Advertisements
Advertisements
Question
O केंद्र व त्रिज्या 3 सेमी त्रिज्येच्या वर्तुळात वर्तुळाबाहेरील P बिंदूतून 4 सेमी लांबीचा रेख PA हा स्पर्शिकाखंड काढा.
Advertisements
Solution

कच्ची आकृती
आकृतीत दर्शवल्याप्रमाणे,
केंद्र O व त्रिज्या 3 सेमी असलेल्या वर्तुळाची PA ही स्पर्शिका आहे.
∴ OA ⊥ AP ….....[स्पर्शिका-त्रिज्या प्रमेय]
∴ ΔOAP मध्ये, ∠A = 90°
∴ OP2 = OA2 + AP2 ..............[पायथागोरसचे प्रमेय]
∴ = 32 + 42
∴ = 9 + 16
∴ = 25
∴ OP = 5 सेमी
∴ आपण वर्तुळाबाहेर P हा बिंदू अशाप्रकारे घेऊ, की OP = 5 सेमी आणि P वरून स्पर्शिका काढू.

रचनेच्या पायऱ्या:
- 3 सेमी त्रिज्येचे एक वर्तुळ काढा.
- बिंदू P असा घ्या, की OP = 5 सेमी
- रेख OP ला R बिंदूवर छेदणारा लंबदुभाजक काढा.
- केंद्र R व त्रिज्या OR घेऊन, वर्तुळाला बिंदू A वर छेदणारा कंस काढा.
- रेख AP काढा. रेख AP ही अपेक्षित स्पर्शिका आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
2.7 सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ काढा. या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढा.
वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या ______ असते.
त्रिज्या 3 सेमी असलेल्या वर्तुळास त्यावरील P या बिंदूतून स्पर्शिका काढा.
व्यासाच्या अंत्यबिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढण्यासाठी खाली दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.
| O केंद्र व त्रिज्या 3 सेमी असलेले वर्तुळ काढा. वर्तुळावर बिंदू A व B घेऊन व्यास AB काढा. |
| ↓ |
| किरण OA काढा. किरण OB काढा. |
| ↓ |
| किरण OA ला बिंदू A मधून लंब रेषा काढा. |
| ↓ |
| किरण OB ला बिंदू B मधून लंब रेषा |
केंद्र M व त्रिज्या 3.4 सेमी असलेल्या वर्तुळास त्यावरील P बिंदूतून स्पर्शिका काढा.
रेख AB 6 सेमी व्यास असलेले वर्तुळ काढा. व्यासाच्या अंत्यबिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
३ सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. चौरसाची प्रत्येक बाजू वर्तुळाला स्पर्श करेल असा चौरस काढा.
O केंद्र व त्रिज्या 2.8 सेमी असलेल्या वर्तुळाला P या बाह्य बिंदूतून वर्तुळाला PA व PB या स्पर्शिका अशा काढा, की ∠APB = 70°
बिंदू P हा रेषा AB पासून 6 सेमी अंतरावर आहे. बिंदू P मधून जाणारे 4 सेमी त्रिज्येचे असे वर्तुळ काढा, की रेषा AB ही वर्तुळाची स्पर्शिका असेल.
∠ABC = 60°. ∠ABC चा दुभाजक काढा. कोनदुभाजकावर बिंदू Q असा घ्या, की d(B,Q) = 8 सेमी. Q केंद्र असलेले असे वर्तुळ काढा, की किरण BA व किरण BC ला स्पर्श करेल. वर्तुळाची त्रिज्या व स्पर्शिकाखंडाची लांबी लिहा.
