English

Marathi Board Question Paper 2025-2026 English Medium Class 10 Question Paper Solution

Advertisements
Marathi [Board Question Paper]
Marks: 80 CBSE
English Medium

Academic Year: 2025-2026
Date & Time: 23rd February 2026, 10:30 am
Duration: 3h
Advertisements
  1. प्रश्नपत्रिकेत 11 छापील पाने आहेत; कृपया तपासून घ्या.
  2. प्रश्नपत्रिकेच्या उजवीकडे छापलेला कोड नंबर उत्तरपुस्तिकेच्या मुखपृष्ठावर लिहा.
  3. प्रश्नपत्रिकेत 8 प्रश्न आहेत; तपासून घ्या.
  4. प्रश्न सोडविण्यापूर्वी उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्नाक्रमांक लिहा.
  5. प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 15 मिनिटे देण्यात आली आहेत. प्रश्नपत्रिका 10.15 वाजता वाटण्यात येईल. 10.15 ते 10.30 या दरम्यान प्रश्नपत्रिका फक्त वाचायची आहे; उत्तरे लिहायला सुरुवात करू नये.
  6. Please check that this question paper contains 11 printed pages.
  7. Q.P. Code given on the right-hand side of the question paper should be written on the title page of the answer-book by the candidate.
  8. Please check that this question paper contains 8 questions.
  9. Please write down the Serial Number of the question in the answer-book at the given place before attempting it.
  10. 15 minutes have been allotted to read this question paper. The question paper will be distributed at 10.15 a.m. From 10.15 a.m. to 10.30 a.m., the candidates will read the question paper only and will not write any answers in the answer book during this period.

General instructions:

  1. Question paper is divided into Four sections.
  2. It has a total of 8 questions.
  3. Section A: 2 Questions No. 1 & 2
  4. Section B: 2 Questions No.3 & 4
  5. Section C: 3 Questions No. 5, 6 & 7
  6. Section D: 1 Questions No. 8
  7. Attempt questions as per specific instructions.
  8. Write questions no. in the answer book before attempting it.

सर्वसाधारण सूचना:

  1. ही प्रश्नपत्रिका 4 विभागात विभागलेली आहे.
  2. प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण ४ प्रश्न आहेत.
  3. विभाग A/अ मध्ये 2 प्रश्न आहेत. प्रश्न क्र. 1 ते 2
  4. विभाग B/व मध्ये 2 प्रश्न आहेत. प्रश्न क्र. 3 ते 4
  5. विभाग C/क मध्ये 3 प्रश्न आहेत. प्रश्न क्र. 5 ते 7
  6. विभाग D/ड मध्ये 1 प्रश्न आहेत. प्रश्नक्र. 8
  7. दिलेल्या निर्देशानुसार प्रश्नांची उत्तरे लिहा.
  8. उत्तर लिहिण्यापूर्वी उत्तरपुस्तिकेत प्रश्न क्रमांक लिहा.

विभाग - 'अ' (15 गुण) SECTION - 'A' (15 Marks)
वाचन व आकलन Reading and Comprehension
[8]1.

खालील उतारा काळजीपूर्वक वाचा त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

भारत देश म्हणजे ‘पृथ्वीचा मुकुटमणी’ आहे. त्यामध्ये संपत्तीचे विपुल भांडार आहे. सगळे महत्त्वाचे धातू भारतात सापडतात. गंगा, यमुना, कृष्णा, गोदावरी, कावेरी आणि नर्मदा आपल्या अमृतजालाने त्याच्या भूमीचे सिंचन करतात. येथील कसलेल्या जमिनीत सदैव सोने पिकते. ऋतूंचे चक्र सदैव मनाला आकृष्ट करते. भारतभूमीच्या आकर्षणाने विदेशी लोक नेहमीच आकर्षित होतात. अनेक विदेशी लोकांनी येथे कोणत्या ना कोणत्या निमित्ताने येऊन ज्ञान आणि वैभव प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला. अनेक महापुरुषांनी येथे जन्म घेऊन मानवतेचा बोध केला. रामाची मर्यादाशीलता, कृष्णाचा कर्मयोग, गौतमाची अहिंसा, युधिष्ठिराचा धर्म, कर्णाची दानशूरता, अर्जुनाचे युद्धकौशल्य आणि महावीराची करुणा ही जीवन चरित्र्याच्या आदर्शाची अनुपम उदाहरणे आहेत. भारताचा इतिहास गौरवाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेला होता. नालंदा आणि तक्षशिला यांसारखी विद्यापीठे ज्ञान आणि विज्ञानाच्या अध्ययनाची अद्भुत केंद्रे होती. पाणिनीसारखे वैयाकरण आणि चाणक्यासारखे अर्थशास्त्रज्ञ, व राजकारणपटू तक्षशिला विद्यापीठाचेच अध्यापक होते. जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ वेद, उपनिषदे आणि गीता यांची निर्मिती भारतामध्येच झाली. व्यास, भवभूती, कालिदास, ज्ञानेश्वर, तुकाराम, तुलसीदास यांसारख्या प्रतिभावंतांनी आपल्या काव्यवैभवाने जगाला विस्मित केले.
  1. दिलेला गढ्य उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायामधून निवडा. (कोणतेही 5) (5 × 1 = 5)
    1. भारत देश कोणाचा मुकुटमणी आहे?
      1. विश्वाचा
      2. संतांचा
      3. पृथ्वीचा
      4. परमेश्वराचा
    2. येथे जन्मलेल्या महापुरुषांनी कोणते कार्य केले?
      1. ज्ञानदान
      2. धर्मप्रसार
      3. उपदेश
      4. मानवतेचा बोध
    3. ‘अद्भुत केंद्र’ कशास म्हटले आहे?
      1. प्राचीन ग्रंथांना
      2. नालंदा, तक्षशीला विदयापीठांना
      3. भारतभूमीला
      4. महापुरुषांना
    4. येथील कसलेल्या जमिनीत काय पिकते?
      1. धान्य
      2. सोने
      3. मोती
      4. संपत्ती
    5. विदेशी लोकांनी भारतात येऊन काय केले?
      1. ज्ञान आणि वैभव प्राप्त करून घेतले
      2. नयांचे पाणी नेले
      3. वसाहती स्थापन करून व्यापार वाढविला
      4. भारतातील लोकांचे शोषण केले
    6. पाणिनी आणि चाणक्य कोणत्या विद्यापीठामध्ये अध्यापक होते?
      1. नालंदा
      2. शारदापीठ
      3. तक्षशीला
      4. बनारस
  2. दिलेल्या गद्य उताऱ्याच्या आधारे पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (कोणतेही 3) (3 × 1 = 3)
    1. लेखकाने कोणकोणत्या नद्यांचा उल्लेख केला आहे?
    2. चाणक्य कोण होते?
    3. जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ कोणते?
    4. कोणकोणत्या प्रतिभावंत कवींचा उल्लेख लेखकाने केला आहे?
Concept: undefined - undefined
Chapter:
[7]2.

खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

छळून घ्या संकटांनो, संधी पुन्हा मिळणार नाही
कर्पुराचा देह माझा, जळून पुन्हा जळणार नाही
साहीन मी आनंदाने तुमचे वर्मी घाव
असाच नेईन किनाऱ्याशी चुकलेली नाव
मार्ग बिकट आला तरी मागे वळणार नाही
निराश मी होणार नाही झुंजता तुमच्यासवे
मनी माझ्या जागतील आकांक्षांचे लाख दिवे
वेदना झाल्या तरी अश्रूही गळणार नाही
आव्हान माझे तुम्हांला चालून या माझ्यावरी
धैर्याची कट्यार माझी पाजळील तुमच्यावरी
संकटांनो, सावधान मी गाफील असणार नाही
  1. दिलेली कविता वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायांमधून निवडा. (कोणतेही 4) (4 × 1 = 4)
    1. कवीला आपला देह कशाचा वाटतो?
      1. मातीचा
      2. हाडामासांचा
      3. कर्पुराचा
      4. फुलांचा
    2. कोणत्या मार्गाचा उल्लेख केला आहे?
      1. सरल
      2. बिकट
      3. वाकडा
      4. वळणाचा
    3. लाख दिवे कशास म्हटले आहे?
      1. संकटांना
      2. आकांक्षांना
      3. वेदनांना
      4. अश्रूंना
    4. कवी जवळ कोणती कट्यार आहे?
      1. सोन्याची
      2. पराक्रमाची
      3. सावधतेची
      4. धैर्याची
    5. मार्ग बिकट आला तर कवी काय करणार आहे?
      1. मागे वळणार नाही
      2. नवी वाट शोधणार आहे
      3. मागे वळणार आहे
      4. प्रवास थांबविणार आहे
  2. दिलेल्या कवितेच्या आधारे पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (कोणतेही 3) (3 × 1 = 3)
    1. कवी कोणाला उद्देशून बोलत आहे?
    2. कवी आनंदाने काय सहन करणार आहे?
    3. कवीने कोणते आव्हान दिले आहे?
    4. कवी कटारींचा उपयोग कशासाठी करणार आहे?
    5. शेवटी कवी स्वतःबद्दल काय म्हणतात?
Concept: undefined - undefined
Chapter:
विभाग - 'ब' (20 गुण) SECTION (20 Marks)-B
व्याकरण Grammar
[4]3. (a) | सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. (कोणतेही 4)
[1]3. (a) (i)

खालील पर्यायांतून सामान्य नामाचा योग्य पर्याय निवडा.

मुलगा

निराशा

राघव

थंडगार

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3. (a) (ii)

‘राम आणि श्याम दोघेही गरीब मुले आहेत’. या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा.

आणि

गरीब

दोघेही

आहेत

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3. (a) (iii)

‘हळूहळू’ हा शब्द कोणत्या शब्दाच्या जातीचा आहे?

उभयान्वयी अव्यव

शब्दयोगी अव्यव

केवलप्रयोगी अव्यव

क्रियाविशेषण अव्यव

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3. (a) (iv)

पुढील वाक्यात रिकाम्या जागी योग्य क्रियाविशेषण अव्ययाचा वापर करा.

त्याने गाडी ______ चालविली.

भरपूर

सावकाश

अलिकडे

खाली

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3. (a) (v)

वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

पुस्तक कपाटामध्ये आहे.

विशेषण

सर्वनाम

शब्दयोगी अव्यय

उभयान्वयी अव्यय

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]3. (b) | सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. (कोणतेही 3)
[1]3. (b) (i)

सूचनेप्रमाणे उत्तर लिहा.

संजय पुस्तक वाचेल. (काळ ओळखा.)

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3. (b) (ii)

सूचनेप्रमाणे उत्तर लिहा.

खर्च केलेल्या पैशांचा मी हिशोब केला. (भविष्यकालीन वाक्य करा.)

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3. (b) (iii)

सूचनेप्रमाणे उत्तर लिहा.

गावात शाळेसाठी खूप मदत मिळेल. (वर्तमानकालीन वाक्य करा.)

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3. (b) (iv)

सूचनेप्रमाणे उत्तर लिहा.

नितीन सकाळी व्यायाम करतो. (भूतकालीन वाक्य करा.)

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]3. (c) | सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. (कोणतेही 3)
[1]3. (c) (i)

सूचनेप्रमाणे उत्तर लिहा.

तू आमच्याबरोबर खेळायला येणार का? (वाक्याचा प्रकार ओळखा.)

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3. (c) (ii)

सूचनेप्रमाणे उत्तर लिहा.

उमेशच्या घरापासून नदी लांब नाही. (विधानार्थी होकारार्थी वाक्य करा.)

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3. (c) (iii)

सूचनेप्रमाणे उत्तर लिहा.

मुलांनी खूप खेळावे. (आज्ञार्थी वाक्य करा.)

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3. (c) (iv)

सूचनेप्रमाणे उत्तर लिहा.

तुझा आवाज खूप छान आहे. (उद्गारार्थी वाक्य करा.)

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]3. (d) | सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. (कोणतेही 2)
[1]3. (d) (i)

खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता, ते ओळखा.

