हिंदी

फरक सांगा. विषुववृत्तीय वनांतील लाकूडतोड व समशीतोष्ण वनातील लाकूडतोड - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक सांगा.

विषुववृत्तीय वनांतील लाकूडतोड व समशीतोष्ण वनातील लाकूडतोड

पुढील फरक स्पष्ट करा:

विषुववृत्तीय वनांतील लाकूडतोड व समशीतोष्ण वनांतील लाकूडतोड.

अंतर स्पष्ट करें
Advertisements

उत्तर १

अ. क्र. विषुववृत्तीय वनातील लाकूडतोड समशीतोष्ण वनातील लाकूडतोड
(१) विषुववृत्तीय वने ही घनदाट वने आहेत. समशीतोष्ण वनातील झाडांची संख्या ही तुलनेने कमी असते आणि ही वने विरळ आहेत.
(२)  या वनातील झाडांची उंची खूप जास्त असते. या वनातील झाडे सरळ आणि उंच वाढतात.
(३) या वनातील झाडांचे लाकूड अतिशय टणक असते. या वनातील झाडांचे लाकूड हे मऊ असते.
(४)  या वनांमध्ये विविध प्रकारची झाडे एकत्रितरीत्या वाढतात. या लाकडाचा उपयोग फर्निचर निर्मिती आणि कागदाचा लगदा निर्मिती उदयोगात होतो.
(५) त्यामुळे आर्थिकदृष्ट्या उपयुक्त झाडाची नेमकी निवड करण्यास सुलभ जाते. त्यामुळे या वनांमधील लाकडाला खूप मागणी आहे.
(६)  दाट वने, दलदलीचा प्रदेश यांमुळे येथे वाहतुकीच्या सेवा-सुविधा उपलब्ध नाहीत. वनातील झाडांची घनता कमी असल्यामुळे येथील वाहतूक सुगमता जास्त आहे.
(७)  तसेच हवामानही खूप रोगट आहे. या प्रदेशात हवामान आल्हाददायक असते.
(८)  विषुववृत्तीय वनात लाकूडतोड व्यवसाय अविकसित आहे. त्यामुळे समशीतोष्ण कटिबंधीय वनात व्यापारी तत्त्वावर आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि यंत्रसामग्रीचा वापर करून लाकूडतोड केली जाते.
shaalaa.com

उत्तर २

अ. क्र. विषुववृत्तीय वनांतील लाकूडतोड समशीतोष्ण वनांतील लाकूडतोड
१. विषुववृत्तीय वनांत लाकूडतोड करण्यावर फार मर्यादा येतात. समशीतोष्ण वनांतील लाकूडतोड खूप मोठ्या प्रमाणावर व्यापारी तत्त्वावर केली जाते.
२. विषुववृत्तीय वनांच्या प्रदेशात लाकूडतोड पारंपरिक पद्धतीने केली जाते. समशीतोष्ण वनांतील प्रदेशात लाकूडतोड आधुनिक तंत्रांच्या मदतीने केली जाते.
३. उष्ण, दमट व रोगट हवामान, दुर्गम असा घनदाट वनांचा प्रदेश, कीटकांचा व जंगलातील सरपटणाऱ्या प्राण्यांचा जास्त धोका इत्यादी प्रतिकूल अशा घटकांमुळे विषुववृत्तीय वनांमध्ये लाकूडतोड मर्यादित स्वरूपाची पाहावयास मिळते. आल्हाददायक हवामान, वन प्रदेशांची सुगमता, कीटक व जंगलात सरपटणाऱ्या प्राण्यांचा कमी धोका अशा अनुकूल घटकांमुळे समशीतोष्ण वनांच्या प्रदेशात लाकूडतोड मोठ्या प्रमाणावर होते.
४. विषुववृत्तीय वनांच्या प्रदेशांत बहुतेक झाडे उंच असून लाकूड अत्यंत कडक असते व कडक लाकडाला तुलनेने मागणी कमी असते, म्हणून विषुववृत्तीय वन प्रदेशांत लाकूडतोड कमी विकसित पाहावयास मिळते. समशीतोष्ण वनांतील प्रदेशांत झाडे तुलनेने कमी उंचीची असतात व लाकूड मऊ स्वरूपाचे असते. मऊ लाकडाला तुलनेने जास्त मागणी असल्यामुळे समशीतोष्ण वन प्रदेशांत लाकूडतोड चांगल्या प्रमाणात विकसित झाली आहे.
shaalaa.com
प्राथमिक व्यवसाय - लाकूडतोड
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: प्राथमिक आर्थिक क्रिया - स्वाध्याय [पृष्ठ ४१]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
अध्याय 4 प्राथमिक आर्थिक क्रिया
स्वाध्याय | Q ५. १) | पृष्ठ ४१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×