर्वंकष क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय.’
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×