दगड

पाय

डोळा

बाजू

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3. (d) (ii)

सूचनेप्रमाणे उत्तर लिहा.

झाडाखाली फळ पडले आहे. (अधोरेखित शब्दाच्या वचनामध्ये बदल करून वाक्य लिहा.)

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3. (d) (iii)

सूचनेप्रमाणे उत्तर लिहा.

‘गाडी’ या शब्दाचे वचन बदलून लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]4. (a) | सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. (कोणतेही 2)
[1]4. (a) (i)

पुढीलपैकी भिन्नलिंगी शब्दाचा योग्य पर्याय निवडा.

गाय

भिंत

खडू

चिमणी

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]4. (a) (ii)

लिंगविचारानुसार गटात न बसणारा शब्द कोणता?

फूल

होडी

विमान

झाड

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]4. (a) (iii)

‘माकड’ या शब्दाचे लिंग बदला.

माकडी

माकडीण

माकडीणी

माकडा

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]4. (b) | सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. (कोणतेही 2)
[1]4. (b) (i)

खालीलपैकी समानार्थी शब्दांची योग्य जोडी कोणती?

काळ = बाळ

वृक्ष = रुक्ष

विनय = नम्रता

आहार = विहार

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]4. (b) (ii)

खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता?

कष्ट

ताकद

सामर्थ्य

बळ

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]4. (b) (iii)

सृष्टी - समानार्थी शब्द लिहा.

तृप्ती

पाऊस

नजर

जग

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]4. (c) | सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. (कोणतेही 2)
Advertisements
[1]4. (c) (i)

खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी कोणती?

समान × असमान

खरे × सत्य

दुर्जन × दुर्बल

मान × समान

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]4. (c) (ii)

‘जवळ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढील पर्यायांतून ओळखा.

समीप

लांब

निकट

अंतर

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]4. (c) (iii)

‘दुरुस्त’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढील पर्यायांतून ओळखा.

बिघडलेले

तुटलेले

तंदुरुस्त

नादुरुस्त

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]4. (d) | सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. (कोणतेही 2)
[1]4. (d) (i)

खालीलपैकी समास प्रकारांच्या गटात न बसणारा शब्द कोणता?

भाजीपाला

सूर्योदय

पंचपाळे

प्रहार

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]4. (d) (ii)

सूचनेप्रमाणे उत्तर लिहा.

मुलांनी कविता तोंडपाठ केली. अधोरेखित शब्दाचा समास ओळखा.

तत्पुरुष समास

अव्ययीभाव समास

द्वंद्व समास

बहुव्रीही समास

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]4. (d) (iii)

‘पुरणपोळी’ या शब्दाचा समास पुढीलपैकी कोणता?

इतरेतर द्वंद्व समास

द्विगू समास

समाहार द्वंद्व समास

अव्ययीभाव समास

Concept: undefined - undefined
Chapter:
विभाग - 'क' (30 गुण) SECTION-'C'
पाठयपुस्तक आधारित Text book based
[3]5. (a) | पुढील प्रश्नांची केवळ एका वाक्यात उत्तरे लिहा. (कोणतेही 3)
[1]5. (a) (i)

पुढील प्रश्नाचे केवळ एका वाक्यात उत्तर लिहा.

पंतांनी कोणती भीष्म प्रतिज्ञा केली?

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]5. (a) (ii)

पुढील प्रश्नाचे केवळ एका वाक्यात उत्तर लिहा.

कथेचे दुसरे नाव काय आहे?

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]5. (a) (iii)

पुढील प्रश्नाचे केवळ एका वाक्यात उत्तर लिहा.

आपल्या पावलांचा काळा रंग कशावरून ठरतो?

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]5. (a) (iv)

पुढील प्रश्नाचे केवळ एका वाक्यात उत्तर लिहा.

निरंजनने कोणत्या विषयाची परीक्षा दिली नव्हती?

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]5. (a) (v)

पुढील प्रश्नाचे केवळ एका वाक्यात उत्तर लिहा.

अब्दुल तपोवनात कशासाठी जात होता?

