Advertisements
Advertisements
प्रश्न
भौगोलिक कारणे दया.
भारतातील छोट्या नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे.
पुढील विधानाचे भौगोलिक कारणे लिहा:
भारतातील छोटा नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे.
Advertisements
उत्तर १
खाणकाम ही प्रमुख प्राथमिक आर्थिक क्रिया असून निसर्गाशी निगडीत आहे. भारतातील छोटा नागपूर पठार हे खनिज संपन्न प्रदेश म्हणून ओळखले जातो. या क्षेत्रात दगडी कोळसा, लोहखनिज, लाकूडतोड, अभ्रक, जिप्सम अशा प्रकारचे अनेक धातू व अधातू खनिजांचे साठे आहेत. भारतात दिवसेंदिवस औद्योगिकरण वाढत असून कच्चा माल म्हणून खनिजांना मागणी आहे. या शिवाय खाणकाम व्यवसायाबाबत शासकीय धोरण पोषक असून भांडवल, वाहतुकीचे जाळे, मजूर पुरवठा, तंत्रज्ञान या सर्व गोष्टी अनुकूल असल्याने भारतातील छोट्या नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे.
उत्तर २
- भारतीय पठाराचा भाग असलेल्या छोटा नागपूर पठारामध्ये झारखंड, ओडिशा, बिहार आणि आसामचा समावेश होतो. या भागात लोहखनिज आणि कोळसा ही खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात.
- छोटा नागपूर पठारी प्रदेशात खाणकामासाठी पुरेसे मजूर सहज उपलब्ध आहेत.
- छोटा नागपूर पठारामध्ये पाण्याची उपलब्धता आणि वाहतुकीच्या सोयी यांसारख्या अनुकूल घटकांमुळे येथे खाणकाम व्यवसायाचा मोठा विकास झाला आहे.
यामुळे भारतातील छोटा नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे.
