English

पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा ६ दिवस अधिक लागतात. दोघांनी मिळून काम केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना ४ दिवस लागतात,

Advertisements
Advertisements

Question

पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा ६ दिवस अधिक लागतात. दोघांनी मिळून काम केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना ४ दिवस लागतात, तर ते काम एकट्यानेच पूर्ण करण्यास प्रत्येकास किती दिवस लागतील?

Sum
Advertisements

Solution

समजा, निशूला एक काम करण्यासाठी x दिवस लागतात.

∴ निशूचे एका दिवसाचे काम = `1/x`

तसेच, पिंटूला तेच काम पूर्ण करण्यासाठी (x + 6) दिवस लागतील.

∴ पिंटूचे एका दिवसाचे काम = `1/(x + 6)`

∴ एका दिवसात दोघांनी एकत्र मिळून केलेले काम = `(1/x + 1/(x + 6))`

आता, दोघांना मिळून ते काम पूर्ण करण्यासाठी 4 दिवस लागतात.

∴ दोघांनी एका दिवसात केलेले काम = `1/4`

दिलेल्या अटीनुसार, दोघे मिळून ते काम 4 दिवसांत पूर्ण करू शकतात. म्हणजे ते एका दिवसात `1/4` काम करू शकतात.

∴ `1/x + 1/(x + 6)= 1/4`

∴ `(x + 6 + x)/(x(x + 6)) = 1/4`

∴ `(2x + 6)/(x(x + 6)) = 1/4`

∴ 4(2x + 6) = x(x + 6)

∴ 8x + 24 = x2 + 6x

∴ x2 + 6x – 8x – 24 = 0

∴ x2 – 2x – 24 = 0 ...`[(-24= -6; 4),(-6xx4 = - 24),(- 6 + 4 = - 2)]`

∴ x2 – 6x + 4x – 24 = 0

∴ x(x – 6)+ 4(x – 6) = 0

∴ (x – 6) (x + 4) = 0

जर दोन संख्यांचा गुणाकार शून्य असेल, तर त्या दोन संख्यांपैकी किमान एक संख्या शून्य असते, या गुणधर्माच्या उपयोजनाने,

x – 6 = 0 किंवा x + 4 = 0

∴ x = 6  किंवा  x = - 4

परंतु, दिवसांची संख्या ऋण असू शकत नाही.

∴ x = 6  आणि  x + 6 = 6 + 6 = 12

∴ निशू व पिंटू या दोघांना एकट्यानेच काम पूर्ण करण्यास अनुक्रमे 6 दिवस व 12 दिवस लागतील.

shaalaa.com
वर्गसमीकरणाचे उपयोजन
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: वर्गसमीकरणे - सरावसंच 2.6 [Page 52]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2 वर्गसमीकरणे
सरावसंच 2.6 | Q 8. | Page 52

RELATED QUESTIONS

प्रगतीच्या 2 वर्षांपूर्वीच्या आणि 3 वर्षांनंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काढा.


दोन क्रमागत सम नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज 244 आहे, तर त्या संख्या शोधा.


विवेक, हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज `1/6` आहे, तर त्यांची आजची वये काढा.


एका नदीत, बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध 36 किमी जाऊन परत त्याच जागी येण्यास प्रतीकला 8 तास लागतात. बोटीचा संथ पाण्यातील वेग ताशी 12 किमी असल्यास नदीच्या प्रवाहाचा वेग काढा.


460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक येत असून बाकी 1 येते, तर भागाकार व भाजक किती?


मुकुंदजवळ सागरपेक्षा 50 रुपये अधिक आहेत. त्यांच्याजवळील रकमांचा गुणाकार 15,000 असेल, तर प्रत्येकाजवळील रक्कम किती?


तळवेल येथील शेतकरी श्री. दिनेश यांच्या आयताकृती शेतीची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा 10 मीटरने अधिक आहे. त्यांनी त्या शेतात पावसाचे पाणी पुनर्भरणासाठी शेताच्या रुंदीच्या `1/3` पट बाजू असणाऱ्या चौरसाकृती शेततळ्याची निर्मिती केली. तेव्हा मूळ शेताचे क्षेत्रफळ हे शेततळ्याच्या क्षेत्रफळाच्या 20 पट होते, तर त्या शेताची लांबी आणि रुंदी, तसेच शेततळ्याच्या बाजूची लांबी काढा.


एका बागेत 200 झाडे असून प्रत्येक रांगेतील झाडांची संख्या ओळीच्या संख्येपेक्षा 10 ने जास्त आहे, तर प्रत्येक रांगेतील झाडांची संख्या काढा.


460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या 9 पटीपेक्षा 2 ने अधिक येत असून बाकी 5 येते, तर भागाकार व भाजक किती?


एक टाकी दोन नळाच्या साहाय्याने 6 तासात पूर्ण भरते. ती टाकी भरण्यास लहान नळाला मोठ्या नळापेक्षा 5 तास जास्त लागतात तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×