Advertisements
Advertisements
Question
पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर १५० ते २०० शब्दांमध्ये लिहा.
बेरोजगारीची समस्या सोडवण्यासाठीचे उपाय सुचवा.
Very Long Answer
Advertisements
Solution
- शिक्षणपद्धतीमध्ये बदल: शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये आणि शिक्षणपद्धतीत बदल करण्याची आवश्यकता आता निर्माण झाली आहे. ही जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे अशा तज्ज्ञांनी अधिक खुल्या दृष्टीने या प्रश्नाकडे पाहण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांच्या निवडीसाठी त्यांची आवड, गरज यांप्रमाणे अधिक पर्याय उपलब्ध करून द्यायला हवेत, ते विद्यार्थिकेंद्रित असायला हवेत. शैक्षणिक कार्यक्रम आखताना जर समाजाच्या गरजा, स्थानिक गरजा उद्योगक्षेत्राच्या गरजा विचारात घेतल्या गेल्या तर बदलत्या काळाला समर्थपणे सामोरे जाऊ शकणारे मनुष्यबळ विकसित होईल.
- कौशल्यांचा विकास: आताच्या शिक्षणपद्धतीत विद्यार्थी जे शिकतो ते ज्ञानाभिमुख असते. ज्ञानाचे शिक्षणपद्धतीमधील स्थान अत्यंत मोलाचे असले तरी व्यवसायाभिमुख कौशल्यांच्या प्रशिक्षणाची गरजही अत्यंत निकडीची आहे. त्यामुळे उत्तम रोजगाराच्या संधींचा लाभ घेणे स्वयंरोजगार निर्माण करणे किंवा उद्योजक बनून इतरांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे या गोष्टी कौशल्याभिमुख अभ्यासामुळे शक्य होतील. उदाहरणार्थ, ‘राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान’ (RUSA) हा कार्यक्रम. उच्च शिक्षणाच्या संस्थांना रोजगाराच्या विविध क्षेत्रांमधील ‘क्षमता बांधणी’ विकसित करण्यासाठी समर्थ बनवणे हे या कार्यक्रमाचे ठळक वैशिष्ट्य आहे.
- व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम: शिक्षणपद्धतीमध्ये व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांना प्राधान्य देणे ही अनेक वर्षांची गरज आहे. तसे झाल्यास विद्यार्थ्यांना तांत्रिक व्यवसायांच्या शिक्षणाचा पर्याय निवडणे शक्य होईल. २०२० च्या शैक्षणिक धोरणानुसार माध्यमिक स्तरापासूनच व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांना असे प्राधान्य देण्यात आले आहे.
- औद्योगिक क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्र यांचा सहयोग: औद्योगिक संस्था आणि शैक्षणिक संस्था यांच्या सहयोगातून काही शैक्षणिक कार्यक्रम हाती घेणे याबद्दल चर्चा होत आहेत. काही संस्थामधून असे कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये विज्ञान, अभियांत्रिकी, औषध निर्मिती, वैद्यकीय, तंत्रज्ञान, प्रसारमाध्यमे, फॅशन डिझायनिंग आणि व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे.
- उद्योजकता आणि स्वयंरोजगार निर्मिती: भारत सरकार तरुणांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्वतंत्र उद्योग सुरू करण्यासाठी उत्तेजन देत आहे. ज्या तरूणांची आव्हानांना तोंड देण्याची आणि धोके पत्करण्याची तयारी असते त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. स्वयंरोजगार हा सुद्धा बेरोजगारीवरील एक उपाय आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper
