HSC Arts (Marathi Medium)
Academic Year: 2023-2024
Date & Time: 3rd August 2024, 11:00 am
Duration: 3h
Advertisements
सूचना:
- सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
- प्रत्येक प्रश्नाच्या उजवीकडे पूर्ण गुण दिले आहेत.
- चार गुणांच्या प्रश्नांच्या उत्तरात किमान चार मुद्दे असणे अपेक्षित आहेत.
- प्रत्येक नवीन प्रश्नाचे उत्तर स्वतंत्र पानावर लिहावे.
बौद्ध धर्मात दीक्षा घेऊन संघात प्रवेश करणाऱ्या स्त्रियांना ______ म्हटले जाते.
भिक्खू
भिक्खुणी
साध्वी
Chapter:
निसर्गवाद ही संज्ञा ______ यांनी सर्वप्रथम वापरली.
मॅक्सम्युलर
एडवर्ड टेलर
जेम्स फ्रेझर
Chapter:
संयुक्त राष्ट्राने ______ या दिवशी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन जाहीर केला.
२१ फेब्रुवारी
०१ जून
१२ सप्टेंबर
Chapter:
कामांच्या पद्धती सुरळीत बनवण्यासाठी संगणकीय प्रणालीचा उपयोग करण्यास ______ म्हणतात.
पाश्चिमात्यीकरण
अंकीकृतकरण
बाजारीकरण
Chapter:
हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा ______ साली पारित करण्यात आला.
१८३६
१८४६
१८५६
Chapter:
पुढील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा:
ब्राहमो समाज - राजा राममोहन रॉय
सत्यशोधक समाज - महात्मा जोतीराव फुले
हरिजन सेवक संघ - बेहरामजी मलबारी
आर्य समाज - स्वामी दयानंद सरस्वती
Chapter:
पुढील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा:
गोंड - हिमालय क्षेत्र
तोडा - दक्षिण भारत क्षेत्र
वारली - पश्चिम भारत क्षेत्र
अंदमानी - बेटांचे क्षेत्र
Chapter:
पुढील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा:
आसामी - इंडो-आर्यन भाषिक कुटुंब
सेन्तीनेली - अंदमानी भाषिक कुटुंब
मुंडा - ऑस्ट्रो-एशियाटिक भाषिक कुटुंब
तेलुगू - सिनो-तिबेटीयन भाषिक कुटुंब
Chapter:
पुढील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा:
बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन - १८७४
युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेस - १९४९
भारतीय मजदूर संघ - २५५
इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस - १९४७
Chapter:
पुढील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा:
चरस - मादक पदार्थांचे व्यसन
सेल्फायटिस - अमली पदार्थांचे व्यसन
दारू - मद्याचे व्यसन
मनोरंजन - आंतरजालाचे व्यसन
Chapter:
चौकटीत दिलेल्या पर्यायांतून योग्य संज्ञा ओळखून ती दिलेल्या विधानापुढे पुन्हा लिहा:
| जागतिकीकरण, मोक्ष, लेस्बियन, दुर्बल घटक, शहरी समुदाय, गे |
जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका मिळवण्याचे आयुष्यातील परमोच्च ध्येय
Chapter:
चौकटीत दिलेल्या पर्यायांतून योग्य संज्ञा ओळखून ती दिलेल्या विधानापुढे पुन्हा लिहा:
| जागतिकीकरण, मोक्ष, लेस्बियन, दुर्बल घटक, शहरी समुदाय, गे |
बाजारपेठ आधारित अर्थव्यवस्था
Chapter:
चौकटीत दिलेल्या पर्यायांतून योग्य संज्ञा ओळखून ती दिलेल्या विधानापुढे पुन्हा लिहा:
| जागतिकीकरण, मोक्ष, लेस्बियन, दुर्बल घटक, शहरी समुदाय, गे |
स्त्री आणि स्त्रीमधील शारीरिक संबंध
Chapter:
Advertisements
चौकटीत दिलेल्या पर्यायांतून योग्य संज्ञा ओळखून ती दिलेल्या विधानापुढे पुन्हा लिहा:
| जागतिकीकरण, मोक्ष, लेस्बियन, दुर्बल घटक, शहरी समुदाय, गे |
राष्ट्राराष्ट्रांतील परस्परावलंबित्व
Chapter:
चौकटीत दिलेल्या पर्यायांतून योग्य संज्ञा ओळखून ती दिलेल्या विधानापुढे पुन्हा लिहा:
| जागतिकीकरण, मोक्ष, लेस्बियन, दुर्बल घटक, शहरी समुदाय, गे |
स्त्रिया, समलैंगिक आणि दिव्यांग व्यक्तींचा समावेश होतो.
Chapter:
अधोरिखांकित शब्द दुरुस्त करून पुन्हा लिहा:
गुरुद्वारा हे जैन धर्माचे पूजास्थान आहे.
Chapter:
अधोरिखांकित शब्द दुरुस्त करून पुन्हा लिहा:
आदिम समुदायात दोन कुलांत होणाऱ्या विवाहास अंतर्विवाह म्हणतात.
Chapter:
अधोरिखांकित शब्द दुरुस्त करून पुन्हा लिहा:
शहरी केंद्राकडे होणारे स्थलांतर म्हणजे औद्योगिकीकरण.
