Advertisements
Advertisements
Questions
टिपा लिहा:
वसाहतवादाचा (ब्रिटिश सत्तेचा) भारतीय समाजावर झालेला परिणाम.
खालील विषयावर टिपा लिहा.
वसाहतवादाचे भारतीय समाजावरील परिणाम
Short/Brief Note
Advertisements
Solution
- शिक्षणपद्धती: ब्रिटिशांनी भारतात प्रस्थापित केलेल्या शिक्षणपद्धतीचे दूरगामी परिणाम पुढीलप्रमाणे आहेत. उच्च शालेय पातळीवरील शिक्षण इंग्रजी भाषेतून दिले जाई. त्यामुळे आधुनिक शिक्षण घेतलेल्या लोकांमध्ये इंग्रजी ही संपर्क भाषा बनली. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सर्व वंश, जाती आणि धर्माच्या मुला-मुलींना प्रवेश घेण्याची मुभा होती.
- संस्कृती: खाद्यसंस्कृती, पेहराव, सामाजिक रीतीभाती, वर्तणुकीचे संकेत, दृष्टिकोन, विश्वासप्रणाली, भाषा, खेळ आणि मनोरंजन इत्यादी बाबतीत समाजातील सुशिक्षित वर्गातील अभिजनांनी ब्रिटीश जीवनसरणीचे अनुकरण करण्यास सुरुवात केली. प्रख्यात समाजशास्त्रज्ञ डॉ.एम.एन. श्रीनिवास यांनी ब्रिटिशांचे अनुकरण करण्याच्या या प्रक्रियेला ‘वेस्टर्नायझेशन’ (पाश्चात्यीकरण) असे नाव दिले.
- प्रशासन: ब्रिटिशांनी नवीन प्रशासकीय यंत्रणा उभारली आणि प्रशासनाच्या नवीन पद्धती भारतात रूढ केल्या. त्यांनी भारतीय भूमी आणि लोक यांच्यावर कारभार करण्यासाठी आर्थिक सेवा, शिक्षण सेवा, महसूल सेवा आणि प्रशासकीय सेवा यांसारख्या विविध सेवांचे विभाग स्थापन केले.
- अर्थव्यवस्था: औद्योगिक वाढ आणि तिच्या हातात हात घालून येणारे शहरीकरण यांमुळे वसाहतींच्या काळात भारतातील अर्थव्यवस्थेत मूलभूत स्वरूपाचे बदल घडून आले. बदलती अर्थव्यवस्था आणि औद्योगिक कारखान्यांच्या संख्येमधील वाढ यांच्यामुळे जातीनुसार कौशल्ये, व्यवसाय आणि त्यावर आधारलेले सामाजिक संबंध यांची चौकट हळूहळू बदलू लागली. शिक्षण आणि उत्पन्न या निकषांवर आधारलेले नवीन सामाजिक वर्ग उदयाला येऊ लागले. जातीजातींमधील पारंपरिक विधीनिषेधांची बंधने हळूहळू गळून पडू लागली.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper