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]5. (b) | खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द भरून वाक्य पुन्हा लिहा. (कोणतेही 3)
[1]5. (b) (i)

हायस्कूलमध्ये भावे सर ______ विषय शिकवत होते.

नागरिकशास्त्र

भौतिकशास्त्र

अंकगणित

मराठी

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]5. (b) (ii)

या शाली घेऊन घेऊन मी आता ______ बनू लागलो आहे.

कुलीन

श्रीमंत

शालीन

पुलकित

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]5. (b) (iii)

थोरांची चरित्र ______ प्रेरणा देतात.

जनतेला

विद्यार्थ्यांना

सामान्यांना

सर्वांना

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]5. (b) (iv)

पहिला उपाय म्हणून मी ______ सुरू केले.

व्यायाम

चालणे

आहार परिवर्तन

साखर खाणे

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]5. (b) (v)

देवळातल्या पहारेकऱ्याने ______ टोले दिले.

बाराचे

दोनचे

दहाचे

पाचचे

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]5. (c) | खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे 30 ते 40 शब्दांत उत्तर लिहा. (कोणतेही 1)
[3]5. (c) (i)

खालील प्रश्नाचे 30 ते 40 शब्दांत उत्तर लिहा.

लेखकाने दिलेल्या शालीचा उपयोग भिक्षेकऱ्याने कसा केला, त्याचे कारण स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]5. (c) (ii)

खालील प्रश्नाचे 30 ते 40 शब्दांत उत्तर लिहा.

डॉ. माशेलकरांनी युनियन हायस्कूलच्या शिक्षकांविषयी कृतज्ञता कोणत्या शब्दांत व्यक्त केली आहे?

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]5. (c) (iii)

खालील प्रश्नाचे 30 ते 40 शब्दांत उत्तर लिहा.

आजच्या चुकीच्या जीवनशैलीबद्दल अभिषेकच्या बाबांनी कोणते मत व्यक्त केले ?

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]5. (d) (i)

कंसात दिलेल्या वाक्प्रचारांचा खालील वाक्यामध्ये योग्य त्या ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

(उपद्व्याप करणे, मग्न होणे, झोकून देणे, खचून जाणे, हातभार लावणे, सुरुंग लावणे)

दंगेखोर सुमीत घरात सतत नको त्या गोष्टी करत असतो.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]5. (d) (ii)

कंसात दिलेल्या वाक्प्रचारांचा खालील वाक्यामध्ये योग्य त्या ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

(उपद्व्याप करणे, मग्न होणे, झोकून देणे, खचून जाणे, हातभार लावणे, सुरुंग लावणे)

ताईचे गाणे ऐकण्यात सारे जण रममाण झाले होते.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]5. (d) (iii)

कंसात दिलेल्या वाक्प्रचारांचा खालील वाक्यामध्ये योग्य त्या ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

(उपद्व्याप करणे, मग्न होणे, झोकून देणे, खचून जाणे, हातभार लावणे, सुरुंग लावणे)

समारंभ यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्ते मनापासून सहभागी झाले होते.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]5. (d) (iv)

कंसात दिलेल्या वाक्प्रचारांचा खालील वाक्यामध्ये योग्य त्या ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

(उपद्व्याप करणे, मग्न होणे, झोकून देणे, खचून जाणे, हातभार लावणे, सुरुंग लावणे)

आयुष्यात इतकी संकटे येऊनही आई कधीही निराश झाली नाही.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]5. (d) (v)

कंसात दिलेल्या वाक्प्रचारांचा खालील वाक्यामध्ये योग्य त्या ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

(उपद्व्याप करणे, मग्न होणे, झोकून देणे, खचून जाणे, हातभार लावणे, सुरुंग लावणे)

गाव स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकानेच मदत केली पाहिजे.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]6. (a) | खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे द्या. (कोणतेही 4)
[1]6. (a) (i)

खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर द्या.

कनवाळू माता का धाव घेते?

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]6. (a) (ii)

खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर द्या.

या देशाच्या मातीवर कोणाचा अधिकार आहे?

Concept: undefined - undefined
Chapter:
Advertisements
[1]6. (a) (iii)

खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर द्या.

