Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील प्रश्नाचे उत्तर सुमारे १५० ते २०० शब्दांत स्पष्ट करा.
व्यक्तिमत्त्व-मापनाच्या विविध पद्धती स्पष्ट करा.
स्पष्ट करा
Advertisements
उत्तर
मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्व मापनाच्या विविध पद्धती विकसित केल्या. वर्तन विश्लेषण तंत्र, स्व-वृत्त शोधिका, प्रक्षेपण तंत्र आणि मनोविश्लेषण पध्दती या व्यक्तिमत्व मापनाच्या महत्त्वाच्या पद्धती पुढीलप्रमाणे आहेत:
- वर्तन विश्लेषण: मुलाखत, निरीक्षण, यांसारख्या तंत्रांचा समावेश वर्तन विश्लेषणामध्ये केला जातो. या वर्तन विश्लेषण पद्धती पुढीलप्रमाणे आहेत:
- मुलाखत: व्यक्तिमत्व मापनामधील मुलाखत ही सर्वसामान्य पध्दत आहे. मुलाखतीद्वारे मुलाखतकर्ता मुलाखतदात्याला प्रश्न विचारून व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. मुलाखतदात्याने उत्तरे देण्यासाठी घेतलेला वेळ, चेहऱ्यावरील हावभाव, शारीरिक हालचाली इत्यादी बाबीही व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती मिळताना लक्षात घेतल्या जातात.
मुलाखतीचेपुढील दोन मुख्य प्रकार पडतात:
- रचित मुलाखत: रचित मुलाखत हा मुलाखतीचा असा प्रकार आहे ज्यात विचारल्या जाणाऱ्या एकूण प्रश्नांची संख्या, प्रश्नांचा क्रम इत्यादी बाबी पूर्वनियोजित असतात. या मुलाखतीत ऐनवेळी प्रश्न वाढवलेकिंवा कमी केले जात नाहीत. औदयोगिक मानसशास्त्रज्ञ विशिष्ट व्यक्तीची विशिष्ट कामासाठी निवड करताना या मुलाखतीचा वापर करतात.
- अरचित मुलाखत: अरचित मुलाखत हा मुलाखतीचा असा प्रकार आहे ज्यात विचारल्या जाणाऱ्या एकूण प्रश्नांची संख्या, प्रश्नांचा क्रम इत्यादी बाबी पूर्वनियोजित नसतात. या मुलाखतीत मुलाखतदात्याने दिलेल्या प्रतिक्रियांच्या आधारे ऐनवेळी प्रश्न वाढवले किंवा कमी केले जातात. चिकित्सा मानसशास्त्रज्ञ, सहमंत्रण मानसशास्त्रज्ञ, आरोग्य मानसशास्त्रज्ञ, क्रीडा मानसशास्त्रज्ञ त्यांच्या लाभार्थीच्या व्यक्तिमत्त्वाची सखोल माहिती मिळवण्यासाठी या मुलाखतीचा वापर करतात.
- निरीक्षण: विविध परिस्थितीमध्ये व्यक्तीचेनिरीक्षण करणेही व्यक्तिमत्त्व मापनातील एक महत्त्वाची पध्दत आहे. उदाहरणार्थ जेव्हा शाळेत शिक्षक वर्गात नसतांना विद्यार्थी कसे वागतात किंवा कारखान्यातील कामगार समोर कोणी देखरेख करणारा नाही अशा वेळेस कसेवागतील याचेनिरीक्षण मानसशास्त्रज्ञ करू शकतात. निरीक्षण हे प्रशिक्षित निरीक्षकाने, विशिष्ट हेतूने व विशिष्ट तत्वांचा आधार घेऊन केले असता अधिक उपयुक्त ठरते. व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती मिळवण्यासाठी नैसर्गिक निरीक्षण, नियंत्रित निरीक्षण, सहभागी निरीक्षण, असहभागी निरीक्षण इत्यादी निरीक्षणाचे प्रकार उपयुक्त ठरतात.
