English

खालील उतारा काळजीपूर्वक वाचा त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. भारत देश म्हणजे ‘पृथ्वीचा मुकुटमणी’ आहे. त्यामध्ये संपत्तीचे विपुल भांडार आहे. - Marathi

Advertisements
Advertisements

Question

खालील उतारा काळजीपूर्वक वाचा त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

भारत देश म्हणजे ‘पृथ्वीचा मुकुटमणी’ आहे. त्यामध्ये संपत्तीचे विपुल भांडार आहे. सगळे महत्त्वाचे धातू भारतात सापडतात. गंगा, यमुना, कृष्णा, गोदावरी, कावेरी आणि नर्मदा आपल्या अमृतजालाने त्याच्या भूमीचे सिंचन करतात. येथील कसलेल्या जमिनीत सदैव सोने पिकते. ऋतूंचे चक्र सदैव मनाला आकृष्ट करते. भारतभूमीच्या आकर्षणाने विदेशी लोक नेहमीच आकर्षित होतात. अनेक विदेशी लोकांनी येथे कोणत्या ना कोणत्या निमित्ताने येऊन ज्ञान आणि वैभव प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला. अनेक महापुरुषांनी येथे जन्म घेऊन मानवतेचा बोध केला. रामाची मर्यादाशीलता, कृष्णाचा कर्मयोग, गौतमाची अहिंसा, युधिष्ठिराचा धर्म, कर्णाची दानशूरता, अर्जुनाचे युद्धकौशल्य आणि महावीराची करुणा ही जीवन चरित्र्याच्या आदर्शाची अनुपम उदाहरणे आहेत. भारताचा इतिहास गौरवाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेला होता. नालंदा आणि तक्षशिला यांसारखी विद्यापीठे ज्ञान आणि विज्ञानाच्या अध्ययनाची अद्भुत केंद्रे होती. पाणिनीसारखे वैयाकरण आणि चाणक्यासारखे अर्थशास्त्रज्ञ, व राजकारणपटू तक्षशिला विद्यापीठाचेच अध्यापक होते. जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ वेद, उपनिषदे आणि गीता यांची निर्मिती भारतामध्येच झाली. व्यास, भवभूती, कालिदास, ज्ञानेश्वर, तुकाराम, तुलसीदास यांसारख्या प्रतिभावंतांनी आपल्या काव्यवैभवाने जगाला विस्मित केले.
  1. दिलेला गढ्य उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायामधून निवडा. (कोणतेही 5) (5 × 1 = 5)
    1. भारत देश कोणाचा मुकुटमणी आहे?
      1. विश्वाचा
      2. संतांचा
      3. पृथ्वीचा
      4. परमेश्वराचा
    2. येथे जन्मलेल्या महापुरुषांनी कोणते कार्य केले?
      1. ज्ञानदान
      2. धर्मप्रसार
      3. उपदेश
      4. मानवतेचा बोध
    3. ‘अद्भुत केंद्र’ कशास म्हटले आहे?
      1. प्राचीन ग्रंथांना
      2. नालंदा, तक्षशीला विदयापीठांना
      3. भारतभूमीला
      4. महापुरुषांना
    4. येथील कसलेल्या जमिनीत काय पिकते?
      1. धान्य
      2. सोने
      3. मोती
      4. संपत्ती
    5. विदेशी लोकांनी भारतात येऊन काय केले?
      1. ज्ञान आणि वैभव प्राप्त करून घेतले
      2. नयांचे पाणी नेले
      3. वसाहती स्थापन करून व्यापार वाढविला
      4. भारतातील लोकांचे शोषण केले
    6. पाणिनी आणि चाणक्य कोणत्या विद्यापीठामध्ये अध्यापक होते?
      1. नालंदा
      2. शारदापीठ
      3. तक्षशीला
      4. बनारस
  2. दिलेल्या गद्य उताऱ्याच्या आधारे पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (कोणतेही 3) (3 × 1 = 3)
    1. लेखकाने कोणकोणत्या नद्यांचा उल्लेख केला आहे?
    2. चाणक्य कोण होते?
    3. जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ कोणते?
    4. कोणकोणत्या प्रतिभावंत कवींचा उल्लेख लेखकाने केला आहे?
Comprehension
Advertisements

Solution

    1. पृथ्वीचा
    2. मानवतेचा बोध
    3. नालंदा, तक्षशीला विदयापीठांना
    4. सोने
    5. ज्ञान आणि वैभव प्राप्त करून घेतले
    6. तक्षशीला
    1. लेखकाने गंगा, यमुना, कृष्णा, गोदावरी, कावेरी आणि नर्मदा या नद्यांचा उल्लेख केला आहे.
    2. चाणक्य अर्थशास्त्रज्ञ, राजकारणपटू व तक्षशीला विदयापीठाचे अध्यापक होते.
    3. जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ वेद, उपनिषदे आणि गीता हे आहेत.
    4. व्यास, भवभूती, कालिदास, ज्ञानेश्वर, तुकाराम, तुलसीदास यांसारख्या प्रतिभावंत कवींचा उल्लेख लेखकाने केला आहे.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Board Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×