इंदिरा संतांना आपल्या जीवापेक्षा कोणती गोष्ट मोठी वाटते?

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]6. (a) (iv)

खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर द्या.

कवीच्या साहाय्यास कोण धावून आले?

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]6. (a) (v)

खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर द्या.

संत नामदेवांनी चातक कोणास म्हटले आहे?

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]6. (a) (vi)

खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर द्या.

कवयित्रीने ज्योतीची उपमा कोणाला दिली आहे.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]6. (b) | खालील वाक्यांतील रिकाम्या जागी योग्य शब्द भरून वाक्य पुन्हा लिहा. (कोणतेही 4)
[1]6. (b) (i)

चैतन्याचे फिरे ______.

चक्र

हात

सुदर्शन

यंत्र

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]6. (b) (ii)

______ चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.

पौर्णिमेचा

भाकरीचा

अमावस्येचा

रात्रीचा

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]6. (b) (iii)

अंकिला मी ______ तुझा.

भक्त

वत्स

दास

सेवक

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]6. (b) (iv)

हजार आम्ही ______ बळकट.

एकी

शक्ती

तरीही

आशा

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]6. (b) (v)

______ असे, तुला एकच औक्षण.

दीनदुबळ्यांचे

जनतेचे

साऱ्यांचे

देशवासियांचे

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]6. (c) | खालीलपैकी कोणत्याही एका काव्यपंक्तीचे संदर्भासह स्पष्टीकरण लिहा. (कोणतेही 1)
[3]6. (c) (i)

खालील काव्यपंक्तीचे संदर्भासह स्पष्टीकरण लिहा.

दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]6. (c) (ii)

खालील काव्यपंक्तीचे संदर्भासह स्पष्टीकरण लिहा.

नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार।।

Concept: undefined - undefined
Chapter:
[5]7. | पुढील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. (कोणतेही 5)
[1]7. (i)

पुढील प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात लिहा.

होमी भाभा यांचे व्यक्तिमत्त्व कसे होते?

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]7. (ii)

पुढील प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात लिहा.

व्युत्पत्तीकोश म्हणजे काय?

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]7. (iii)

पुढील प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात लिहा.

लेखक बार्कमध्ये कोणत्या पदावर रुजू झाले?

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]7. (iv)

पुढील प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात लिहा.

‘इनामदार’ हा शब्द कोणत्या भाषेतील आहे?

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]7. (v)

पुढील प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात लिहा.

मराठीतील ‘अत्तर’ हा अरबी भाषेमधील कोणत्या शब्दापासून आला आहे?

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]7. (vi)

पुढील प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात लिहा.

भारतातील अणुसंशोधनाचा पाया कोणी घातला?

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]7. (vii)

पुढील प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात लिहा.

डॉ. अनिल काकोडकर यांनी पत्र कोणाला उद्देशून लिहिले आहे?

Concept: undefined - undefined
Chapter:
विभाग - 'ड' (15 गुण) SECTiON -'D' (15 Marks)
लेखन Writing
[5]8. (a) (1) (i)

खालील विषयावर सुमारे 120 - 150 शब्दांत निबंध लिहा.

झाडाचे आत्मवृत्त

मुद्दे - बीज म्हणून जन्म सुरुवातीच जीवन - वाढीचा अनुभव ऋतूतील बदलांचा अनुभव - परोपकारी जीवन - पक्षी आणि प्राण्यांचा सहवास - वाटसरूंना सावली - मुलांना फळे व फुले - इतरांच्या मदतीला धावणे - म्हातारपण - अखरेचा क्षण - परोपकाराची जाणीव - इतरांच्या मदतीसाठी पुन्हा जन्म घेण्याची इच्छा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[5]8. (a) (1) (ii)

खालील विषयावर सुमारे 120 - 150 शब्दांत निबंध लिहा.

मला पंख असते तर.....

मुद्दे - स्वप्न - मनातील कल्पना पूर्ण करणे - जगाची सहल - देशाच्या वैविध्यतेचे दर्शन - निसर्ग सौंदर्याचा अनुभव - इतरांची मदत - वेळेची बचत - नवीन ज्ञान घेणे - स्वातंत्र्याचा अनुभव - स्वप्नातून जाग येणे.

