Advertisements
Advertisements
Question
ΔABC असा काढा, की AB = 8 सेमी, BC = 6 सेमी, ∠B = 90°. रेख BD हा कर्ण AC ला लंब काढा. बिंदू B, D व A मधून जाणारे वर्तुळ काढा. तसेच रेषा BC ही वर्तुळाची स्पर्शिका आहे याचे स्पष्टीकरण द्या.
Advertisements
Solution

कच्ची आकृती
विश्लेषण:
रेख BD ⊥ रेख AC
∴ ΔADB हा काटकोन त्रिकोण आहे.
∴ रेख AB हा A, B व D बिंदूंमधून जाणाऱ्या वर्तुळाचा व्यास आहे.
∴ रेख MB ही वर्तुळाची त्रिज्या आहे.
∠MBC हा काटकोन त्रिकोण आहे. ….....[पक्ष]
∴ रेषा BC ही वर्तुळाची स्पर्शिका आहे.

रचनेच्या पायऱ्या:
- 8 सेमी लांबीचा रेख AB काढा.
- 6 सेमी लांबीचा रेख CB अशाप्रकारे काढा, की रेख CB ⊥ रेख AB.
- रेख AC जोडून ΔABC मिळवा.
- बिंदू B वरून कर्ण AC ला लंब काढा. या लंबाच्या AC वरील बिंदूला D नाव द्या.
- रेख AB चा दुभाजक काढा.
- M हे वर्तुळ व l(MB) ही त्रिज्या घेऊन बिंदू B, D आणि A मधून जाणारे वर्तुळ काढा.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
केंद्र P व त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील M बिंदूतून स्पर्शिका काढा.
वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या ______ असते.
9 सेमी लांबीचा रेख AB काढा. त्याचे 3:2 प्रमाणात विभाजन करा.
O केंद्र व त्रिज्या 3.5 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील P बिंदूतून स्पर्शिका काढा.
रेख AB 6 सेमी व्यास असलेले वर्तुळ काढा. व्यासाच्या अंत्यबिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
4 सेमी व 6 सेमी त्रिज्या असलेली व O केंद्र असलेली समकेंद्री वर्तुळे काढा. मोठ्या वर्तुळावरील कोणत्याही एका बिंदूतून लहान वर्तुळाला स्पर्शिका काढा. स्पर्शिकाखंडांची लांबी लिहा.
O केंद्र व 3.4 त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळामध्ये 5.7 सेमी लांबीची जीवा MN काढा. वर्तुळाला बिंदू M व बिंदू N मधून स्पर्शिका काढा.
C केंद्र व त्रिज्या 3.2 सेमी असलेले वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून 7.5 सेमी अंतरावरील P बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
3.5 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळाला दोन स्पर्शिका अशा काढा, की त्या एकमेकींना लंब असतील.
रेख AB = 7.5 सेमी लांबीचा काढा. केंद्र A असलेले वर्तुळ असे काढा, की वर्तुळाला बिंदू B मधून काढलेल्या स्पर्शिकाखंडाची लांबी 6 सेमी असेल.
