English

भौगोलिक कारणे दया. भारतातील छोट्या नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे.

Advertisements
Advertisements

Questions

भौगोलिक कारणे दया.

भारतातील छोट्या नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे.

पुढील विधानाचे भौगोलिक कारणे लिहा:

भारतातील छोटा नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे.

Give Reasons
Advertisements

Solution 1

खाणकाम ही प्रमुख प्राथमिक आर्थिक क्रिया असून निसर्गाशी निगडीत आहे. भारतातील छोटा नागपूर पठार हे खनिज संपन्न प्रदेश म्हणून ओळखले जातो. या क्षेत्रात दगडी कोळसा, लोहखनिज, लाकूडतोड, अभ्रक, जिप्सम अशा प्रकारचे अनेक धातू व अधातू खनिजांचे  साठे आहेत. भारतात दिवसेंदिवस औद्योगिकरण वाढत असून कच्चा माल म्हणून खनिजांना मागणी आहे. या शिवाय खाणकाम व्यवसायाबाबत शासकीय धोरण पोषक असून भांडवल, वाहतुकीचे जाळे, मजूर पुरवठा, तंत्रज्ञान या सर्व गोष्टी अनुकूल असल्याने भारतातील छोट्या नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे.

shaalaa.com

Solution 2

  1. भारतीय पठाराचा भाग असलेल्या छोटा नागपूर पठारामध्ये झारखंड, ओडिशा, बिहार आणि आसामचा समावेश होतो. या भागात लोहखनिज आणि कोळसा ही खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात.
  2. छोटा नागपूर पठारी प्रदेशात खाणकामासाठी पुरेसे मजूर सहज उपलब्ध आहेत.
  3. छोटा नागपूर पठारामध्ये पाण्याची उपलब्धता आणि वाहतुकीच्या सोयी यांसारख्या अनुकूल घटकांमुळे येथे खाणकाम व्यवसायाचा मोठा विकास झाला आहे.

यामुळे भारतातील छोटा नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे.

shaalaa.com
प्राथमिक व्यवसाय - खाणकाम
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: प्राथमिक आर्थिक क्रिया - स्वाध्याय [Page 41]

APPEARS IN

Balbharati Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 4 प्राथमिक आर्थिक क्रिया
स्वाध्याय | Q ४. २) | Page 41
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×