Concept: undefined - undefined
Chapter:
[5]8. (a) (1) (iii)

खालील विषयावर सुमारे 120 - 150 शब्दांत निबंध लिहा.

सणांचे महत्त्व

मुद्दे - भारतीय समाजातील सणांचे वैविध्य - एकजुटीचे प्रतीक - उत्साहपूर्ण वातावरण - सणांची ऋतुमानानुसार रचना - आरोग्याचे रक्षण - सकारात्मक उर्जा - व्यापाराला चालना - कला आणि कौशल्यांचे जतन - सांस्कृतिक वारसा.

Concept: undefined - undefined
Chapter:
किंवा/OR
[5]8. (a) (2) (i)

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथा लिहून समर्पक शीर्षक व अर्थपूर्ण तात्पर्य लिहा.

मोठा बंगला - पाळीव कुत्रा - घरातील माणसे - कामानिमित्त बाहेर - घरी आजी एकट्या - चोराचा प्रवेश - कुत्रा हल्ला करून चोराला पळवून लावतो - घराचे व आजीचे रक्षण - कुत्र्याचे कौतुक.

Concept: undefined - undefined
Chapter:
[5]8. (a) (2) (ii)

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथा लिहून समर्पक शीर्षक व अर्थपूर्ण तात्पर्य लिहा.

श्रीमंत माणूस - तीन मुले - घराची जबाबदारी सोपविण्यासाठी मुलांची परीक्षा - पाच रुपये देतो व घरभर पदार्थ आणणे - पहिली दोन्ही मुले अयशस्वी - धाकटा मुलगा चार मेणबत्त्या व काडेपेटी आणतो - घरभर प्रकाश - त्याची निवड.

Concept: undefined - undefined
Chapter:
[5]8. (b) (i)

खालील विषयावर पत्र लिहा. (लिफाफा आवश्यक)

समर्थ पुणतांबेकर व श्वेता नेवासकर मॉडर्न विद्यालय, शिवाजीनगर, पुणे हे शालेय प्रतिनिधी आपल्या शाळेसाठी क्रीडासाहित्याच्या दुकानातून, शिंदे स्पोर्ट्स, टिळक रस्ता, पुणे या दुकानमालकास क्रीडासाहित्य मागविणारे पत्र लिहितात.

Concept: undefined - undefined
Chapter:
[5]8. (b) (ii)

खालील विषयावर पत्र लिहा. (लिफाफा आवश्यक)

उमेश पटवर्धन, सदाशिव पेठ, पुणे हा विद्यार्थी आशय ग्रंथ भांडार, खासबाग, कोल्हापूर या ग्रंथ विक्रेत्यास त्याने मागविलेल्या पुस्तकांच्या यादीतील एक पुस्तक कमी पाठविल्याबद्दल तक्रार करणारे पत्र लिहित आहे.

Concept: undefined - undefined
Chapter:
[5]8. (c) | खालील दिलेल्या विषयावर जाहिरातलेखन करा. (कोणतेही 1)
[5]8. (c) (i)

तुमच्या परिसरात सुरू झालेल्या किराणा दुकानाची जाहिरात तयार करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[5]8. (c) (ii)

परिसरात नव्याने सुरू झालेल्या योगा क्लासेसची जाहिरात तयार करा.

Concept: undefined - undefined
Chapter:

Other Solutions



































Submit Question Paper

Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help students




only jpg, png and pdf files

CBSE previous year question papers Class 10 Marathi with solutions 2025 - 2026

     CBSE Class 10 Marathi question paper solution is key to score more marks in final exams. Students who have used our past year paper solution have significantly improved in speed and boosted their confidence to solve any question in the examination. Our CBSE Class 10 Marathi question paper 2026 serve as a catalyst to prepare for your Marathi board examination.
     Previous year Question paper for CBSE Class 10 Marathi-2026 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
     By referring the question paper Solutions for Marathi, you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of CBSE Class 10.

How CBSE Class 10 Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Marathi will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×