- मुलाखत: व्यक्तिमत्व मापनामधील मुलाखत ही सर्वसामान्य पध्दत आहे. मुलाखतीद्वारे मुलाखतकर्ता मुलाखतदात्याला प्रश्न विचारून व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. मुलाखतदात्याने उत्तरे देण्यासाठी घेतलेला वेळ, चेहऱ्यावरील हावभाव, शारीरिक हालचाली इत्यादी बाबीही व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती मिळताना लक्षात घेतल्या जातात.
- स्ववृत्त तंत्र: स्व-वृत्त शोधिकेद्वारे व्यक्ती स्व-वृत्त शोधिकेतील प्रश्न/विधाने यांना स्वतः प्रतिक्रिया देऊन स्वतःविषयी माहिती पुरवते. मिनेसोटा बहू अवस्था व्यक्तिमत्व शोधिका (MMPI), कॅटेल यांची १६ व्यक्तिमत्व घटक (16 P F), मेयर ब्रिज टाप इंडिकेटर (MBTI), हायस्कुल व्यक्तिमत्त्व शोधिका (HSPQ) इत्यादी स्व वृत्त शोधिकांची उदाहरणे आहेत.
- प्रक्षेपण तंत्र: प्रक्षेपण तंत्र मनोविश्लेषणवादाच्या अभ्यासातून उदयास आले आहे. अबोध पातळीवर दमित केलेल्या भावना, इच्छा आणि संघर्ष यांचा शोध घेण्यासाठी प्रक्षेपण तंत्र उपयुक्त ठरते. प्रक्षेपण तंत्रांमध्ये व्यक्ती संदिग्ध व अरचित साहित्याला मुक्तपणे प्रतिक्रिया देत असते. प्रतिक्रिया देताना व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित वैयक्तिक संघर्ष, प्रेरणा, समस्या सोडवण्याच्या पद्धती व इतर अनेक बाबी संदिग्ध व अरचित साहित्यावर प्रक्षेपित करते. प्रक्षेपण तंत्रातील प्रमुख चाचण्या खालील प्रमाणे आहेत.
- रोर्शा शाईच्या डागाची चाचणी: ही चाचणी हर्मन रोर्शा यांनी १९२१ साली विकसित केली. यामध्ये शाईच्या डागाचे १० कार्ड असतात. (पाच कृष्णधवल आणि पाच रंगीत) यामध्ये प्रयुक्ताला एकावेळी एक कार्ड दाखवले जाते आणि त्यात त्याला काय दिसते हे विचारले जाते. प्रयुक्ताला कशाही प्रकारे ते कार्ड हाताळण्याची मुभा असते. प्रयक्तु ते कार्ड उलटे सुलटे कसेही करू शकतो. या चाचणीच विश्लेषण करण्यासाठी उच्च दर्जाच्या प्रशिक्षकाची गरज असते.
- कथावस्तू आसंवेदन चाचणी: १९३५ मध्ये मॉर्गन आणि मरे यांनी ही चाचणी विकसित केली. या चाचणीमध्ये चित्र असलेली कार्डस् प्रयुक्ताला निरीक्षणासाठी दिले जातात . प्रत्येक कार्डवर एक किंवा अनेक व्यक्तींची वेगवेगळ्या परिस्थितीतील चित्र असतात. आणि त्यातील त्या कार्डवर असलेल्या परिस्थितीवर आधारित गोष्ट प्रयुक्ताला लिहिण्यास सांगितले जाते व त्यासाठी अशी परिस्थिती का निर्माण झाली, आत्ता नेमके काय होत आहे आणि त्याचे परिणाम काय होतील इत्यादी संदर्भ दिले जातात.
- वाक्यपूर्ती चाचणी: या चाचणीमध्ये अनेक अपूर्ण वाक्यांचा वापर केला जातो. व्यक्तीला उरलेला भाग पूर्ण करावा लागतो. उदाहरणार्थ. मला चिंता वाटते जेव्हा मी...
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Board Paper