Chapter:
अधोरिखांकित शब्द दुरुस्त करून पुन्हा लिहा:
चिपको आंदोलनाची सुरुवात मेधा पाटकर यांनी केली.
Chapter:
अधोरिखांकित शब्द दुरुस्त करून पुन्हा लिहा:
धूम्रपान निषिद्ध अधिनियम - २००८ द्वारे खासगी ठिकाणी धूम्नपान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
Chapter:
टिपा लिहा:
वसाहतवादाचा (ब्रिटिश सत्तेचा) भारतीय समाजावर झालेला परिणाम.
Chapter:
खालील विषयावर टिप लिहा:
अंकीकृतकरणाची वैशिष्ट्ये
Chapter:
खालील मध्ये फरक स्पष्ट करा.
आदिम समुदाय आणि शहरी समुदाय
Chapter:
Advertisements
फरक स्पष्ट करा:
व्यक्तिगत समस्या आणि सामाजिक समस्या
Chapter:
खाली दिलेली संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा.
आश्रम व्यवस्था
Chapter:
पुढील संकल्पना सोदाहरण स्पष्ट करा:
धार्मिक विविधता
Chapter:
पुढील विधान सत्य की असत्य आहे ते कारण देऊन सांगा:
भारत सरकारने भाषिक विविधतेला मान्यता दिली आहे.
Chapter:
पुढील विधान सत्य की असत्य आहे ते कारण देऊन सांगा:
जागतिकीकरणाचा भारतीय समाजावर प्रभाव पडलेला आहे.
Chapter:
पुढील विधान सत्य की असत्य आहे ते कारण देऊन सांगा:
आजच्या काळात स्त्री चळवळीचे महत्त्व दिसून येत नाही.
Chapter:
पुढील उतारा वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा:
|
ब्रिटिश भारतात आल्यापासून भारतातील शिक्षण धर्मनिरपेक्ष स्वरूपाचे आहे. याचा अर्थ असा की, अभ्यासाच्या विषयामध्ये पवित्र धार्मिक ग्रंथांचा समावेश नव्हता. समाजात ऊर्ध्व गतिशीलतेसाठी शिक्षण आवश्यक असते. ब्रिटिशांच्या आगमनापासून शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली झाली. कुणालाही इंग्रजी भाषा शिकता येणार होती आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याची संधीही सर्वांसाठी खुली करण्यात आली. विविध सामाजिक आणि आर्थिक स्तरांतील भारतीयांनी इंग्रजीतून शिक्षण घेण्याची ही पहिलीच वेळ होती. यातूनच नंतर भारतातील बुद्धिजीवी वर्ग आकारास आला. त्यांना आपण समाजसुधारक म्हणून ओळखतो. राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, पंडिता रमाबाई, महर्षी धोंडो केशव कर्वे हे समाजसुधारक आपल्या परिचयाचे आहेत. त्यांनी भारतीय समाजात धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणा घडवून आणल्या. स्वातंत्र्योत्तर काळानंतर वर्तमानातदेखील असे द्रष्टे सुधारक समाजात आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीला ७३ वर्षे झाल्यानंतर आता शिक्षणाच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत, परंतु आपण केवळ शिक्षित झालो आहोत की, त्या शिक्षणामुळे नागरिकांना रोजगारही मिळाला आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. समाजात सूक्ष्म पातळीवर बदल घडवून आणण्यासाठी शिक्षणाने आपले प्रबोधन केले आहे का? हा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे. शासनाने समाजातील प्रत्येक स्तराच्या हिताचा विचार करणे गरजेचे आहे. समाजातील सर्वांच्या कल्याणासाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. |
- ब्रिटिश काळात भारतीय शिक्षणात कोणते बदल घडून आले?
- शिक्षणामुळे भारतीय समाजात खरोखर बदल झाले आहेत का?
Chapter:
आपले व्यक्तिगत मत नोंदवा.
मतदानाचे वय १८ वर्षे केल्यामुळे भारतीय लोकशाही मजबूत झाली.
Chapter:
आपले व्यक्तिगत मत नोंदवा.
शेतकऱ्यांच्या आत्महत्येची समस्या थांबवली जाऊ शकते काय?
Chapter:
खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तर १५० ते २०० शब्दांमध्ये लिहा.
ग्रामीण समुदायातील समस्यांची चर्चा करा व त्या समस्या सोडविण्यासाठी उपाय सुचवा.
Chapter:
पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर १५० ते २०० शब्दांमध्ये लिहा.
बेरोजगारीची कारणे स्पष्ट करा.
Chapter:
पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर १५० ते २०० शब्दांमध्ये लिहा.
बेरोजगारीची समस्या सोडवण्यासाठीचे उपाय सुचवा.
Chapter:
Other Solutions
Submit Question Paper
Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help studentsonly jpg, png and pdf files
Maharashtra State Board previous year question papers 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Sociology [समाजशास्त्र] with solutions 2023 - 2024
Previous year Question paper for Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] -2024 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
By referring the question paper Solutions for Sociology [समाजशास्त्र], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी].
How Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Sociology [समाजशास्त्र] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.

