English

ΔRST ~ ΔXYZ, ΔRST मध्ये RS = 4.5 सेमी, ∠RST = 40°, ST = 5.7 सेमी आणि RSXY=35 तर ΔRST व ΔXYZ काढा.

Advertisements
Advertisements

Question

ΔRST ~ ΔXYZ, ΔRST मध्ये RS = 4.5 सेमी, ∠RST = 40°, ST = 5.7 सेमी आणि `"RS"/"XY" = 3/5` तर ΔRST व ΔXYZ काढा.

Sum
Advertisements

Solution

 

कच्ची आकृती

विश्लेषण:

ΔRST ~ ΔXYZ   .....[पक्ष]

∴ ∠RST = ∠XYZ = 40° ....[समरूप त्रिकोणांचे संगत कोन]

तसेच, `"RS"/"XY" = "ST"/"YZ" = "RT"/"XZ"` ....(i) [समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू]

परंतु, `"RS"/"XY" = 3/5` ...(ii) [पक्ष]

∴ `"RS"/"XY" = "ST"/"YZ" = 3/5`  ....[(i) व (ii) वरून]

∴ `4.5/"XY" = 5.7/"YZ" = 3/5`

∴ `4.5/"XY" = 3/5`

∴ XY = `(4.5 xx 5)/3` = 7.5 सेमी

तसेच, `5.7/"YZ" = 3/5`

∴ YZ = `(5.7 xx 5)/3 = 9.5` सेमी

रचनेच्या पायऱ्या:  

क्र. ΔRST साठी क्र.   ΔXYZ साठी
i. 5.7 सेमी लांबीचा रेख ST काढा. i. 9.6 सेमी लांबीचा रेख YZ काढा.
ii. ST हा पाया धरून बिंदू S वरून 40° चा कोन करेल असा किरण काढा. ii. YZ हा पाया धरून बिंदू Y वरून 40° चा कोन करेल असा किरण काढा.
iii. या किरणावर S बिंदूपासून 4.5 सेमी लांबीचा कंस काढून त्याला R असे नाव द्या. iii. या किरणावर Y बिंदूपासून 7.5 सेमी लांबीचा कंस काढून त्याला X असे नाव द्या.
iv. बिंदू R आणि T जोडा. iv. बिंदू X आणि Z जोडा.

अशाप्रकारे, ΔRST व ΔXYZ हे इष्ट समरूप त्रिकोण मिळतात.

shaalaa.com
समरूप त्रिकोणाची रचना
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: भौमितिक रचना - सरावसंच 4.1 [Page 96]

APPEARS IN

Balbharati Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 4 भौमितिक रचना
सरावसंच 4.1 | Q 3. | Page 96

RELATED QUESTIONS

ΔPQR ~ ΔLTR, ΔPQR मध्ये PQ = 4.2 सेमी, QR = 5.4 सेमी, PR = 4.8 सेमी आणि `"PQ"/"LT"` = `3/4` तर ΔPQR व ΔLTR काढा.


पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.

व्यासाच्या अंत्यबिंदूतून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका परस्परांना ______ असतात. 


पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.

आकृतीमध्ये ΔABC ∼ ΔADE आहे, तर त्यांच्या संगत बाजूचे गुणोत्तर ______ आहे. 


पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.

ΔPQR ∼ ΔABC, `"PR"/"AC" = 5/7` तर ______ 


ΔABC ∼ ΔLMN, ΔABC मध्ये, AB = 5.5 सेमी, BC = 6 सेमी, CA = 5.5 सेमी, MN = 4.8 सेमी, तर ΔABC व ΔLMN काढा. 


ΔRHP ∼ ΔNED, ΔNED मध्ये, NE = 7 सेमी, ∠D = 30°, ∠N = 20° तसेच `"HP"/"ED" = 4/5,` तर ΔRHP काढा.


ΔABC ~ ΔPBR, BC = 8 सेमी, AC = 10 सेमी , ∠B = 90°, `"BC"/"BR" = 5/4`, तर ΔPBR काढा.


ΔAMT ~ ΔAHE, ΔAMT मध्ये, AM = 6.3 सेमी, ∠TAM = 50°, AT = 5.6 सेमी, `"AM"/"AH" = 7/5`, तर ΔAHE काढा. 


ΔSHR ∼ ΔSVU, ΔSHR मध्ये SH = 4.5 सेमी, HR = 5.2 सेमी, SR = 5.8 सेमी, `"HS"/"SV" = 3/5`, तर ΔSVU काढा.


ΔPQR मध्ये, ∠P = 40°, PQ ≅ PR, QR = 7 सेमी. ΔXYZ ∼ ΔPQR, XY:PQ = 3:2 असल्यास ΔXYZ काढा. 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×