HSC Arts (Marathi Medium)
Academic Year: 2024-2025
Date & Time: 8th July 2025, 11:00 am
Duration: 3h
Advertisements
सूचना:
- सर्व प्रश्न सोडवणे अत्यावश्यक आहे.
- प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे आकृत्या/आलेख काढावेत.
- रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे.
- नकाशा स्टेन्सिल्सचा वापर करण्यास परवानगी आहे.
- उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात.
- आलेख पुरवणी व नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडाव्यात.
‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ स्तंभातील सहसंबंध ओळखून साखळी पूर्ण करा:
| ‘अ’ स्तंभ | ‘ब’ स्तंभ | ‘क’ स्तंभ |
| (१) बर्फाच्छादित प्रदेश | (क) देशाची राजधानी | (य) हानिकारक शेती प्रकार |
| (२) प्रशासकीय शहर | (ख) कृत्रिम उपग्रह | (र) विरळ लोकसंख्या |
| (३) स्थलांतरित शेती | (ग) मानवी श्रमाचा वापर | (ल) संदेशवहन |
| (४) गृह उद्योग | (घ) ध्रुवीय प्रदेश | (व) विणकर |
| (५) जागतिक स्थान-निश्चिती प्रणाली | (ड) शेतीचा आकार खूप लहान | (श) टोकियो |
Chapter:
लोकसंख्या बदलातील महत्त्वाचा घटक ______.
साक्षरता
लिंग गुणोत्तर
जन्मदर
वयोरचना
Chapter:
ग्रामीण भूमी उपयोजन ______.
औद्योगिक
व्यापार
मनोरंजन
वने
Chapter:
विस्तृत व्यापारी शेतीची वैशिष्ट्ये ______.
एक-पीक पद्धती, पाण्याचा वापर, उष्णकटिबंध, धान्य पिके
एक-पीक पद्धती, यंत्रांचा वापर, समशीतोष्ण कटिबंध, अन्नधान्य पिके
एक पीक पद्धती, मानवी श्रमाचा वापर, विषुववृत्तीय प्रदेश, उद्यान शेती
एक-पीक पद्धती, शास्त्रीय ज्ञानाचा वापर, उपोष्ण कटिबंध, डाळी उत्पादन
Chapter:
खनिजांवर आधारित उद्योग ______.
लोह-पोलाद उद्योग
कापड उद्योग
साखर उद्योग
अन्नप्रक्रिया उद्योग
Chapter:
तृतीयक व्यवसाय ______.
शेती
मालवाहतूक
मधनिर्मिती
पेट्रोकेमिकल्स उद्योग
Chapter:
पुढील विधान ‘बरोबर’ की ‘चूक’ ते लिहा:
लोकसंख्येच्या प्रमाणात कार्यशील गटाचे प्रमाण जास्त असेल तर आर्थिक विकासाची शक्यता जास्त असते.
Chapter:
पुढील विधान ‘बरोबर’ की ‘चूक’ ते लिहा:
तृतीयक व्यवसाय हे अनुत्पादक व्यवसाय आहेत.
Chapter:
पुढील विधान ‘बरोबर’ की ‘चूक’ ते लिहा:
आफ्रिकेच्या कलहारी वाळवंटात ‘एस्किमो’ जमातीचे लोक आढळतात.
Chapter:
पुढील विधान ‘बरोबर’ की ‘चूक’ ते लिहा:
साक्षरतेची व्याख्या देशानुसार बदलते.
Chapter:
पुढील विधान ‘बरोबर’ की ‘चूक’ ते लिहा:
मानवी वस्तीच्या स्थानावर प्राकृतिक घटकांचा परिणाम होत नाही.
Chapter:
A: लोकसंख्येच्या मनोऱ्यात रुंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवते.
R: लोकसंख्या मनोऱ्याचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे द्योतक आहे.
केवळ A बरोबर आहे.
केवळ R बरोबर आहे.
