English

पुढील ओळींचे रसग्रहण करा. वस्तूंना जीव नसेल कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

पुढील ओळींचे रसग्रहण करा. 

वस्तूंना जीव नसेल कदाचित, पण
जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना.

Answer in Brief
Advertisements

Solution

'वस्तू' या कवितेतून कवी द. भा. धामणस्कर यांनी निर्जीव वस्तूंचे आपल्या जीवनातील महत्त्व टिपले आहे. त्यांच्याशी असलेला स्नेह आपण प्रत्येकाने जपावा असा विचार त्यांनी व्यक्त केला आहे.

कवी म्हणतात, की वस्तू जरी निर्जीव दिसत असल्या तरी त्यांना जीव नसल्यासारखे वागवणे अयोग्य ठरेल. वस्तू या मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केल्या गेल्या आहेत. त्या आपली सेवा करतात, आपल्या कामी येतात. आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या या वस्तूंशी प्रेमाने, आदराने वागले गेले, तर त्या सुखावतात. हे लक्षात घेऊन त्यांना जीव नसल्यासारखे वागवू नये असा आशय या काव्यपंक्तींतून कवी व्यक्त करत आहे.

कोणतीही वस्तू निर्जीव असली तरी ती मानवी भावभावनांशी जोडली गेल्यावर अनमोल ठरते. व्यक्ती व ती वस्तू यांच्यात एक नाते तयार होते. ही वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देते. तिलाही तिचे स्वतंत्र स्थान/अस्तित्व आहे, तिलाही भावभावना आहेत, असा संवेदनशील भाव कवी प्रस्तुत काव्यपंक्तींद्वारे व्यक्त करत आहे.

प्रस्तुत ओळींमध्ये चिंतनशीलता, भावनोत्कटता व प्रांजळपणा हे विशेष जाणवतात. ही कविता मुक्तछंदातील रचना असून तिचे स्वरूप निवेदनात्मक आहे. साध्या, सोप्या भाषेतून अनोखा आशय कवीने यात मांडला आहे.

shaalaa.com
वस्तू
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: वस्तू - कृती क्रमांक २

APPEARS IN

SCERT Maharashtra Marathi 10 Standard SSC
Chapter 6 वस्तू
कृती क्रमांक २ | Q 2. (इ)

RELATED QUESTIONS

आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


कारणे लिहा.

वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत, कारण ______ 


कारणे लिहा.

वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही, कारण ______ 


कवितेतील खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा.

वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते
असल्यासारखे वागलो तर वस्तू
प्रचंड सुखावतात.


‘वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची’ याबाबतचा तुमचा दृष्टिकोन सांगा.


तुमचा वर्गमित्र वर्गखोली/शालेय परिसरातील वस्तूचे नुकसान करत आहे, या प्रसंगी तुम्ही काय कराल ते सांगा.


खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.

वस्तू

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
  2. प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
  3. प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)

पुढील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या,
तरीही बरोबरीचा मान द्यावा त्यांना.


खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.

वस्तू

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री.  (1)
  2. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (1)
  3. प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा.  (2)

पुढीलपैकी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

वस्तू

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
  2. प्रस्तुत कवितेतील विषय. (१)
  3. दोन शब्दांचे अर्थ (२)
    अ) डचमळणे -
    ब) रणशिंग -

खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.

क्र. मुद्दे वस्तू
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री -  
2. कवितेचा विषय -  
3. शब्दांचे अर्थ लिहा. i. स्नेह - ______
ii. निखालस - ______

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×