English

टिपा लिहा: भारतातील स्त्रियांची चळवळ - Sociology [समाजशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

टिपा लिहा:

भारतातील स्त्रियांची चळवळ

Short/Brief Note
Advertisements

Solution

  1. सामाजिक सुधारणांचा परिणाम: महिला चळवळीची सुरुवात साधारणपणे १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात झाली, जेव्हा स्त्रियांच्या छोट्या गटांनी आणि काही पुरोगामी पुरुषांनी भारतातील स्त्रियांच्या असमान स्थितीचा मुद्दा अधोरेखित केला. तत्कालीन स्त्री- चळवळ अनेक प्रकारे समाजसुधारणेच्या चळवळीच्या अनुषंगाने गेली. ब्राह्मो समाज आणि आर्य समाज यांनी महिला मंडळे तयार केली. ज्यामुळे स्त्रियांना विचारांची देवाणघेवाण करून प्रगती करण्यास व्यासपीठ मिळाले. भारतीय स्त्रियांना पुरुषांच्या समान पातळीवर आणण्याच्या हेतूने शिक्षित करण्यासाठी जागरूक प्रयत्न केले गेले. भारतीय स्त्री-चळवळीच्या सर्वसाधारण उद्देश व तत्त्वांवर ब्रिटिशांचा असलेला प्रभाव नाकारता येणार नाही. विचार आणि दृष्टिकोनातील उदारमतवादामुळे महिलांना स्वतःला शिक्षित करण्यास उदयुक्त केले गेले. या कालखंडात भारतीय महिलांना त्यांच्या आत्मप्रतिष्ठा व आत्मभानाची जाणीव झाली.
  2. राष्‍ट्रीय चळवळीचा परिणाम: राष्ट्रीय चळवळीत महिलांचा सहभाग वाढला. महात्मा गांधींच्या तत्‍त्‍वांचा चळवळीतल्या स्त्रियांच्या विचारांवर आणि सहभागावर परिणाम होऊ लागला. स्वातंत्र्याच्या लढ्यात महिलांच्या वाढत्या सहभागानेत्यांना त्यांच्या हक्काबद्दल जागरूक केले. स्वातंत्र्यलढ्यातील आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. जेव्हा पुरुष स्वातंत्र्यसैनिकांना तुरुंगात टाकले गेले; तेव्हा स्त्री-स्वातंत्र्यसैनिकांनी कठीण आणि आव्हानात्मक परिस्थिती हाताळल्या. 
  3. स्‍वातंत्र्योत्‍तर कालखंड: स्वातंत्र्योत्तर काळात महिलांच्या चळवळीची तीव्रता कमी होत गेली कारण राजकीय स्वातंत्र्याने महिलांच्या चळवळीचे मूळ लक्ष्य आणि हेतू झाकोळले गेले. भारतीय राज्यघटनेत भारतीय पुरुष आणि स्त्रियांना समानता आणि न्याय बहाल करणारी अनेक कलमे समाविष्ट केली गेली. आदिवासींचा असंतोष, आर्थिक पेचप्रसंग, विद्यार्थ्यांचे आंदोलन यांसारख्या अनेक मुद्द्यांवर सामूहिक संघर्ष आणि निदर्शने झाली. यामुळेच स्त्री-चळवळीच्या मूळ उद्देशाकडे दुर्लक्ष झाले.
  4. महिला सबलीकीकरणाकडे वाटचाल: भारताच्या ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये झिरपत या चळवळीने वेग घेतला आहे. लाभार्थी ते सहभागी अशा वेगवेगळ्या रूपात चळवळीशी संलग्न महिला कार्यरत आहेत. महिला सबलीकरणाच्या मोहिमेमध्ये पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, डॉक्टर्स आणि उद्योजक अशा विविध व्यवसायांतील महिला उत्साहाने सामील झाल्या आहेत.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×