English

फरक स्पष्ट करा. देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

फरक स्पष्ट करा.

देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश

Distinguish Between
Advertisements

Solution

  देणारा प्रदेश घेणारा प्रदेश
(१) ज्या प्रदेशातून लोक स्थलांतरित होतात, त्या मूळ प्रदेशाला देणारा प्रदेश म्हणतात. मूळ प्रदेशातून लोक ज्या प्रदेशात स्थलांतरित होतात, अशा प्रदेशाला घेणारा प्रदेश म्हणतात.
(२) स्थलांतरामुळे देणाऱ्या प्रदेशातील लोकसंख्येची रचना आणि गुणवैशिष्ट्ये बदलतात. स्थलांतरामुळे घेणाऱ्या प्रदेशातील लोकसंख्येची रचना आणि गुणवैशिष्ट्ये बदलतात.
(३) स्थलांतरामुळे देणाऱ्या प्रदेशातील लोकसंख्या कमी होते, तसेच तेथील लोकसंख्येची घनताही कमी होते. स्थलांतरामुळे घेणाऱ्या प्रदेशातील लोकसंख्या जास्त होते, तेथील लोकसंख्येची घनता वाढते.
(४)  स्थलांतरामुळे देणाऱ्या प्रदेशातील वय रचना बदलते; बहुतांशी वेळेस लिंग गुणोत्तर बदलते आणि दर हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण वाढते. स्थलांतरामुळे घेणाऱ्या प्रदेशातील कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण वाढते; लिंग गुणोत्तर बदलते आणि दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या कमी आढळते.
(५) देणाऱ्या प्रदेशातील लोकसंख्या कमी झाल्यामुळे काही वेळेस शेती उदयोगासारख्या स्थानिक आर्थिक व्यवसायांना मजुरांचा तुटवडा पडतो. घेणाऱ्या प्रदेशात लोकसंख्या जास्त झाल्यामुळे बेकारी वाढते, काही वेळेस मजुरांचे किंवा स्थलांतरित लोकांचे शोषण होते.
(६) काही निवडक प्रदेशांत स्थलांतरित झालेल्या लोकांच्या मनिऑर्डर वर देणाऱ्या प्रदेशांचा काही प्रमाणात विकास होताना दिसतो. घेणाऱ्या प्रदेशात घरांचा तुटवडा, झोपडपट्टी, गुन्हेगारी, वाहतूक कोंडी, प्रदूषण अशा समस्या उद्भवतात.
shaalaa.com
स्थलांतर
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: लोकसंख्या - भताग २ - स्वाध्याय [Page 20]

APPEARS IN

Balbharati Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 2 लोकसंख्या - भताग २
स्वाध्याय | Q ४. १) | Page 20
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×