HSC Arts (Marathi Medium)
Academic Year: 2025-2026
Date & Time: 7th March 2026, 3:00 pm
Duration: 3h
Advertisements
सूचना:
- सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
- प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या/आलेख काढावे.
- रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे.
- नकाशा स्टेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे.
- उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.
- नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी.
‘अ’ ‘ब’ आणि ‘क’ स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून ओळखून पूर्ण करा.
| क्र. | ‘अ’ | ‘ब’ | ‘क’ |
| (१) | नकाशा तयार करणे | (क) दिल्ली | (य) नायजर |
| (२) | प्रशासकीय शहर | (ख) पंपाज | (र) लघुउद्योग |
| (३) | गवताळ प्रदेश | (ग) निरीक्षण | (ल) भगोल अभ्यासकाची कौशल्ये |
| (४) | खेळणी | (घ) बांग्लादेश | (व) न्यूयॉर्क |
| (५) | लोकसंख्या विस्फोट | (ड) कागद निर्मिती उद्योग | (श) अर्जेटिना |
Chapter:
तृतीयक व्यवसायामध्ये समावेश होतो -
मासेमारी
साखर उदयोग
पशुपालन
व्यापार
Chapter:
लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारा मानवी घटक -
हवामान
मृदा
वाहतूक
भूरचना
Chapter:
विस्तृत व्यापारी शेतीतील प्रमुख पीक -
कॉफी
गहू
तांदूळ
औषधी वनस्पती
Chapter:
कार्यात्मक प्रदेश -
पुणे महानगर
लातूर
सातारा
अमरावती
Chapter:
भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड (BHEL) हा खालीलपैकी उदयोग प्रकार आहे -
संयुक्त क्षेत्र
सहकारी क्षेत्र
सार्वजनिक क्षेत्र
खाजगी क्षेत्र
Chapter:
भांडवल गुंतवणुकीनुसार निम्न उदयोगांचा उतरता क्रम लावा -
(अ) लघुउद्योग
(ब) सूक्ष्म उद्योग
(क) मोठे उद्योग
(ड) मध्यम उद्योग
Chapter:
खालील देशांचा स्थानानुसार पश्चिमेकडून पूर्वेकडे योग्य क्रम लावा -
(अ) फ्रान्स
(ब) भारत
(क) जपान
(ड) संयुक्त संस्थाने (U.S.A.)
Chapter:
लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील ‘नंतरच्या काळात विस्तारणारा’ या टप्प्यातून जाणारा देश ओळखा -
जर्मनी
स्वीडन
कांगो
चीन
Chapter:
मासेमारी क्षेत्रासाठीची सर्वोत्तम स्थिती -
दंतूर किनारे - उथळ समुद्र - उष्ण हवामान - प्लवंकांची वाढ
उथळ समुद्र - उष्ण-थंड सागरी प्रवाहांचा संगम - प्लवंकांची वाढ - थंड हवामान
भूखंड मंच - प्लवंकांची वाढ - मासेमारीचा उत्तम कौशल्य - उष्ण हवामान
भूखंड मंच - दंतूर किनारे - प्लवंकांची वाढ
Chapter:
‘बरोबर’ की ‘चूक’ लिहा.
आर्थिक भूगोल ही मानवी भूगोलाची शाखा आहे.
Chapter:
‘बरोबर’ की ‘चूक’ लिहा.
स्थलांतर हा लोकसंख्या बदलातील घटक नाही.
Chapter:
Advertisements
‘बरोबर’ की ‘चूक’ लिहा.
ग्रामीण व नागरी क्षेत्रांमधील भूमीस ग्रामीण नागरी झालर क्षेत्र म्हणतात.
Chapter:
‘बरोबर’ की ‘चूक’ लिहा.
शेतीच्या विकासावर अनेक प्राकृतिक व मानवी घटकांचा प्रभाव पडतो.
Chapter:
‘बरोबर’ की ‘चूक’ लिहा.
उदयोगाच्या स्थानावर परिणाम करणारे घटक सर्वत्र समान असतात.
Chapter:
भौगोलिक कारणे लिहा.
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अनेक फळप्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आढळतात.
Chapter: [5] द्वितीयक आर्थिक क्रिया
भौगोलिक कारणे लिहा.
हिमालय पर्वतीय प्रदेशात कमी लोकसंख्या आढळते.
Chapter:
प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो.
Chapter: [7] प्रदेश आणि प्रादेशिक विकास
खालील विधानाचे भौगोलिक कारणे लिहा.
लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते.
Chapter: [2] लोकसंख्या - भाग २
भौगोलिक कारणे लिहा.
सर्वच ग्रामीण वस्तींचे रूपांतर नागरी वस्तीत होतेच असे नाही.
Chapter: [3] मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन
भौगोलिक कारणे लिहा.
भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत असते.
Chapter: [6] तृतीयक आर्थिक क्रिया
फरक स्पष्ट करा.
देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश
Chapter: [2] लोकसंख्या - भाग २
खालील फरक स्पष्ट करा.
