English

मुकुंदजवळ सागरपेक्षा 50 रुपये अधिक आहेत. त्यांच्याजवळील रकमांचा गुणाकार 15,000 असेल, तर प्रत्येकाजवळील रक्कम किती?

Advertisements
Advertisements

Question

मुकुंदजवळ सागरपेक्षा 50 रुपये अधिक आहेत. त्यांच्याजवळील रकमांचा गुणाकार 15,000 असेल, तर प्रत्येकाजवळील रक्कम किती?

Sum
Advertisements

Solution

समजा, सागरजवळील रक्कम ₹ x आहे.

∴ मुकुंदजवळील रक्कम = ₹ (x + 50)

दिलेल्या अटीनुसार, त्यांच्याजवळील रकमांचा गुणाकार 15,000 आहे.

x(x + 50) = 15000

∴ x2 + 50x - 15000 = 0

∴ x2 + 150x - 100x - 15000 = 0 ....`[(-15000 = 150; -100),(150 xx - 100 = - 15000),(150 - 100 = 50)]`

∴ x(x + 150) - 100(x + 150) = 0

∴ (x + 150)(x - 100) = 0

जर दोन संख्यांचा गुणाकार शून्य असेल, तर त्या दोन संख्यांपैकी किमान एक संख्या शून्य असते. हा गुणधर्म वापरून

∴ x + 150 = 0  किंवा  x – 100 = 0

∴ x = - 150  किंवा  x = 100

परंतु, रक्कम कधीही ऋण नसते.

∴ x = 100  आणि  x + 50 = 100 + 50 = 150

∴ सागर व मुकुंदजवळील रक्कम अनुक्रमे ₹ 100 व ₹ 150 आहे.

shaalaa.com
वर्गसमीकरणाचे उपयोजन
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: वर्गसमीकरणे - संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 [Page 54]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2 वर्गसमीकरणे
संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 | Q 11. | Page 54
SCERT Maharashtra Bijganit (Ganit 1) [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2 वर्गसमीकरणे
Q ३ ब) | Q २)

RELATED QUESTIONS

प्रगतीच्या 2 वर्षांपूर्वीच्या आणि 3 वर्षांनंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काढा.


दोन क्रमागत सम नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज 244 आहे, तर त्या संख्या शोधा.


विवेक, हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज `1/6` आहे, तर त्यांची आजची वये काढा.


श्री. मधुसूदन यांच्या संत्राबागेत आडव्या रांगेतील झाडांची संख्या, उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे. जर संत्राबागेत एकूण 150 झाडे असतील, तर आडव्या तसेच उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती? खालील प्रवाहआकृतीच्या आधारे उदाहरण सोडवा.


सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले. दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गाइतकी आहे, तर त्याचे पहिल्या चाचणीतील गुण किती?


460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक येत असून बाकी 1 येते, तर भागाकार व भाजक किती?


समलंब मध्ये `square`ABCD मध्ये AB || CD असून त्याचे क्षेत्रफळ 33 चौसेमी आहे, तर आकृतीतील दिलेल्या माहितीवरून चौकोनाच्या चारही बाजूंची लांबी खालील कृती पूर्ण करून काढा.

उकल:

`square`ABCD समलंब चौकोन आहे. AB || CD

`"A"(square "ABCD") = 1/2 xx ("AB" + "CD") xx square`

∴ `33 = 1/2(x + 2x + 1) xx square`

∴ `square` = (3x + 1) × `square`

∴ 3x+ `square` - `square` = 0

∴ 3x (____) + 10 (____) = 0 

∴ (3x + 10)(_____) = 0

∴ (3x + 10) = 0  किंवा  `square` = 0

∴ x = `- 10/3` किंवा x = `square`

परंतु, लांबी ऋण नसते.

∴ `x ne (- 10)/3`   ∴  x = `square`

AB = ______, CD = ______, AD = BC = _______


दोन संख्यांच्या वर्गांमधील फरक 120 आहे. लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुपटीइतका आहे, तर त्या संख्या शोधा.


मनीषच्या आईचे आजचे वय त्याच्या वयाच्या 5 पटीपेक्षा 1 ने जास्त आहे. 4 वर्षांपूर्वी त्यांच्या वयांचा गुणाकार 22 असल्यास त्यांची आजची वये काढा.


एक टाकी दोन नळाच्या साहाय्याने 6 तासात पूर्ण भरते. ती टाकी भरण्यास लहान नळाला मोठ्या नळापेक्षा 5 तास जास्त लागतात तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×