A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
Chapter: [2] लोकसंख्या - भाग २
Advertisements
पुढील नागरी वस्तींचा लोकसंख्येनुसार चढता क्रम लावा:
(अ) महानगर
(ब) उपनगर
(क) नगर
(ड) महाकाय नगर
Chapter:
अचूक गट ओळखा:
- समाजशास्त्र
- राज्यशास्त्र
- अर्थशास्त्र
- लोकसंख्याशास्त्र
- सामाजिक भूगोल
- राजकीय भूगोल
- आर्थिक भूगोल
- मृदा भूगोल
- हवामानशास्त्र
- जीवशास्त्र
- भूगर्भशास्त्र
- सुदूर संवेदन
- इतिहास
- भूरूपशास्त्र
- मानसशास्त्र
- लोकसंख्याशास्त्र
Chapter:
भांडवल गुंतवणुकीनुसार उदयोगांचे प्रकार चढत्या क्रमाने लिहा:
(अ) मध्यम उद्योग
(ब) लघू उद्योग
(क) मोठे उद्योग
(ड) सूक्ष्म उदयोग
Chapter:
पुढील विधानाचे भौगोलिक कारणे लिहा:
हवामान या घटकाचा लोकसंख्या वितरणावर परिणाम होतो.
Chapter:
खालील विधानाचे भौगोलिक कारणे लिहा.
लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते.
Chapter: [2] लोकसंख्या - भाग २
भौगोलिक कारणे दया.
भारतातील छोट्या नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे.
Chapter: [4] प्राथमिक आर्थिक क्रिया
प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो.
Chapter: [7] प्रदेश आणि प्रादेशिक विकास
पुढील विधानाचे भौगोलिक कारणे लिहा:
भूगोलाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.
Chapter:
विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा प्रकार आहे.
Chapter: [4] प्राथमिक आर्थिक क्रिया
फरक सांगा.
विषुववृत्तीय वनांतील लाकूडतोड व समशीतोष्ण वनातील लाकूडतोड
Chapter: [4] प्राथमिक आर्थिक क्रिया
पुढील फरक स्पष्ट करा:
लोकसंख्या संक्रमणाचा पहिला टप्पा व लोकसंख्या संक्रमणाचा पाचवा टप्पा.
Chapter:
फरक स्पष्ट करा.
जलवाहतूक व हवाई वाहतूक.
Chapter: [6] तृतीयक आर्थिक क्रिया
फरक स्पष्ट करा.
प्राकृतिक प्रदेश व राजकीय प्रदेश
Chapter: [7] प्रदेश आणि प्रादेशिक विकास
Advertisements
फरक स्पष्ट करा.
निसर्गवाद आणि संभाव्यवाद.
Chapter: [8] भूगोल : स्वरूप व व्याप्ती
तुम्हांस दिलेल्या जगाच्या नकाशा आराखड्यामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या साहाय्याने दाखवा आणि सूची तयार करा:
- सर्वांत कमी लोकसंख्येचा खंड.
- स्थलांतरितांचे आकर्षण असणारे भारतातील एक शहर - मुंबई.
- सर्वाधिक आयुर्मानाचा देश - जपान.
- प्रशासकीय शहर - मॉस्को.
- लंडन - न्यूयॉर्क हवाई मार्ग.
- सुएझ कालवा.
- दक्षिण अमेरिकेतील व्यापारी पशुपालनाचे क्षेत्र - पंपास.
- दक्षिण आफ्रिकेतील एक औद्योगिक प्रदेश - किंबर्ले-वीटवॉटरसँड.
Chapter:
दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा:

प्रश्न:
- नकाशा काय दर्शवतो?
- पर्थ आणि सिडनी हे औद्योगिक प्रदेश कोणत्या खंडात आढळतात?
- संयुक्त संस्थानांतील औद्योगिक प्रदेशाचे नाव लिहा.
- कोणत्या खंडात औद्योगिक विकास कमी झालेला दिसतो?
- ओसाका, कोबे आणि क्योटो औद्योगिक प्रदेश कोणत्या देशात आढळतात?
