Advertisements
Advertisements
Question
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.
खोद आणखी थोडेसे
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (1)
- प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (1)
- प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (2)
Advertisements
Solution
- कवयित्री - आसावरी काकडे
- जीवनात प्रयत्नशीलता व सकारात्मक दृष्टिकोन यांना खूप महत्त्व आहे. आयुष्य भरभरून जगण्यासाठी, येणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी हे गुण आवश्यक असतात. ध्येय साध्य करण्यासाठी येणाऱ्या अडचणींनी न डगमगता संयम राखून आपण जिद्दीने, हिमतीने कार्यरत राहावे. नेहमी चांगुलपणावर विश्वास ठेवावा. वास्तव स्वीकारावे. कोणत्याही भ्रमात राहू नये. कष्ट करावे, चिकाटीने पुढे पुढे जात राहावे असा संदेश प्रस्तुत कवितेतून व्यक्त होतो.
- 'खोद आणखी थोडेसे' या कवितेतून कवयित्री आपल्या मनावर सकारात्मकता व प्रयत्नवाद या मूल्यांचा संस्कार उमटवते. याकरता ती खोदण्याच्या क्रियेचे, झऱ्याचे समर्पक उदाहरण देते. कमीत कमी शब्दांत अर्थपूर्ण आशय व्यक्त करण्याचे कवयित्रीचे कौशल्य मनाला भावते. छोट्या छोट्या काव्यपंक्ती वाचताना कविता नादमधुर वाटते. कविता अष्टाक्षरी छंदात म्हणजेच प्रत्येक ओळीत आठ अक्षरे असून, प्रत्येक कडव्यातील दुसऱ्या व चौथ्या ओळींत यमक गुंफलेली आहेत. कवितेत एक आंतरिक लय निर्माण करण्यास ते कारणीभूत ठरले आहे. त्यामुळे, ती गाता येते. या सर्व कारणांमुळे ही कविता मला फार आवडते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
‘खोदणे’ या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे ______
गाणे असते मनी म्हणजे ______
कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.
संयमाने वागा - ______
कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.
सकारात्मक राहा - ______
कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.
उतावळे व्हा - ______
कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.
चांगुलपणावर विश्वास ठेवा - ______
कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.
नकारात्मक विचार करा - ______
कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.
संवेदनशीलता जपा - ______
कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.
जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास कायम ठेवा - ______
कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.
नवनिर्मितीवर विश्वास ठेवा - ______
कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.
धीर सोडू नका - ______
खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘झरा लागेलच तिथे, खोद आणखी जरासे’
‘गाणे असते गं मनी’, या ओळीतील तुम्हांला समजलेला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश स्पष्ट करा.
‘परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही’, याबाबतीत तुम्ही घेतलेला अनुभव लिहा.
खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
मूठ मिटून कशाला
म्हणायचे भरलेली
उघडून ओंजळीत
घ्यावी मनातली तळी
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. (२)
- नकारात्मक विचार करा. - ___________
- जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास कायम ठेवा - _________
|
खोद आणखी थोडेसे घट्ट मिटू नये ओठ मूठ मिटून कशाला झरा लागेलच तिथे |
2. तक्ता पूर्ण करा. (२)
कवयित्रीच्या मते काय करावे व काय करू नये ते लिहा.
| काय करावे. | काय करू नये. |
| 1) | 1) |
| 2) | 2) |
पुढील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.
'झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे
उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे!'
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.
खोद आणखी थोडेसे
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय (१)
- प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)
