Advertisements
Advertisements
Question
‘ॲनी सुलिव्हॅन नसत्या तर ‘हेलन’ घडली नसती’, विधानाची सत्यता पटवून द्या.
Advertisements
Solution
हेलनसारख्या दिव्यांग मुलांना शिक्षणात अनेक अडथळे येतात. खासकरून भाषा शिकताना अक्षर, शब्द यांची त्यांना ओळख करून देणे येथेच मोठा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे, अशा मुलांच्या गरजा समजून घेणारा शिक्षक असणे आवश्यक असते. ॲनी सुलिव्हॅन या अशाच शिक्षिका होत्या. शिकवण्याच्या आधी त्यांनी हेलनला मायेने आपलेसे केले. त्यानंतर नवनवीन शब्द शिकवतानाही त्यांनी तिच्या कलानुसार शिकवले. शिकवताना हेलनचा गोंधळ उडाल्यावरही त्यांनी संयम बाळगला. तिला केवळ शब्द ओळख न देता त्यांच्या अर्थाशी तिची ओळख करून दिली. त्यासाठी प्रत्यक्ष बाहुली हातात दिली, पाण्याला स्पर्श करून ‘वॉटर’ हा शब्द शिकवला. अशाप्रकारे, अज्ञानाच्या अंधारात हरवलेल्या हेलनला ज्ञानाचा मार्ग दाखवणाऱ्या ॲनी सुलिव्हॅन या हेलनसाठी ज्ञानदीप ठरल्या, म्हणूनच ‘ॲनी सुलिव्हॅन नसत्या, तर ‘हेलन’ घडली नसती’ हे वाक्य सार्थ ठरते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.
लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला, कारण ______.
शिरीषमधील तुम्हांला समजलेली गुणवैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.
‘बेटा, मी ऐकतो आहे!’ या कथेचे संवादरूपाने लेखन करा.
रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा.
भारतात सर्वांत पहिली रेल्वे ______ येथून सुटली.
वाक्य पूर्ण करा.
घाट उतरणीची सुखसोय नि सरबराई पाहण्याचे कंत्राट घेणारे -
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
मुनीम -
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
सरळमार्गी -
विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही या मताशी आपण सहमत आहात का? असल्यास अथवा नसल्यास तुमचे मत सकारण स्पष्ट करा.
‘सखू आजी कवितेत बोलते, कवितेत जगते’ हे विधान स्पष्ट करणारी पाठातील वाक्ये शोधा.
खालील मुद्द्याला अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.
आजीचा गोतावळा
‘बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
खालील चौकटीत संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा.
| संकल्पना | संकल्पनांचा अर्थ | |
| (१) | वसुधैव कुटुंबकम् वृत्ती | |
| (२) | अक्षरशत्रू कुलूप | |
| (३) | चोर कलेला आश्रय देत नाही | |
| (४) | माझ्या हौशीने मिळकतीचा बचाव केला |
सहसंबंध शोधा.
सावध : बेसावध : : विश्वासू : ______
चौकट पूर्ण करा.

चूक की बरोबर ते लिहा.
परसदारी पाण्याचा हापसा असलेल्या शेजाऱ्यांची बाग फुललेली होती.
लेखकाच्या मुलाने पारव्यांच्या जोडीचा आश्रय - त्यांचे घरटे वारंवार पाहिल्यामुळे पारव्याचे जोडपे हळूहळू दिसेनासे झाले. ही घटना तुम्हाला काय सांगते, ते स्पष्ट करा.
खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.
लेखक सातारा जिल्ह्यातील औंधला जायच्या विचारात होते.
आकृतिबंध पूर्ण करा.

चौकटीतील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.
| हिरमुसले होणे |
तुमच्या मते दिव्यांग मुलांना भाषाशिक्षणात येणारे संभाव्य अडथळे लिहा.
