Advertisements
Advertisements
Questions
O केंद्र व 3.4 त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळामध्ये 5.7 सेमी लांबीची जीवा MN काढा. वर्तुळाला बिंदू M व बिंदू N मधून स्पर्शिका काढा.
केंद्र O असलेले 3.4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्यामध्ये 5.7 सेमी लांबीची जीवा MN काढा. बिंदू M व बिंदू N मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
Advertisements
Solution
विश्लेषण:
`{:(रेख "ON" ⊥ रेषा "l"), (रेख "OM" ⊥ रेषा "m"):}}` [स्पर्शिका त्रिज्येला लंब असते.]
रेख ON व रेख OM ला अनुक्रमे बिंदू N व M वर लंब असणारी रेषा ही N व M बिंदूतून जाणारी वर्तुळाची अपेक्षित स्पर्शिका आहे.

कच्ची आकृती

रचनेच्या पायऱ्या:
- केंद्र O असलेले 3.4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा.
- 5.7 सेमी लांबीची जीवा MN काढा.
- किरण OM व ON काढा..
- किरण ON ला बिंदू N वर लंब असणारी रेषा l काढा.
- किरण OM ला बिंदू M वर लंब असणारी रेषा m काढा.
रेषा l आणि m या वर्तुळाच्या बिंदू N व M वरील अपेक्षित स्पर्शिका आहेत.
RELATED QUESTIONS
वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या ______ असते.
| O केंद्र व त्रिज्या 3 सेमी असलेले वर्तुळ काढा. |
| ↓ |
| वर्तुळावर कोणताही एक बिंदू P घ्या. |
| ↓ |
| किरण OP काढा. |
| ↓ |
| किरण OP ला P मधून लंब रेषा काढा. |
व्यासाच्या अंत्यबिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढण्यासाठी खाली दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.
| O केंद्र व त्रिज्या 3 सेमी असलेले वर्तुळ काढा. वर्तुळावर बिंदू A व B घेऊन व्यास AB काढा. |
| ↓ |
| किरण OA काढा. किरण OB काढा. |
| ↓ |
| किरण OA ला बिंदू A मधून लंब रेषा काढा. |
| ↓ |
| किरण OB ला बिंदू B मधून लंब रेषा |
C केंद्र व त्रिज्या 3.2 सेमी असलेले वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून 7.5 सेमी अंतरावरील P बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
4.2 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून 7 सेमी अंतरावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
ΔABC असा काढा, की AB = 8 सेमी, BC = 6 सेमी, ∠B = 90°. रेख BD हा कर्ण AC ला लंब काढा. बिंदू B, D व A मधून जाणारे वर्तुळ काढा. तसेच रेषा BC ही वर्तुळाची स्पर्शिका आहे याचे स्पष्टीकरण द्या.
4 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाला वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून दोन स्पर्शिका अशा काढा, की त्या स्पर्शिकांमधील कोन 60° असेल.
AB = 6 सेमी, ∠BAQ = 50°. A व B मधून जाणारे वर्तुळ असे काढा, की AQ ही वर्तुळाची स्पर्शिका असेल.
O केंद्र व त्रिज्या 3 सेमी त्रिज्येच्या वर्तुळात वर्तुळाबाहेरील P बिंदूतून 4 सेमी लांबीचा रेख PA हा स्पर्शिकाखंड काढा.
3.5 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळाला दोन स्पर्शिका अशा काढा, की त्या एकमेकींना लंब असतील.
