English

पुढील संकल्पना सोदाहरण स्पष्ट करा: आधुनिकीकरण - Sociology [समाजशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील संकल्पना सोदाहरण स्पष्ट करा:

आधुनिकीकरण

Explain
Advertisements

Solution

‘आधुनिकीकरण’ या संज्ञेचा वापर पहिल्‍यांदा डॅनियल लर्नर यांनी केला. ‘आधुनिकीकरण’ ही संकल्पना एखादी व्यक्ती किंवा एखादा गट किंवा एखादा समाज यांच्या संदर्भात लागू केली जाऊ शकते. बऱ्याचदा आधुनिकीकरणाचा विचार आर्थिक बाबतीत करण्याकडे कल दिसतो. परंतु आर्थिक जीवनाच्या संदर्भाबरोबरच आधुनिकीकरणाचा विचार सामाजिक जीवन, तंत्रज्ञान, राजकीय यंत्रणा, संस्कृती, शिक्षण अशा अनेक क्षेत्रांच्या संदर्भातही करावा लागतो. आधुनिकीकरणामुळे मूल्यपद्धती, श्रद्धाप्रणाली आणि वर्तणुकीसंबंधीचे संकेत यांमध्ये बदल घडून आला आहे.

उदाहरण: पुरोगामी विचार आणि श्रद्धाप्रणालींचा स्वीकार हे आधुनिकीकरणाचे निदर्शक आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×