English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 9th Standard

पुढील घटक (फूल) तुमच्याशी बोलत आहे, अशी कल्पना करून त्या घटकाचे (फुलाचे) आत्मवृत्त लिहा. माझी निर्मिती माझे सौंदर्य माझे महत्त्व माझे उपयोग माझे दु:ख

Advertisements
Advertisements

Question

पुढील घटक (फूल) तुमच्याशी बोलत आहे, अशी कल्पना करून त्या घटकाचे (फुलाचे) आत्मवृत्त लिहा.

Long Answer
Advertisements

Solution

फुलाचे आत्मवृत्त

नमस्कार, मी एक फूल. आजच्या प्रदर्शनात तुम्ही माझ्याकडे किती उत्सुकतेने पाहत आहात हे मला दिसत आहे आणि त्याचा मला खूप आनंद होत आहे. आज मी या प्रदर्शनातील फुलांचा राजा ठरलो आहे! पण माझे भवितव्यही मला माहीत आहे. दोन-चार दिवसांत मी सुकून जाणार आहे.

माझे जीवन खूपच अल्पकालीन असते. माझी उत्पत्ती मातीतील बियाण्यापासून सुरू होते. या बियाण्यामधून एक अंकुर उगवतो, जो पुढे एक रोप बनतो. हे रोप हळूहळू वाढत जाते. माझा जन्म या वाढलेल्या रोपावरील कळीच्या रूपात होतो. प्रारंभी मी खूप छोटा असतो, परंतु कालांतराने मी वाढतो. कळी पूर्ण फूल बनण्यासाठीही दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. फूल म्हणून माझा संपूर्ण विकास होण्यासुद्धा तितकाच कालावधी लागतो.

माझा रंग गुलाबी असला तरी गुलाबाचे इतरही अनेक रंग असतात जसे की पांढरा, पिवळा, केशरी इत्यादी. गुलाबाच्या उत्पत्तीसाठी काट्यांच्या मध्ये वाढणे आवश्यक असते. आयुष्यातील अडचणींना पेलणे हे जीवनाचे मूलभूत सिद्धांत आहे. इतरांना आनंद देणे हे आमच्या अस्तित्वाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

काही जण आम्हाला देवाच्या चरणात अर्पण करतात; तर काही आम्हाला केसात गुंफतात. आमच्यापासून गुलकंद बनवले जाते, आणि काही लोक आमचा वापर अत्तर किंवा परफ्यूम बनविण्यासाठी करतात. जर असे नाही झाले तर आमचा अंत सुकण्यानेच होतो. पण, जोपर्यंत आमचे जीवन आहे, तोपर्यंत आम्ही इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो; हा माझा तुम्हाला संदेश आहे. यातच आमच्या जीवनाची खरी किंमत आहे.

shaalaa.com
निबंध लेखन
  Is there an error in this question or solution?
Chapter 15: उपयोजित लेखन - निबंध लेखन [Page 52]

APPEARS IN

Balbharati Marathi Antarbharati (Composite) Standard 9 Maharashtra State Board
Chapter 15 उपयोजित लेखन
निबंध लेखन | Q २. | Page 52

RELATED QUESTIONS

‘पुस्‍तक प्रदर्शनी में एक घंटा’ विषय पर अस्‍सी से सौ शब्‍दों में निबंध लेखन कीजिए।


वैचारिक निबंध: अकाल: एक भीषण समस्या


आत्मकथात्मक निबंध: मैं हूँ भाषा


बढ़ते हुए प्रदुषण (वायु, ध्वनि) का स्वास्थ पर बुरा असर पड़ रहा है, विषय पर अपने विचार लिखिए |


‘वर्तमान समय में शांति के क्षेत्र में/पर्यावरण संरक्षण में भारत की भूमिका का महत्‍त्‍व’ विषय पर अस्‍सी से सौ शब्‍दों में निबंध लेखन कीजिए।


निम्नलिखित विषय पर लगभग ८० से १०० शब्दों में निबंध लिखिए:

पर्यावरण संतुलन


निम्नलिखित विषय पर 200 शब्दों में रचनात्मक लेखन लिखिए:

दुर्घटना से देर भली


निम्नलिखित विषय पर 200 शब्दों में रचनात्मक लेखन लिखिए:

जिन्हें जल्दी थी, वे चले गए


निम्नलिखित विषय पर 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए:

यदि मैं अध्यापक होता .....


निम्नलिखित विषय पर लगभग 70 से 80 शब्दों में निबंध लिखिए:

मैं पृथ्वी बोल रही हूँ...


निबंध लिखिए:

सफलता


निबंध लिखिए-

विद्यार्थी और अनुशासन


निम्नलिखित विषय पर 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए।

मेरा प्रिय खेल


दैनंदिनी (डायरी) तुमच्याशी बोलत आहे, अशी कल्पना करून तिचे आत्मकथन पुढील मुद्‌द्यांचा उपयोग करून लिहा.

  1. निर्मिती
  2. महत्त्व
  3. उपयोग
  4. इतरांची भावना
  5. आनंद
  6. खंत

‘यदि मैं शिक्षा मंत्री होता -----’ विषय पर लगभग सौ शब्‍दों में निबंध लिखिए।


निम्नलिखित विषय पर 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए:

वनों का महत्व


निम्नलिखित विषय पर 60 से 70 शब्दों में निबंध लिखिए:

पाठ्यपुस्तक की आत्मकथा


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×