हिंदी

खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा. खोद आणखी थोडेसे 1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. 2. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.

खोद आणखी थोडेसे

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री.  (1)
  2. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (1)
  3. प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (2)
संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

  1. कवयित्री - आसावरी काकडे
  2. जीवनात प्रयत्नशीलता व सकारात्मक दृष्टिकोन यांना खूप महत्त्व आहे. आयुष्य भरभरून जगण्यासाठी, येणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी हे गुण आवश्यक असतात. ध्येय साध्य करण्यासाठी येणाऱ्या अडचणींनी न डगमगता संयम राखून आपण जिद्दीने, हिमतीने कार्यरत राहावे. नेहमी चांगुलपणावर विश्वास ठेवावा. वास्तव स्वीकारावे. कोणत्याही भ्रमात राहू नये. कष्ट करावे, चिकाटीने पुढे पुढे जात राहावे असा संदेश प्रस्तुत कवितेतून व्यक्त होतो.
  3. 'खोद आणखी थोडेसे' या कवितेतून कवयित्री आपल्या मनावर सकारात्मकता व प्रयत्नवाद या मूल्यांचा संस्कार उमटवते. याकरता ती खोदण्याच्या क्रियेचे, झऱ्याचे समर्पक उदाहरण देते. कमीत कमी शब्दांत अर्थपूर्ण आशय व्यक्त करण्याचे कवयित्रीचे कौशल्य मनाला भावते. छोट्या छोट्या काव्यपंक्ती वाचताना कविता नादमधुर वाटते. कविता अष्टाक्षरी छंदात म्हणजेच प्रत्येक ओळीत आठ अक्षरे असून, प्रत्येक कडव्यातील दुसऱ्या व चौथ्या ओळींत यमक गुंफलेली आहेत. कवितेत एक आंतरिक लय निर्माण करण्यास ते कारणीभूत ठरले आहे. त्यामुळे, ती गाता येते. या सर्व कारणांमुळे ही कविता मला फार आवडते.
shaalaa.com
खोद आणखी थोडेसे
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: वस्तू - कृती क्रमांक २

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 6 वस्तू
कृती क्रमांक २ | Q 2. (आ) i)

संबंधित प्रश्न

‘खोदणे’ या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे ______


आकृती पूर्ण करा.

 


कवितेतील (खोद आणखी थोडेसे) खालील संकल्पना आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.

कवितेतील संकल्पना  संकल्पनेचा अर्थ
(१) सारी खोटी नसतात नाणी (अ) मनातील विचार व्यक्त करावेत.
(२) घट्ट मिटू नका ओठ (आ) मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे.
(३) मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली (इ) सगळे लोक फसवे नसतात.
(४) उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी (ई) भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत.

कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

सकारात्मक राहा - ______


कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

चांगुलपणावर विश्वास ठेवा - ______ 


कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

नकारात्मक विचार करा - ______ 


कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

नवनिर्मितीवर विश्वास ठेवा - ______ 


कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

धीर सोडू नका - ______ 


कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

यशाचा विजयोत्सव करा - ______ 


खालील ओळींचे रसग्रहण करा.

‘झरा लागेलच तिथे, खोद आणखी जरासे’


खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.

खोद आणखी थोडेसे

  1. प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा. (२)
  2. प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. (२)
    1. कलंक - ___________
    2. सकलकामना - __________

खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

मूठ मिटून कशाला
म्हणायचे भरलेली
उघडून ओंजळीत
घ्यावी मनातली तळी


पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. (२)

  1. नकारात्मक विचार करा. - ___________
  2. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास कायम ठेवा - _________

खोद आणखी थोडेसे
खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी
खोटी नसतात नाणी.

घट्ट मिटू नये ओठ
गाणे असते गं मनी
आर्त जन्मांचे असते
रित्या गळणाऱ्या पानी.

मूठ मिटून कशाला
म्हणायचे भरलेली
उघडून ओंजळीत
घ्यावी मनातली तळी.

झरा लागेलच तिथे
खोद आणखी जरासे
उमेदीने जगण्याला
बळ लागते थोडेसे!

2. तक्ता पूर्ण करा. (२)

कवयित्रीच्या मते काय करावे व काय करू नये ते लिहा.

काय करावे. काय करू नये.
1) 1)
2) 2)

पुढील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.

'झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे
उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे!'


खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

खोद आणखी थोडेसे
खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी
खोटी नसतात नाणी.


कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

(1) कवितेच्या आधारे खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. (2)

  1. सकारात्मक राहा.
  2. उतावळे व्हा.
  3. खूप हुरळून जा.
  4. संवेदनशीलता जपा.

खोद आणखी थोडेसे
खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी
खोटी नसतात नाणी.

घट्ट मिटू नये ओठ
गाणे असते गं मनी
आर्त जन्मांचे असते
रित्या गळणाऱ्या पानी.

मूठ मिटून कशाला
म्हणायचे भरलेली
उघडून ओंजळीत
घ्यावी मनातली तळी.

झरा लागेलच तिथे
खोद आणखी जरासे
उमेदीने जगण्याला
बळ लागते थोडेसे!

(2) कवितेतील खालील संकल्पना आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. (2)

कवितेतील संकल्पना संकल्पनेचा अर्थ
(1) मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली (i) मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे.
(2) उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी (ii) सगळे लोक फसवे नसतात.
  (iii) भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत.

(3) खालील पद्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. (2)

खोद आणखी थोडेसे
खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी
खोटी नसतात नाणी.

(4) काव्यसौंदर्य (2)

‘झरा लागेलच तिथे, खोद आणखी जरासे’, या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×