स्थलांतरित शेती आणि मळ्याची शेती
Chapter:
फरक स्पष्ट करा.
जलवाहतूक व हवाई वाहतूक
Chapter: [6] तृतीयक आर्थिक क्रिया
फरक स्पष्ट करा.
प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल
Chapter: [8] भूगोल : स्वरूप व व्याप्ती
Advertisements
फरक स्पष्ट करा.
कार्यात्मक प्रदेश व औपचारिक प्रदेश
Chapter: [7] प्रदेश आणि प्रादेशिक विकास
दिलेल्या जगाच्या नकाशा आराखड्यात पुढील माहिती भरा. (सूची आवश्यक):

- भारतातील जास्त लोकसंख्येचे शहर - मुंबई
- जगातील सर्वाधिक लिंगगुणोत्तर असणारा देश - रशिया
- ग्रँड बँक मत्स्यक्षेत्र
- कॅनडातील लाकूडतोड क्षेत्र
- जपानमधील कोणताही एक औदयोगिक प्रदेश
- दक्षिण अमेरिकेतील तेल उत्पादक देश - व्हेनेझुएला
- दक्षिण आफ्रिकेतील प्रमुख बंदर - केपटाऊन
- ट्रान्स ऑस्ट्रेलियन लोहमार्ग
Chapter:
दिलेल्या विभाजित वर्तुळाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहाः

प्रश्न:
- कोणत्या खंडात सर्वाधिक लोकसंख्या आहे?
- जागतिक लोकसंख्येपैकी ९.६९ टक्के लोकसंख्या कोणत्या खंडात आहे?
- सर्वांत कमी लोकसंख्या कोणत्या खंडात आहे?
- युरोप खंडात किती टक्के लोकसंख्या आहे?
- वरील विभाजित वर्तुळात कोणता खंड नाही? आणि का?
Chapter:
खालील संक्षिप्त टिप लिहा.
भारतातील प्रादेशिक विषमतेवर परिणाम करणारे घटक
Chapter:
खालील संक्षिप्त टिपा लिहा.
जन्मदर आणि मृत्युदरातील सहसंबंध.
Chapter: [1] लोकसंख्या - भाग १
खाली दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा:
|
सुमारे ३५०० वर्षांपूर्वी क्रीट बेटावरील नॉसॉस हे शहर मिनॉन संस्कृतीचे मुख्य केंद्र होते. इ.स. पूर्व ५०० पर्यंत ग्रीस हे पृथ्वीवरील सर्वाधिक शहरीकरण झालेल्या क्षेत्रांपैकी एक बनले होते. ग्रीकांनी मुख्य भूमी व बेटांवर ५०० हून अधिक शहरे व गावे वसवली होती. अथेन्स व स्पार्टी ही ग्रीसची प्रमुख शहरे होती. अथेन्स हे जगातील सर्वांत मोठे शहर असावे. त्या काळात अथेन्स शहरात अंदाजे २,५०,००० रहिवासी वास्तव्य करत होते. ग्रीक शहरे धर्म आणि शक्तीची केंद्रे असूनही आर्थिक केंद्र म्हणूनही त्यांनी काम केले आहे. शहरे ही मुख्य बाजारपेठ तळं होती, जिथून श्रीमंत व्यापारी, जमीन आणि पशुधन मालक आणि व्यापारी कार्यरत होते. शैक्षणिक केंद्रे म्हणून शहरातील रहिवाशांमध्ये शिक्षक व तत्त्वज्ञांचाही समावेश होता. त्या काळात हस्तकला उद्योगांचाही विकास झाला होता व सर्वोत्कृष्ट हस्तकला लोकांना आकर्षित करीत होती. शहरांच्या या सर्व भूमिकांमध्ये प्राचीन शहरे सांस्कृतिक, सामाजिक, शक्ती व अधिकार यांच्यातील परिवर्तनाची केंद्रबिंदू होती. |
प्रश्नः
- ग्रीक कालखंडात जगातील सर्वात मोठे शहर कोणते होते?
- ग्रीक शहरांची भूमिका सांगा.
- अथेन्स शहराची अंदाजे लोकसंख्या किती होती?
- प्राचीन ग्रीक शहरात कोणकोणत्या सेवा सुविधा होत्या?
Chapter:
सुबक आकृती काढून नावे दया.
रेषीय वस्ती
Chapter: [3] मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन
आकृती काढून नावे दया.
प्रादेशिक असंतुलन कमी करण्यासाठी सार्वजनिक वस्तूंची/सेवांची तरतूद.
Chapter:
विस्तृत व्यापारी धान्य शेतीची वैशिष्ट्ये वितरणासह स्पष्ट करा.
Chapter:
उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.
Chapter:
Other Solutions
Submit Question Paper
Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help studentsonly jpg, png and pdf files
Maharashtra State Board previous year question papers 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Geography [भूगोल] with solutions 2025 - 2026
Previous year Question paper for Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] -2026 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
By referring the question paper Solutions for Geography [भूगोल], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी].
How Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Geography [भूगोल] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
