(English Medium)
Academic Year: 2024-2025
Date & Time: 25th February 2025, 11:00 am
Duration: 3h
Advertisements
- Answers to this paper must be written on the paper provided separately.
- You will not be allowed to write during the first 15 minutes.
- This time is to be spent in reading the question paper.
- The time given at the head of this Paper is the time allowed for writing the answers.
- This paper comprises two Sections; Section A and Section B.
- Attempt all the questions from Section A.
- Attempt four questions from Section B, answering at least one question each from the two books you have studied and any two other questions from the same books that you have compulsorily chosen.
- The intended marks for questions or parts of questions are given in brackets [].
खालील दिलेल्या विषयावर सुमारे 250 शब्दांचा मराठीत संक्षिप्त निबंध लिहा:
मॉल (Mall) आपल्या जीवनाची आवश्यक बाजू - मॉलमध्ये जाऊन खरेदी करणे म्हणजे आनंद! आपणही अशी खरेदी करण्यासाठी मॉलमध्ये जात असाल - आपल्या पारंपारिक बाजारपेठांमध्ये केलेली खरेदी व मॉलमध्ये केलेली खरेदी यात कोणता फरक आपणास जाणवतो?
Chapter:
खालील दिलेल्या विषयावर सुमारे 250 शब्दांचा मराठीत संक्षिप्त निबंध लिहा:
प्रत्येकास कोणता ना कोणता छंद (Hobby) असतोच. छंद म्हणजे नेमके काय? तुम्हीही एखादा छंद जपला असेलच! कोणता आहे तुमचा छंद? .... तुम्हाला तो कसा जडला? तुम्ही तो कसा जपता? दिवसभरात त्यासाठी तुम्ही किती वेळ देता? जीवनात कोणती शिकवण - मिळाली ........... कोणता फरक आपणास जाणवतो ह्या आपल्या अनुभवाबद्दल लिहा.
Chapter:
खालील दिलेल्या विषयावर सुमारे 250 शब्दांचा मराठीत संक्षिप्त निबंध लिहा:
प्रत्येकाच्या जीवनात आपल्या कुटुंबाचा फार मोठा प्रभाव असतो. आपले कुटुंब - कुटुंबातील व्यक्ती, त्यांच्यातील संवाद - एकमेकांविषयी संवेदना - प्रसंगी त्याग करण्याची तयारी. ह्यामुळे आपल्यावर संस्कार होत असतात - आपले अनुभव - आपले कृटुंब - याविषयी लिहा.
Chapter:
खालील दिलेल्या विषयावर सुमारे 250 शब्दांचा मराठीत संक्षिप्त निबंध लिहा:
प्रदूषणाची समस्या आम्हीच निर्माण केलेली आहे - म्हणून प्रदूषण थांबवणे ही आमची जबाबदारी आहे!
Chapter:
खालील दिलेल्या विषयावर सुमारे 250 शब्दांचा मराठीत संक्षिप्त निबंध लिहा:
पुढे दिलेले चित्र पहा व त्याआधारे आपल्या मनात येणाऱ्या विचारांचे निबंध/गोष्ट स्वरूपात वर्णन करा.

Chapter:
खाली दिलेल्या विषयावर सुमारे 120 शब्दांपर्यंतचे पत्र मराठीत लिहा:
आपण विविध खाद्यपदार्थ तयार करायला शिकला, शाळेतील ‘पाककृती स्पर्धेत’ आपण पहिले बक्षीस मिळवले याविषयी आपणास फार आनंद झालेला आहे. याविषयीचे पत्र आपल्या गावी राहणाऱ्या आजीस लिहा.
Chapter:
खाली दिलेल्या विषयावर सुमारे 120 शब्दांपर्यंतचे पत्र मराठीत लिहा:
आपल्या शहरात जागोजागी अनावश्यक फलक (Hoardings) लावलेले आहेत. यामुळे शहर अस्वच्छ दिसते. काही फलक धोकादायक अवस्थेत आहेत, ज्यामुळे अपघातही झालेले आहेत याविषयी आपल्या शहरातील महानगरपालिकेस पत्र लिहा व हे फलक काढून टाकण्याची विनंती करा.
