English

मंडई बागायती शेतीची वैशिष्ट्ये लिहा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

मंडई बागायती शेतीची वैशिष्ट्ये लिहा.

Short/Brief Note
Advertisements

Solution

जगातील अनेक शहरांमध्ये लोकसंख्येचे आत्यंतिक केंद्रीकरण झालेले आहे. जास्त घनतेच्या शहरांमधील लोकांची विविध स्वरूपाची दैनंदिन गरज भागवण्यासाठी फुले, फळे, भाजीपाला, अंडी, दूध अशा वस्तूंचे उत्पादन घेण्यासाठी या शहरांच्या सीमावर्ती प्रदेशात शेती केली जाते. शहरातील लोकांचे राहणीमानही उच्च असते, तसेच त्यांची क्रयशक्ती जास्त असते. त्यामुळे शहराच्या आजूबाजूच्या प्रदेशात बाजाराभिमुख शेतीचा विकास होतो. या शेतीत भाजीपाला, फळे, फुले, दुग्ध व्यवसाय अशा वस्तूंचे उत्पादन घेतले जाते. या वस्तू शहरांना ट्रकमधून रस्ता मार्गाने जलदरीत्या पोहोचवल्या जातात. मराठीत शेत जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेणे, त्यासाठी भांडवलाचा अधिक वापर, मानवी श्रमाबरोबरच शास्त्रीय ज्ञान व तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर आणि खतांचा व जलसिंचनाच्या सुविधांचा मुक्त वापर, ही या शेती प्रकाराची वैशिष्ट्ये आहेत. जगातील बहुतांशी सर्वच शहरांच्या आजूबाजूच्या प्रदेशात अशाप्रकारे मंडई शेतीचा विकास झाला आहे.

shaalaa.com
प्राथमिक व्यवसाय - शेती
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: प्राथमिक आर्थिक क्रिया - स्वाध्याय [Page 41]

APPEARS IN

Balbharati Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 4 प्राथमिक आर्थिक क्रिया
स्वाध्याय | Q ६. ३) | Page 41

RELATED QUESTIONS

विस्तृत व्यापारी शेतीची वैशिष्ट्ये ______.


सांगड घालून साखळी पूर्ण करा:

‘अ’ स्तंभ ‘ब’ स्तंभ ‘क’ स्तंभ
सखोल उदरनिर्वाह शेती डॉगर बँक शेतीचा आकार लहान
पंपाज गवताळ प्रदेश किनाऱ्यापासून दूर, खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन प्रतिकूल परिस्थिती
मत्स्यक्षेत्र तांदूळ बॉम्बे हाय
फळे, कंदमुळे गोळा करणे घनदाट वने ईशान्य अटलांटिक महासागर
खाणकाम व्यापारी पशुपालन दक्षिण अमेरिका

मळ्याची शेती


भौगोलिक कारणे दया.

भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.


विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा प्रकार आहे.


फरक सांगा.

मळ्याची शेती आणि विस्तृत व्यापारी शेती.


सखोल उदरनिर्वाह शेतीबद्दल माहिती लिहा.


शेती व्यवसायात खंडनिहाय गुंतलेल्या लोकसंख्येची २०१८ सालची आकडेवारी खालील तक्त्यात दिलेली आहे. त्या आधारे सुयोग्य आलेख काढून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

खंड प्राथमिक व्यवसायात गुंतलेली लोकसंख्येची टक्केवारी (सन २०१८)
युरोप ७.९१
आशिया २४.४९
उत्तर अमेरिका १४.९३
दक्षिण अमेरिका १४.९४
आफ्रिका ४७.२८
ऑस्ट्रेलिया २७.७९

संदर्भ स्रोत: FAO- २०१८

  1. कोणत्या खंडात १०% पेक्षा कमी लोकसंख्या शेती व्यवसायामध्ये कार्यरत आहे?
  2. कोणत्या खंडात ४०% पेक्षा जास्त लोकसंख्या शेती व्यवसायामध्ये कार्यरत आहे?
  3. दिलेल्या आकडेवारीकडे बघता, या खंडांना तिथल्या आर्थिक विकासाच्या स्तरानुसार चढत्या क्रमाने लावता येईल काय?

विस्तृत व्यापारी धान्य शेतीचा आकार लहान असतो.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×