Advertisements
Advertisements
Question
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.
वस्तू
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (1)
- प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (1)
- प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (2)
Advertisements
Solution
- कवी - द. भा. धामणस्कर
- 'वस्तू' या कवी द. भा. धामणस्कर लिखित कवितेतून निर्जीव वस्तू यासुद्धा मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक असतात याची जाणीव करून दिली आहे. या वस्तूंची आपण प्रेमाने, स्नेहाने जपणूक केली पाहिजे असा विचार येथे मांडला आहे. जरी त्यांना मानवी भावना नसल्या, तरीही त्यांना मानाने, लाडाने वागवावे, जपावे व त्यांच्याबद्दल मनात कृतज्ञता बाळगावी असे कवी म्हणतात. वर्षानुवर्षे आपल्या घरात राहिलेल्या या वस्तूंना कृतज्ञतेने निरोप देण्याचा त्यांचा हक्क आपण जपला पाहिजे, असा संदेश प्रस्तुत कवितेतून व्यक्त होतो.
- 'वस्तू' ही कविता मला फार आवडते कारण निर्जीव वस्तूंकडेही संवेदनशीलपणे पाहण्याचा दृष्टिकोन ही कविता आपल्याला देते. वस्तूंनाही माणसांसारखे जिवंत अस्तित्व, मन, आवडीनिवडी, हक्क असतात. असा वेगळा आशय कवी सहजपणे वाचकांसमोर मांडतात. मुक्तछंदात मांडलेली ही कविता तिच्यातील शब्दांच्या सामर्थ्यामुळे अलगदपणे वाचकांच्या मनात उतरते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

कारणे लिहा.
वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत, कारण ______
कारणे लिहा.
वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही, कारण ______
कवितेतील खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा.
वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते
असल्यासारखे वागलो तर वस्तू
प्रचंड सुखावतात.
‘वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची’ याबाबतचा तुमचा दृष्टिकोन सांगा.
तुमचा वर्गमित्र वर्गखोली/शालेय परिसरातील वस्तूचे नुकसान करत आहे, या प्रसंगी तुम्ही काय कराल ते सांगा.
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.
वस्तू
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) आकृतिबंध पूर्ण करा. (२)
i. वस्तूंजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी-
- ____________
- ____________
२) मानव व वस्तू यांच्यातील समान भावना - (2)
| मानव | |
| वस्तू |
| वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त 'आपल्या मानलेल्या' जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन. त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. |
३) कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ लिहा. (२)
त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून
निष्कासित न होण्याची हमी द्या.
४) काव्यसाैंदर्य लिहा. (२)
वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची याबाबत तुमचा दृष्टिकोन सांगा.
पुढील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या,
तरीही बरोबरीचा मान द्यावा त्यांना.
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) आकृतिबंध पूर्ण करा. (२)
- वस्तूंना या गोष्टी नकोत- ______
- वस्तूना याची हमी हवी- ______
२) उत्तरे लिहा. (२)
वस्तूंना असे ठेवावे.
- ____________
- ____________
| वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त 'आपल्या मानलेल्या' जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन. त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. |
३) कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ लिहा. (२)
वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन.
त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह
४) काव्यसाैंदर्य लिहा. (२)
कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क
शाबूत ठेवावा
पुढील ओळींचे रसग्रहण करा.
वस्तूंना जीव नसेल कदाचित, पण
जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना.
पुढीलपैकी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
वस्तू
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेतील विषय. (१)
- दोन शब्दांचे अर्थ (२)
अ) डचमळणे -
ब) रणशिंग -
खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
| क्र. | मुद्दे | वस्तू |
| 1. | प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - | |
| 2. | कवितेचा विषय - | |
| 3. | शब्दांचे अर्थ लिहा. | i. स्नेह - ______ |
| ii. निखालस - ______ |