Chapter:
खाली दिलेला उतारा नीट काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे तुमच्या स्वत:च्या शब्दांत मराठीत लिहा:-
|
अकबर बादशहाच्या राज्यात किशन व केशव नावाचे दोन शेतकरी राहत होते. ते एकमेकांचे शेजारी होते. त्यांच्या शेताच्या मध्यभागी एक आंब्याचे झाड होते. ते विशाल झाड, पिकलेल्या आंब्यांनी पूर्ण भरलेले होते. किशन त्या पिकलेल्या आंब्यांपैकी काही आंबे घेणार तोच केशव तेथे आला आणि जोरात ओरडून म्हणाला, “थांब. त्यांना स्पर्श करू नकोस. हे झाड माझे आहे.” हे ऐकताच किशन रडकुंडीला येऊन म्हणाला, “नाही .... हे झाड माझे आहे.” दोघांमध्ये बराच मोठा वाद झाला. त्याचा काहीच निर्णय लागेना तेव्हा शेवटी किशन म्हणाला, “चल, आपण बिरबलाकडे जाऊ. तोच आपल्याला योग्य न्याय देईल.” किशन व केशव दोघेही ‘योग्य न्याय’ मिळविण्यासाठी बिरबलाकडे आले. केशव म्हणाला, “बिरबल महाराज, माझ्या शेताच्या सीमेवर एक मोठे आंब्याचे झाड आहे. ते पहिल्यापासूनच माझे होते; पण आता हा किशन त्याच्यावर त्याचा हक्क दाखवत आहे.” यावर किशन म्हणाला, “नाही महाराज ते झाड माझेच आहे. ते अगदी लहानसे रोप असल्यापासून मी त्याला पाणी घालत आलो आहे.” बिरबल क्षणभर विचार करून म्हणाला, “या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावणे कठीण आहे. मी तुम्हाला आज्ञा देतो की तुम्ही त्या झाडावरचे सगळे आंबे काढा, मोजा व त्याची तुम्हा दोघांत समान वाटणी करून घ्या. आता राहिले झाड ..... ते तोडा व त्याची लाकडेही तुम्हा दोघांत समान संख्येने वाटून घ्या.” केशव सुखावला. त्याला हा योग्य न्याय वाटला. आंबेही मिळतील व झाडाची लाकडेही! ... मात्र किशनला दु:ख झाले. तो बिरबलाला म्हणाला, “महाराज गेली पंधरा वर्षे मी या झाडाला पाणी घालत आहे. त्याची पोटच्या पोराप्रमाणे काळजी घेत आहे. त्या झाडाला तोडणे मला पाहवणार नाही. त्यापेक्षा केशवलाच ते झाड घेऊ दे.” बिरबल मनोमन जे समजायचे ते समजला. त्याने सैनिकांना लगेच आज्ञा केली ... “हे झाड किशनला देण्यात यावे .... तोच त्याचा खरा मालक! नि केशवला चांगलीच शिक्षा करावी ...”. |
प्रश्न:
- “थांब. त्यांना स्पर्श करू नकोस.” असे कोण, कोणास व का म्हणाले? [2]
- किशनने व केशवने बिरबलाकडे कोणती तक्रार केली? [2]
- केशव का सुखावला? [2]
- बिरबलाला मनोमन नेमके काय समजले होते? कसे? - स्पष्ट करा. [2]
- बिरबलाने शेवटी कोणता न्याय दिला? - तो तुम्हाला पटतो का? ..... कारणासह स्पष्ट करा. [2]
Chapter:
गोप व तरूणी यांचे लिंग बदलल्यास अनुक्रमे उत्तर पुढील प्रमाणे असेल
तरूण व गोप
गोपी व तरूण
गोपी व तारूण्य
गोपि व तरूण
Chapter:
Advertisements
फुगा व चांदणी यांचे वचन बदलल्यास अनुक्रमे उत्तर पुढील प्रमाणे असेल
चांदण्या व फुगे
फुगा व चांदण्या
फुगे व चांदणी
फुगे व चांदण्या
Chapter:
अरण्य व वानर या शब्दांचे समानार्थी शब्द अनुक्रमे पुढील प्रमाणे असतील
कपि व कानन
कानन व कपी
अरण्य व कपी
कानन व वानर
Chapter:
कृत्रिम व आशा या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द अनुक्रमे पुढील प्रमाणे असतील
नैसर्गिक व निराशा
निराशा व नैसर्गिक
कृत्रिम व निराशा
नैसर्गिक व आशा
Chapter:
पाहण्यासाठी जमलेले लोक व स्वत:शी केलेले भाषण -- या शब्दसमूहासाठी एक शब्द अनुक्रमे पुढील प्रमाणे असतील
प्रेक्षक व संवाद
प्रेषक व स्वगत
प्रेक्षक व स्वागत
प्रेक्षक व स्वगत
Chapter:
लोकांना लघुउद्योग करण्यासाठी प्रोत्साहन दिले तर बेकारीचा व बेरोजगारीचा प्रश्न लवकरच सुटेल. - वाक्याचा प्रकार ओळखा.
आज्ञार्थी वाक्य
प्रश्नार्थी वाक्य
उद्गारार्थी वाक्य
विधानार्थी वाक्य
Chapter:
अपंग महिलेने एव्हरेस्ट शिखर सर करून जणू ______ योग्य वाक्प्रचार लिहा.
आकाश पाताळ एक केले
आकाशाला गवसणी घातली
अंग काढून घेतले
आभाळ फाटले
Chapter:
ढग गडगडले ______ पावसाला सुरुवात झाली ______ आईने कपाटातली छत्री काढली. योग्य अव्यय लिहा.
पण, व
वारंवार, साठी
आणि, म्हणून
म्हणून, कारण
Chapter:
खालील परिच्छेद वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मराठीत लिहा:-
|
काल रात्री धड झोप लागली नव्हती. काल परवापासून या दाढेने जीव खाल्लाय. डोळे रडून रडून आटल्यासारखे झालेत. हल्ली डोळयांपुढे केसांचा गुंता जसा फिरत असतो. डॉक्टर म्हणतात, ‘डोळयातलं लिक्विड गढूळ झालय’ असू दे .......... मरण्यापूर्वी ज्या यातना सोसाव्या लागतील त्या सोसायलाच हव्यात. ओग सुटलेत का कोणाला! बेघर |
प्रश्न:
- श्रीकांतने आपल्या आईचा विश्वासघात कशाप्रकारे केला? [2]
- कोणाला निरोप देताना सुधाताईचे डोळे पाणावले? का? [2]
- स्वतंत्रपणे आयुष्य जगणाऱ्या आईच्या कोणकोणत्या गोष्टींवर श्रीकांतने आक्षेप घेतला? [3]
- ‘तू काही सांगायचा हक्क गमावला आहेस,’ असे सुधाताई कोणास व का म्हणाल्या? [3]
Chapter:
खालील परिच्छेद वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मराठीत लिहा:-
|
“काय भानगड आहे हो?” कुणी तरी जाता जाता मोठ्यानं आणि कुत्सित सुरात विचारतं. मी वळून पहातो. कुत्सित प्रश्न करणारा माणूस जास्तच कूत्सित हसत लांब जातो. पोर तितक्यात माझ्या धोतराचा सोगा धरतं. “अरे हटू म्हटलं ना!” मी ओरडलो. आणि ओरडलो ही चूक केली हे एकदम वाढलेल्या भोवतालच्या गर्दीवरून जाणवतं. माणसाची गोष्ट |
प्रश्न:
- माणसाच्या कोटाची बाही कोणी, कधी व का पकडली? [2]
- बाही पकडणाऱ्याने माणसाकडे कशाची मागणी केली? ती माणसाने पूर्ण का केली नाही? [2]
- माणसाला कोणाचा राग आला होता? का? [3]
- माणसाभोवती कोणी गर्दी केली? का? [3]
Chapter:
Advertisements
खालील परिच्छेद वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मराठीत लिहा:-
|
नेहमीच्या खाक्यानं अप्पा म्हणाले, “ही अमला, माझी बायको आणि ही सावित्री माझी मुलगी. हे घर. सावी सगळे सांगेल. घर तुझं आहे.” आणि बूट वाजवीत ते ऑफिसच्या खोलीत चालू लागले. मला तसलं फारसं काहीच वाटलं नाही. मुलं ही जनरली स्वकेंद्रित असतात. मनात म्हटलं, चला. अप्पांची बायको आपल्याला काय त्याचं? इतकी माणसं घरात, त्यात आणखी एक ........... पाऊस आला मोठा |
प्रश्न:
- लोक सावित्रीची कणव का करत? वर्गात सावित्री रडायचे सोंग का करे? [2]
- सावित्री वेळोवेळी अम्मीचा कशाप्रकारे अपमान करत असे? [2]
- सावित्रीने मुंबईला जाण्याचा निर्णय का घेतला? [3]
- अम्मी गेल्यावर सावित्रीने दु:खाने आकांत का मांडला? [3]
Chapter:
खालील कवितेच्या ओळी वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मराठीत लिहा:-
|
मन वढाय वढाय मन |
प्रश्न:
- कवयित्री मनाला ‘ढोर’ आणि ‘वादळाची’ उपमा का देते? [2]
- कवयित्रीने मानवी मनाला ‘जह्यरी’ का म्हटले आहे? [2]
- कवयित्रीने मनाचा लहान - मोठेपणा कशाप्रकारे दाखवला आहे? [3]
- कवयित्रीने मनाविषयी कोणाला व कोणता प्रश्न विचारला आहे? [3]
Chapter:
खालील कवितेच्या ओळी वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मराठीत लिहा:-
|
“याच औषधावरी पुढे तो कसातरी जगला, प्रेमाचा गुलकंद |
प्रश्न:
- तरूणीचे मन जिंकण्यासाठी तरूणाची धडपड कशी चालू होती? [2]
- तरूणी त्याला कसा प्रतिसाद देत होती? तरूणाने त्याचा कोणता अर्थ लावला? [2]
- तरूणास भोवळ का आली? तरूणीने त्यावर कोणता उपाय सुचवला? [3]
- “प्रेमालाभ नच! गुलकंद तरी कशास हा दवडा?” असे म्हणणाऱ्या तरूणाची कोणती स्वभाववैष्टिये दिसून येतात? कवीला प्रस्तुत कवितेतून काय सांगायचे आहे? [3]
Chapter:
खालील कवितेच्या ओळी वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मराठीत लिहा:-
|
“जिथे भूमिचा पुत्र गाळील घाम जिथे राबती हात |
प्रश्न:
- शेतकऱ्यास ईश्वर कोणत्या रूपात व कोठे दिसतो? [2]
- ‘वसे तो सदा स्वेदगंगेकिनारी!’ कवीला प्रस्तुत ओळींतून काय सांगायचे आहे? [2]
- ईश्वर कोणाच्या घरी नांदतो? तो कशाचा भुकेला आहे? [3]
- प्रस्तुत कवितेतून कवीने काय सांगायचा प्रयत्न केलेला आहे? [3]
Chapter:
खालील परिच्छेद वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मराठीत लिहा:-
| माझी आई मनानं फार धार्मिक बाई होती. दारात आलेला भिक्षेकरी काही न घेता परत जाणं तिला मुळीच चालत नसे. गोसाव्याची हाक ऐकून आई उठली. बुचकुलीभर पीठ घेऊन उंबऱ्याशी आली. भगवा गोसावी काखेची झोळी फाकीत दोन पावलं पुढे झाला. पीठ झोळीत टाकून आई म्हणाली. “बाबा, काही विद्या शिकला आहेस, का नुसत्या दाढीजटा वाढवल्या आहेस?” |
प्रश्न:
- ओढयाकाठच्या घरात आईला कोणता आजार सुरू झाला? [2]
- आजार बरा करण्यासाठी आईने कोण-कोणते उपाय केले? [2]
- आईला गोसाव्याकडे पीठ मागण्याची वेळ का आली? [3]
- गोसाव्याने पीठ दिल्यावर पिठाचे पैसे देण्याविषयी आई गोसाव्याला काय म्हणाली? प्रस्तुत प्रसंगातून आईविषयी आपणास काय वाटते? [3]
Chapter:
खालील परिच्छेद वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मराठीत लिहा:-
| माझा भाऊ शिकायला गेला आणि चांगल्या तऱ्हेने कोर्स पार पाडून परत आला. तात्काळ त्याची बदली तालुक्याच्या गावी झाली. आईला आता, घरची उसाभर करायला, मुलांचं जेवणखाण प्रेमानं करायला घरात दुसरं माणूस हवं होतं. |
प्रश्न:
- आईने घरी येणाऱ्या गुरूजींना भावाविषयी काय सांगितले? गुरूजी हे काम का करू शकले नाही? [2]
- लेखकाचा भाऊ अस्वस्थ का झाला? असा कोणता प्रतिष्ठेचा प्रश्न त्याच्यासमोर होता? [2]
- हा प्रश्न घेऊन तो आईकडे का गेला? आईला त्याने कोणता मार्ग सुचवला? [3]
- आईने कोणत्या गोष्टीसाठी ह्या भावास नकार दिला? पुढे ह्या भावाचे लग्न थाटामाटात का झाले? [3]
Chapter:
खालील परिच्छेद वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मराठीत लिहा:-
| सुरुवातीचे काही दिवस तिला चुकल्यासारखं झालं; पण परिस्थितीशी जुळवून घेण्याचा गुणमाणसापाशी असतोच. शहरी संस्कृती आणि शहरी जीवन आईनं लवकरच पचनी पाडलं. आता थोरलाआणि मधला अशा तिच्या दोन्ही मुलांची घरं पुण्यात झाली होती. ती कधीमधी चार दिवस राहायला म्हणून माझ्याकडे यायची. |
प्रश्न:
- लेखकाच्या कोणत्या गोष्टी बघून आईला आनंद होत असे? [2]
- लेखकाच्या कोणत्या गोष्टींचे आईला आश्चर्य वाटे? [2]
- चार दिवसांतच आई लेखकाच्या घरातून का निघून जायची? दादांनी आयुष्यभर पुरणाची पोळी का खाल्ली नाही? [3]
- आईची कोणती इच्छा शेवटपर्यंत पूर्ण झाली नाही? का? लेखकास याविषयी वाईट का वाटते? [3]
Chapter:
खालील परिच्छेद वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मराठीत लिहा:-
| अप्पा | हो ना. म्हणूनच म्हणतो तुझं हे घराचं इतकं आहे तरी काय? |
| त्रिंबक | (गंभीर चेहरा करून खाली पाहत) आहे! |
| अप्पा | सांग की मला - |
| त्रिंबक | (एकदम) माझा मित्र म्हणायला असा तू एकटाच आहेस, अप्पा. आतापर्यंत मनातल्या मनातलं कुणालाच सांगितलेलं नव्हतं. पण तुला सांगतोच आता. आमच्या कोकणातल्या गावी ...... घर |
प्रश्न:
- कोकणातल्या गावचा कोणता प्रसंग त्रिंबकने अप्पांना सांगितला? या प्रसंगाचा तेव्हा त्याच्यावर कोणता परिणाम झाला होता? [2]
- हा प्रसंग पुन्हा त्रिंबकच्या डोळयांपुढे कधी व का लख्ख उभा राहिला? [2]
- या प्रसंगातील अनुभवांनी त्रिंबकवर कोणता परिणाम घडवला? का? [3]
- ‘त्या वेळी थट्टाच केली होती मी त्याची.’ असे कोण, कोणास व कशा-संदर्भात म्हणाले? [3]
Chapter:
खालील परिच्छेद वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मराठीत लिहा:-
| वसंत | हूं! डॉक्टर कापडिया तर ही स्वत:च्या घरची केस समजताहेत. |
| सविता | त्यांचा फार लोभ आहे रमेशवर त्यांच्याच उत्तेजनामुळे रमेश आज सतारवादक म्हणून पुढे आला. |
| वसंत |
होय ना! ... पण पुढे बिचाऱ्याचं हे असं होईल याची काय कल्पना त्यांना? अबोल झाली सतार |
प्रश्न:
- वसंत कोण आहे? तो सवितेस भेटायला कोठे आलेला आहे? का? [2]
- सवितेने ‘माहेरी’ यावे याविषयी तो सवितेस, रमेशविषयी काय सांगतो? [2]
- सवितेचे वडील कोण होते? वडिलांविषयी तिच्या मनात कोणता संशय आहे? का? [3]
- सविता वडिलांची माफी का मागते? वडील तिची कशाप्रकारे समजूत घालतात? [3]
Chapter:
खालील परिच्छेद वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मराठीत लिहा:-
| शास्त्री | (कपाळावर हात मारत) आता कुलूप मरू दे. चोरांनी काय काय पळवलं ते बघ आधी. (पाऊल पुढे टाकताच एका बोचक्याला अडकून शास्त्रीबुवा खाली पडतात. पडताच चोर चोर म्हणून किंचाळतात.) |
| बाई |
(एकदम दचकून) कुठाय चोर? चोरी झालीच नाही |
प्रश्न:
- शास्त्रीबुवांनी बाईना कोणते दागिने दिले होते? आपली हुशारी ते बाईसमोर कशाप्रकारे दाखवतात? [2]
- शास्त्रीबुवा व बाई कोठे गेले होते? चोपडे याविषयी त्यांना काय म्हणाले? [2]
- तरूणाने स्वत:ची ओळख काय म्हणून करून दिली? शास्त्रीबुवांनी कशाकशाची चोरी झाली अशी तक्रार केली? [3]
- तरूणाने झालेल्या चोरीविषयी काय सांगितले? त्याने सर्वांना कशाप्रकारे धमकावले? [3]
Chapter:
Other Solutions
Submit Question Paper
Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help studentsonly jpg, png and pdf files
CISCE previous year question papers ICSE Class 10 Marathi with solutions 2024 - 2025
Previous year Question paper for CISCE ICSE Class 10 -2025 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
By referring the question paper Solutions for Marathi, you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of CISCE ICSE Class 10 .
How CISCE ICSE Class 10 Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Marathi will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
