SSC (Marathi Medium)
Academic Year: 2025-2026
Date & Time: 11th March 2026, 11:00 am
Duration: 2h
Advertisements
सूचनाः
- सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
- गणकयंत्राचा वापर करता येणार नाही.
- प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवितात.
- प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे [प्रश्न क्र. 1 (अ)] मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जातील.
- आवश्यक तेथे शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या काढा.
वस्तूचा पृथ्वीवरील मुक्तिवेग Vesc = ______
`sqrt((GM)/R)`
`2sqrt((GM)/R)`
`sqrt((2GM)/R)`
`sqrt((GM)/(2R))`
Chapter:
आधुनिक आवर्तसारणीत अधातू ______ खंडात आहेत.
s
p
d
f
Chapter:
एका तारेचा रोध 100 Ω आहे. त्या तारेतून 1 A विद्युतधारा 10 सेकंद प्रवाहित केल्यास निर्माण झालेली उष्णता ______ असेल.
10 J
10000 J
0.1 J
1000 J
Chapter:
हिऱ्याचा अपवर्तनांक ______ आहे.
2.42
1.54
1.36
1.50
Chapter:
निरोगी मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर ______ आहे.
50 सेमी
75 सेमी
25 सेमी
22 सेमी
Chapter:
गटात न बसणारे घटक लिहाः
अन्न शिजणे, फळ परिपक्व होणे, दुधाचे दह्यात रूपांतर होणे, बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे.
Chapter:
पहिला सहसंबंध विचारात घेऊन दुसरा सहसंबंध पूर्ण करा:
वस्तुमान : किलोग्रॅम : : वजन : ______
Chapter:
खालील विधान चूक की बरोबर ते सांगा:
पाण्याचे आकारमान 4°C ला सर्वात जास्त असते.
Chapter:
जोड्या जुळवाः
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| थर्मामीटर | (अ) यांत्रिक ऊर्जा |
| (ब) तापमान मोजणे | |
| (क) विद्युतधारा मोजणे |
Chapter:
प्रकाशाच्या अपस्करणात जांभळ्या किरणांची तरंगलांबी किती असते?
Chapter:
Advertisements
धृवीय प्रदेशाच्या अभ्यासासाठी भूस्थिर उपग्रह का उपयोगी पडत नाहीत?
Chapter: [10] अवकाश मोहीमा
शास्त्रीय कारणे लिहा.
वनस्पतीजन्य तेलापासून वनस्पती तूप बनविताना निकेल हा उत्प्रेरक वापरतात.
Chapter:
शास्त्रीय कारणे लिहा.
गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते.
Chapter: [2] मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
विजेचा एक टंगस्टन दिवा घरी परिपथात बसविला आहे. घरगुती विद्युतपुरवठा 220 V इतक्या विद्युतविभवांतरावर चालतो. चालू केल्यावर जर 0.45 A. इतकी विद्युतधारा दिव्यातून वाहात असेल तर दिवा किती W विद्युतशक्तीचा असला पाहिजे? हा दिवा 10 तास चालू ठेवला तर किती युनिट वीज खर्च होईल?
Chapter:
खालील विधानाची सिद्धता लिहा.
इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन ह्या तीनही नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे.
Chapter: [6] प्रकाशाचे अपवर्तन
पृथ्वीचे वस्तुमान तिचे आहे त्या वस्तुमानपेक्षा चार पट असते तर 35780 किमी उंच कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहाला पृथ्वीभोवती 1 प्रदक्षिणा करण्यास किती कालावधी लागला असता?
Chapter: [10] अवकाश मोहीमा
खालील आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:

(अ) मोठ्या परीक्षानळीत फसफसून येणारा वायू कोणता आहे?
(ब) चुन्याच्या निवळीच्या रंगात काय बदल होतो?
(क) संबंधित रासायनिक समीकरण लिहा.
Chapter:
खालील उताऱ्याचे वाचन करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
| उष्ण व थंड वस्तूंमध्ये उष्णतेची देवाणघेवाण झाल्यास उष्ण वस्तूचे तापमान कमी होत जाते व थंड वस्तूचे तापमान वाढत जाते. जोपर्यंत दोन्ही वस्तूंचे तापमान सारखे होत नाही तोपर्यंत तापमानातील हा बदल होत राहतो. या क्रियेत गरम वस्तू उष्णता गमावते तर थंड वस्तू उष्णता ग्रहण करते. दोन्ही वस्तू फक्त एकमेकांमध्ये ऊर्जेची देवाणघेवाण करू शकतात अशा स्थितीत असल्यास म्हणजेच जर दोनही वस्तूंची प्रणाली वातावरणापासून वेगळी केल्यास प्रणालीमधून उष्णता आतही येणार नाही किंवा बाहेरही जाणार नाही. |
अ. उष्णतेचे स्थानांतरण कोठून कोठे होते?
ब. अशा स्थितीत आपल्याला उष्णतेच्या कोणत्या तत्त्वाचा बोध होतो?
क. ते तत्त्व थोडक्यात कसे सांगता येईल?
Chapter: [5] उष्णता
Advertisements
विद्युतचलित्राची सुबक नामनिर्देशित आकृती काढून तत्त्व लिहा.
Chapter:
\[\ce{{2NaOH} + {H_2SO_4} -> {Na_2SO_4} + {H_2O}}\]
या रासायनिक समीकरणातील अभिक्रियाकारके व उत्पादिते यातील मूलद्रव्यांच्या अणुसंख्येवरून समीकरण संतुलित आहे किंवा नाही हे सांगून खालील सारणी पूर्ण करा:
| मूलद्रव्य | अभिक्रियाकारके (डावी बाजू) अणुसंख्या |
उत्पादिते (उजवी बाजू) अणुसंख्या |
| Na | ______ | 2 |
| O | ______ | ______ |
| H | ______ | ______ |
| S | 1 | ______ |
Chapter:
दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा.
दुसऱ्या व तिसऱ्या आवर्तांमधील धातुसदृश
Chapter: [2] मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा.
तिसऱ्या आवर्तामधील अधातू
Chapter: [2] मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा.
संयुजा 4 असलेली दोन मूलद्रव्ये
Chapter: [2] मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
खालील तक्त्यातील तीनही स्तंभातील नोंदीमधील संबंध लक्षात घेऊन त्याप्रमाणे तक्ता परत लिहा:
| I | II | III |
| (अ) वजन | m/s2 | केंद्राजवळ शून्य |
| (ब) गुरुत्व त्वरण | Nm2/kg2 | संपूर्ण विश्वात सारखे |
| (क) गुरुत्व स्थिरांक | N | ठिकाण परत्वे बदलते |
Chapter:
कोणत्या परिस्थितीत मृगजळ दिसते? तसेच अशाच प्रकाराचे एक उदाहरण लिहा.
Chapter:
अंतर्वक्र भिंगाद्वारे मिळणारी पदार्थांची प्रतिमा दर्शवणारी आकृती काढा व नावे द्या.
Chapter:
अंतर्वक्र भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमेचे स्वरूप लिहा.
Chapter:
एका अंतर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर 25 सेमी आहे. त्यावरून भिंगाची शक्ती काढा.
Chapter:
ॲल्युमिनिअमच्या निष्कर्षणातील मुख्य पायऱ्या स्पष्ट करा.
Chapter:
ॲल्युमिनाचा विलयबिंदू किती आहे? तो कमी करण्यासाठी काय करतात?
Chapter:
शास्त्रीय कारणे लिहा.
ॲल्युमिनाच्या विद्युत अपघटनामध्ये वेळोवेळी धनाग्र बदलण्याची आवश्यकता असते.
Chapter: [8] धातुविज्ञान
Other Solutions
Submit Question Paper
Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help studentsonly jpg, png and pdf files
Maharashtra State Board previous year question papers 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १] with solutions 2025 - 2026
Previous year Question paper for Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] -2026 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
By referring the question paper Solutions for Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी].
How Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
