Advertisements
Advertisements
Question
पुढील उताऱ्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा:
|
वयोरचना लोकसंख्येच्या वयोरचनेचे तीन मूलभूत घटक आहेत. यामध्ये जन्मदर, मृत्युदर आणि स्थलांतर यांचा समावेश होतो. क्लार्क (१९७२) च्या मते वय संरचनेचे हे तीन घटक परस्पर अवलंबित आहेत. यांपैकी एकामध्ये कोणताही बदल इतर दोनवर परिणाम करू शकतो. या परिवर्तनाद्वारे सामाजिक-आर्थिक परिस्थिती वयाच्या संरचनेवर प्रभाव टाकतात. जन्मदर हा वेगवेगळ्या वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण ठरवतो. म्हणूनच लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि आशियातील देश ज्यांना उच्च जन्मदराने वैशिष्ट्यीकृत केले आहे, तरुण वयोगटामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतात. या खंडातील बहुतेक देशांमध्ये लोकसंख्येच्या सुमारे दोन पंचमांश लोक १५ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. २००१ च्या जनगणनेनुसार भारतातील ३६% लोकसंख्या १५ वर्षांपेक्षा कमी आहे. याउलट कमी जन्मदर आणि दीर्घ आयुर्मान असलेल्या देशांमध्ये त्यांच्या लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश लोकसंख्या तरुण वयोगटामध्ये आहे; परंतु या देशातील वृद्ध वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण तुलनेने मोठे आहे. वायव्य युरोप आणि उत्तर अमेरिकेतील बहुतेक देश, सी.आय. एस देश, ऑस्ट्रेलिया आणि जपान या श्रेणीतील आहेत. प्रजननक्षमतेमध्ये सतत खालच्या दिशेने जाणारा कल वृद्ध वयोगटातील लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ होण्यास हातभार लावतो. |
प्रश्न:
- लोकसंख्या वयोरचनेचे मूलभूत घटक कोणते?
- कोणत्या खंडामध्ये तरुण वयोगटाची लोकसंख्या जास्त आहे?
- २००१ च्या जनगणनेनुसार भारतातील १५ वर्षांपेक्षा कमी वयोगटाची किती टक्के लोकसंख्या आहे?
- वृद्ध वयोगटातील लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ होण्यास कोणता घटक हातभार लावतो?
Advertisements
Solution
- जन्मदर, मृत्युदर व स्थलांतर हे लोकसंख्या वयोरचनेचे मूलभूत घटक आहेत.
- लॅटिन अमेरिका, आशिया आणि आफ्रिका या खंडांमध्ये तरुण वयोगटाची संख्या जास्त आहे.
- २००१ च्या जनगणनेनुसार भारतातील १५ वर्षांपेक्षा कमी वयोगटाची ३६% लोकसंख्या आहे.
- प्रजनन क्षमतेमध्ये सतत खालच्या दिशेने जाणारा कल या घटकामुळे वृद्ध वयोगटातील लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ होण्यास हातभार लागतो.