Chapter:
पुढील विषयावर संक्षिप्त टिप लिहा:
ग्रामीण भूमी उपयोजन.
Chapter:
पुढील विषयावर संक्षिप्त टिप लिहा:
मासेमारी व्यवसायावर परिणाम करणारे घटक.
Chapter:
खालील संक्षिप्त टिप लिहा:
संदेशवहनातील कृत्रिम उपग्रहांचे महत्त्व.
Chapter: [6] तृतीयक आर्थिक क्रिया
पुढील विषयावर संक्षिप्त टिप लिहा:
भारतातील प्रादेशिक विषमता कारणे.
Chapter:
भूगोलाचे स्वरूप सविस्तर स्पष्ट करा.
Chapter: [8] भूगोल : स्वरूप व व्याप्ती
पुढील उताऱ्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा:
|
वयोरचना लोकसंख्येच्या वयोरचनेचे तीन मूलभूत घटक आहेत. यामध्ये जन्मदर, मृत्युदर आणि स्थलांतर यांचा समावेश होतो. क्लार्क (१९७२) च्या मते वय संरचनेचे हे तीन घटक परस्पर अवलंबित आहेत. यांपैकी एकामध्ये कोणताही बदल इतर दोनवर परिणाम करू शकतो. या परिवर्तनाद्वारे सामाजिक-आर्थिक परिस्थिती वयाच्या संरचनेवर प्रभाव टाकतात. जन्मदर हा वेगवेगळ्या वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण ठरवतो. म्हणूनच लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि आशियातील देश ज्यांना उच्च जन्मदराने वैशिष्ट्यीकृत केले आहे, तरुण वयोगटामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतात. या खंडातील बहुतेक देशांमध्ये लोकसंख्येच्या सुमारे दोन पंचमांश लोक १५ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. २००१ च्या जनगणनेनुसार भारतातील ३६% लोकसंख्या १५ वर्षांपेक्षा कमी आहे. याउलट कमी जन्मदर आणि दीर्घ आयुर्मान असलेल्या देशांमध्ये त्यांच्या लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश लोकसंख्या तरुण वयोगटामध्ये आहे; परंतु या देशातील वृद्ध वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण तुलनेने मोठे आहे. वायव्य युरोप आणि उत्तर अमेरिकेतील बहुतेक देश, सी.आय. एस देश, ऑस्ट्रेलिया आणि जपान या श्रेणीतील आहेत. प्रजननक्षमतेमध्ये सतत खालच्या दिशेने जाणारा कल वृद्ध वयोगटातील लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ होण्यास हातभार लावतो. |
प्रश्न:
- लोकसंख्या वयोरचनेचे मूलभूत घटक कोणते?
- कोणत्या खंडामध्ये तरुण वयोगटाची लोकसंख्या जास्त आहे?
- २००१ च्या जनगणनेनुसार भारतातील १५ वर्षांपेक्षा कमी वयोगटाची किती टक्के लोकसंख्या आहे?
- वृद्ध वयोगटातील लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ होण्यास कोणता घटक हातभार लावतो?
Chapter:
आकृती काढून नावे द्या:
संदेशवहन या तृतीयक आर्थिक क्रियेचे वर्गीकरण.
Chapter:
आकृती काढून नावे द्या:
प्रादेशिक असंतुलन कमी करण्यासाठी पायाभूत सुविधा आणि उत्तेजनाच्या तरतुदींचा तक्ता.
Chapter:
लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक स्पष्ट करा.
Chapter:
कच्च्या मालाच्या स्रोतानुसार उदयोगांचे वर्गीकरण करून सविस्तर माहिती लिहा.
Chapter:
Other Solutions
Submit Question Paper
Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help studentsonly jpg, png and pdf files
Maharashtra State Board previous year question papers 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Geography [भूगोल] with solutions 2024 - 2025
Previous year Question paper for Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] -2025 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
By referring the question paper Solutions for Geography [भूगोल], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी].
How Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Geography [भूगोल] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
