Advertisements
Advertisements
Question
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(1) कवितेच्या आधारे खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. (2)
- सकारात्मक राहा.
- उतावळे व्हा.
- खूप हुरळून जा.
- संवेदनशीलता जपा.
|
खोद आणखी थोडेसे घट्ट मिटू नये ओठ मूठ मिटून कशाला झरा लागेलच तिथे |
(2) कवितेतील खालील संकल्पना आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. (2)
| कवितेतील संकल्पना | संकल्पनेचा अर्थ |
| (1) मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली | (i) मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे. |
| (2) उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी | (ii) सगळे लोक फसवे नसतात. |
| (iii) भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत. |
(3) खालील पद्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. (2)
खोद आणखी थोडेसे
खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी
खोटी नसतात नाणी.
(4) काव्यसौंदर्य (2)
‘झरा लागेलच तिथे, खोद आणखी जरासे’, या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
Advertisements
Solution
(1)
- हे विधान योग्य आहे.
- हे विधान अयोग्य आहे.
- हे विधान अयोग्य आहे.
- हे विधान योग्य आहे.
(2)
| कवितेतील संकल्पना | संकल्पनेचा अर्थ |
| (1) मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली | (iii) भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत. |
| (2) उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी | (i) मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे. |
(3) निराश होऊ नकोस. जमीन खणत राहा. आणखी थोडेसे खोड. जमिनीखाली नक्कीच तुला पाणी मिळेल. जिद्दीने प्रयत्न कर. जीवन जगताना हिंमत सोडू नको. सर्व माणसे स्वार्थी नसतात. काही प्रामाणिक माणसेही जगात असतात, हा विश्वास मनात असू दे.
(4) कोणतेही कार्य करताना धीर सोडू नये. खोल खोल मातीखाली निर्मळ झरा असतो. तो प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्न करून आणखी थोडेसे खोदावे लागते. हतबल न होता, हिंमत न हारता प्रयत्नरत असावे. दु:खाच्या मातीच्या जाड थराखाली सुखाचा, आनंदाचा अक्षय झरा असतोच. म्हणून निराश न होता ओठ घट्ट मिटून खोदण्याचे म्हणजेच सुख धुंडाळण्याचे कार्य मध्येच थांबवू नये.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
‘खोदणे’ या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे ______
कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.
संयमाने वागा - ______
कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.
सकारात्मक राहा - ______
कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.
उतावळे व्हा - ______
कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.
चांगुलपणावर विश्वास ठेवा - ______
कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.
नकारात्मक विचार करा - ______
कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.
खूप हुरळून जा - ______
कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.
जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास कायम ठेवा - ______
कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.
जुन्याच निर्मितीवर विश्वास ठेवा - ______
कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.
यशाचा विजयोत्सव करा - ______
खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘झरा लागेलच तिथे, खोद आणखी जरासे’
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
खोद आणखी थोडेसे
- प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा. (२)
- प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. (२)
1. कलंक - ___________
2. सकलकामना - __________
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. आकृती पूर्ण करा. (२)

2. योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा. (२)
खोदणे या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे ___________
i. विहीर आणखी खोदणे.
ii. जिद्दीने आणखी प्रयत्न करणे.
iii. घरबांधणीसाठी खोदणे.
iv. वृक्षलागवडीसाठी खोदणे.
|
खोद आणखी थोडेसे घट्ट मिटू नये ओठ मूठ मिटून कशाला झरा लागेलच तिथे |
3. पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा. (२)
खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी.
4. काव्यसाैंदर्य. (२)
'उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे' या काव्यपंक्तीतील विचारसाैंदर्य स्पष्ट करा.
खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
मूठ मिटून कशाला
म्हणायचे भरलेली
उघडून ओंजळीत
घ्यावी मनातली तळी
पुढील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.
'झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे
उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे!'
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.
खोद आणखी थोडेसे
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (1)
- प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (1)
- प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (2)
खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
खोद आणखी थोडेसे
खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी
खोटी नसतात नाणी.