Advertisements
Advertisements
Question
आपले व्यक्तिगत मत नोंदवा.
शेतकऱ्यांच्या आत्महत्येची समस्या थांबवली जाऊ शकते काय?
Very Long Answer
Advertisements
Solution
- संकटग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्याची व्यवस्था: अवर्षण, नापिकी, कर्जबाजारी स्थिती यांसारख्या आपत्ती शेतकऱ्यांवर कोसळतात तेव्हा त्यांना आर्थिक आणि मानसिक आधार देण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था असणे आवश्यक आहे.
- विमा: नैराश्यजनक परिस्थितीत असलेल्या शेतकऱ्याला आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना दिलासा मिळावा यासाठी आयुर्विमा तर नापिकीच्या आणि किडीच्या नुकसानीसाठी शेतीचा पीक विमा मिळायला हवा.
- शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजना: विक्रीतील नफ्याचा सर्वाधिक हिस्सा या मध्यस्थ आणि दलालांच्या खिशात जातो. शेतकऱ्याच्या, विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्याच्या वाट्याला नफ्यातील फारच कमी हिस्सा येतो. मध्यस्थ आणि दलाल यांचे महत्त्व कमी करणाऱ्या ‘शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजना’ शेतकऱ्यांचे शोषण थांबवू शकतील.
- पाण्याचा संचय (पाणीसाठा): सिंचन ही शेतीची मूलभूत गरज आहे. मात्र भारतात पूर, अवर्षण हे नेहमीचेच आहे. त्या पार्श्वभूमीवर पावसाच्या पाण्याचा संचय आणि पाण्याचे व्यवस्थापन काळजीपूर्वक होणे आवश्यक आहे. पाण्याचा संचय करण्याची जबाबदारी फक्त सरकारची आहे अशी मनोधारणा चुकीची आहे.
- बँकांची भूमिका: बँका तसेच सहकारी पतपेढ्या यांनी कर्जवितरणाचे त्यांचे नियम आणि अटी शेतकऱ्याला जाचक ठरू नयेत हे पाहणे जरूरीचे आहे. तसेच शेतकऱ्यांना बचतीची सवय व्हावी म्हणून प्रयत्न करणेही गरजेचे आहे.
- आंतरपीकपद्धती: वर्षातून एकदाच एक पीक घेण्याऐवजी दोनदा किंवा शक्य असल्यास तीनदा पीक घेणे तसेच आंतरपिके घेणे हे अधिक लाभदायक ठरेल. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे आणि उत्तम बियाणे, खते, कीटनाशके सवलतीच्या दरात उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper
