Advertisements
Advertisements
Question
खाली दिलेला उतारा नीट काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे तुमच्या स्वत:च्या शब्दांत मराठीत लिहा:-
|
अकबर बादशहाच्या राज्यात किशन व केशव नावाचे दोन शेतकरी राहत होते. ते एकमेकांचे शेजारी होते. त्यांच्या शेताच्या मध्यभागी एक आंब्याचे झाड होते. ते विशाल झाड, पिकलेल्या आंब्यांनी पूर्ण भरलेले होते. किशन त्या पिकलेल्या आंब्यांपैकी काही आंबे घेणार तोच केशव तेथे आला आणि जोरात ओरडून म्हणाला, “थांब. त्यांना स्पर्श करू नकोस. हे झाड माझे आहे.” हे ऐकताच किशन रडकुंडीला येऊन म्हणाला, “नाही .... हे झाड माझे आहे.” दोघांमध्ये बराच मोठा वाद झाला. त्याचा काहीच निर्णय लागेना तेव्हा शेवटी किशन म्हणाला, “चल, आपण बिरबलाकडे जाऊ. तोच आपल्याला योग्य न्याय देईल.” किशन व केशव दोघेही ‘योग्य न्याय’ मिळविण्यासाठी बिरबलाकडे आले. केशव म्हणाला, “बिरबल महाराज, माझ्या शेताच्या सीमेवर एक मोठे आंब्याचे झाड आहे. ते पहिल्यापासूनच माझे होते; पण आता हा किशन त्याच्यावर त्याचा हक्क दाखवत आहे.” यावर किशन म्हणाला, “नाही महाराज ते झाड माझेच आहे. ते अगदी लहानसे रोप असल्यापासून मी त्याला पाणी घालत आलो आहे.” बिरबल क्षणभर विचार करून म्हणाला, “या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावणे कठीण आहे. मी तुम्हाला आज्ञा देतो की तुम्ही त्या झाडावरचे सगळे आंबे काढा, मोजा व त्याची तुम्हा दोघांत समान वाटणी करून घ्या. आता राहिले झाड ..... ते तोडा व त्याची लाकडेही तुम्हा दोघांत समान संख्येने वाटून घ्या.” केशव सुखावला. त्याला हा योग्य न्याय वाटला. आंबेही मिळतील व झाडाची लाकडेही! ... मात्र किशनला दु:ख झाले. तो बिरबलाला म्हणाला, “महाराज गेली पंधरा वर्षे मी या झाडाला पाणी घालत आहे. त्याची पोटच्या पोराप्रमाणे काळजी घेत आहे. त्या झाडाला तोडणे मला पाहवणार नाही. त्यापेक्षा केशवलाच ते झाड घेऊ दे.” बिरबल मनोमन जे समजायचे ते समजला. त्याने सैनिकांना लगेच आज्ञा केली ... “हे झाड किशनला देण्यात यावे .... तोच त्याचा खरा मालक! नि केशवला चांगलीच शिक्षा करावी ...”. |
प्रश्न:
- “थांब. त्यांना स्पर्श करू नकोस.” असे कोण, कोणास व का म्हणाले? [2]
- किशनने व केशवने बिरबलाकडे कोणती तक्रार केली? [2]
- केशव का सुखावला? [2]
- बिरबलाला मनोमन नेमके काय समजले होते? कसे? - स्पष्ट करा. [2]
- बिरबलाने शेवटी कोणता न्याय दिला? - तो तुम्हाला पटतो का? ..... कारणासह स्पष्ट करा. [2]
Advertisements
Solution
- असे केशव किशनला म्हणाला.
कारण: त्यांच्या शेताच्या सीमेवर असलेल्या आंब्याच्या झाडाला खूप आंबे आले होते. किशन त्यातील काही पिकलेले आंबे काढण्यासाठी गेला असता, केशवने ओरडून त्याला थांबवले कारण केशवच्या मते ते झाड त्याचे होते. - किशन आणि केशव या दोघांनीही बिरबलाकडे आंब्याच्या झाडाच्या मालकी हक्काची तक्रार केली. दोघांचेही शेत एकमेकांना लागून होते आणि त्या सीमेवर असलेल्या विशाल आंब्याच्या झाडावर दोघांनीही आपला हक्क सांगितला होता. या वादाचा निर्णय होत नसल्याने ते ‘योग्य न्याय’ मिळवण्यासाठी बिरबलाकडे आले.
- जेव्हा बिरबलाने या वादावर उपाय म्हणून असे सुचवले की, “जर झाडाच्या मालकीचा निर्णय होत नसेल, तर आपण झाड कापून त्याचे दोन समान भाग करू आणि अर्धे-अर्धे वाटून घेऊ,” तेव्हा केशव सुखावला. त्याला वाटले की आता आपल्याला झाडाचा किमान अर्धा भाग तरी हक्काने मिळेल (तसेच तो झाडाचा खरा मालक नसल्यामुळे त्याला झाड कापण्याचे दुःख नव्हते).
- बिरबलाला मनोमन हे समजले होते की किशन हाच त्या झाडाचा खरा मालक आहे. जेव्हा बिरबलाने झाड कापण्याची आज्ञा दिली, तेव्हा केशव तयार झाला, पण किशनला खूप दुःख झाले आणि तो रडू लागला. त्याने झाड कापण्याऐवजी ते पूर्णपणे केशवला देण्याची तयारी दर्शवली, जेणेकरून झाड वाचेल. झाडावरचे हे प्रेम आणि ममता पाहून बिरबलाने ओळखले की खरा मालक आपल्या वस्तूचा नाश सहन करू शकत नाही.
- बिरबलाने झाडाचा खरा मालक म्हणून किशनच्या बाजूने निकाल दिला आणि केशवला खोटा दावा केल्याबद्दल शिक्षा सुनावली.
स्पष्टीकरण: हो, मला हा न्याय पूर्णपणे पटतो. कारण एखाद्या वस्तूचा खरा मालक त्या वस्तूवर जिवापाड प्रेम करतो. किशनने झाड वाचवण्यासाठी आपला मालकी हक्क सोडण्याची तयारी दर्शवली, यातूनच त्याची सत्यता सिद्ध झाली. ‘स्वार्थापेक्षा प्रेम मोठे असते’ हे बिरबलाने आपल्या चातुर्याने सिद्ध केले.
