Advertisements
Advertisements
Questions
फरक सांगा.
विषुववृत्तीय वनांतील लाकूडतोड व समशीतोष्ण वनातील लाकूडतोड
पुढील फरक स्पष्ट करा:
विषुववृत्तीय वनांतील लाकूडतोड व समशीतोष्ण वनांतील लाकूडतोड.
Distinguish Between
Advertisements
Solution 1
| अ. क्र. | विषुववृत्तीय वनातील लाकूडतोड | समशीतोष्ण वनातील लाकूडतोड |
| (१) | विषुववृत्तीय वने ही घनदाट वने आहेत. | समशीतोष्ण वनातील झाडांची संख्या ही तुलनेने कमी असते आणि ही वने विरळ आहेत. |
| (२) | या वनातील झाडांची उंची खूप जास्त असते. | या वनातील झाडे सरळ आणि उंच वाढतात. |
| (३) | या वनातील झाडांचे लाकूड अतिशय टणक असते. | या वनातील झाडांचे लाकूड हे मऊ असते. |
| (४) | या वनांमध्ये विविध प्रकारची झाडे एकत्रितरीत्या वाढतात. | या लाकडाचा उपयोग फर्निचर निर्मिती आणि कागदाचा लगदा निर्मिती उदयोगात होतो. |
| (५) | त्यामुळे आर्थिकदृष्ट्या उपयुक्त झाडाची नेमकी निवड करण्यास सुलभ जाते. | त्यामुळे या वनांमधील लाकडाला खूप मागणी आहे. |
| (६) | दाट वने, दलदलीचा प्रदेश यांमुळे येथे वाहतुकीच्या सेवा-सुविधा उपलब्ध नाहीत. | वनातील झाडांची घनता कमी असल्यामुळे येथील वाहतूक सुगमता जास्त आहे. |
| (७) | तसेच हवामानही खूप रोगट आहे. | या प्रदेशात हवामान आल्हाददायक असते. |
| (८) | विषुववृत्तीय वनात लाकूडतोड व्यवसाय अविकसित आहे. | त्यामुळे समशीतोष्ण कटिबंधीय वनात व्यापारी तत्त्वावर आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि यंत्रसामग्रीचा वापर करून लाकूडतोड केली जाते. |
shaalaa.com
Solution 2
| अ. क्र. | विषुववृत्तीय वनांतील लाकूडतोड | समशीतोष्ण वनांतील लाकूडतोड |
| १. | विषुववृत्तीय वनांत लाकूडतोड करण्यावर फार मर्यादा येतात. | समशीतोष्ण वनांतील लाकूडतोड खूप मोठ्या प्रमाणावर व्यापारी तत्त्वावर केली जाते. |
| २. | विषुववृत्तीय वनांच्या प्रदेशात लाकूडतोड पारंपरिक पद्धतीने केली जाते. | समशीतोष्ण वनांतील प्रदेशात लाकूडतोड आधुनिक तंत्रांच्या मदतीने केली जाते. |
| ३. | उष्ण, दमट व रोगट हवामान, दुर्गम असा घनदाट वनांचा प्रदेश, कीटकांचा व जंगलातील सरपटणाऱ्या प्राण्यांचा जास्त धोका इत्यादी प्रतिकूल अशा घटकांमुळे विषुववृत्तीय वनांमध्ये लाकूडतोड मर्यादित स्वरूपाची पाहावयास मिळते. | आल्हाददायक हवामान, वन प्रदेशांची सुगमता, कीटक व जंगलात सरपटणाऱ्या प्राण्यांचा कमी धोका अशा अनुकूल घटकांमुळे समशीतोष्ण वनांच्या प्रदेशात लाकूडतोड मोठ्या प्रमाणावर होते. |
| ४. | विषुववृत्तीय वनांच्या प्रदेशांत बहुतेक झाडे उंच असून लाकूड अत्यंत कडक असते व कडक लाकडाला तुलनेने मागणी कमी असते, म्हणून विषुववृत्तीय वन प्रदेशांत लाकूडतोड कमी विकसित पाहावयास मिळते. | समशीतोष्ण वनांतील प्रदेशांत झाडे तुलनेने कमी उंचीची असतात व लाकूड मऊ स्वरूपाचे असते. मऊ लाकडाला तुलनेने जास्त मागणी असल्यामुळे समशीतोष्ण वन प्रदेशांत लाकूडतोड चांगल्या प्रमाणात विकसित झाली आहे. |
shaalaa.com
प्राथमिक व्यवसाय - लाकूडतोड
Is there an error in this question or solution?
