Advertisements
Advertisements
Question
खालील मुद्द्यांच्या आधारे ‘मी अनुभवलेला पाऊस’ या विषयावर निबंध लिहा.

Advertisements
Solution
मी अनुभवलेला पाऊस
जून महिना सुरू झाला होता. उन्हाचा त्रास कमी झाला होता. तरीही अजून उकाडा जाणवत होता. शहरातील डांबरी रस्त्यांवरून उष्णतेची तीव्रता जाणवत होती. सर्वांच्या मनाला वेध लागले होते. पावसाचे! माणसांप्रमाणेच पशुपक्षी, झाडे देखील पावसाची आतुरतेने वाट बघत होते.
अचानक एके दिवशी दुपारी अंधार पडला. थंडगार वारा वाहू लागला. बघता बघता झुळूक सोसाट्याच्या वाऱ्यात बदलली. परिसरातील धूळ वाऱ्याबरोबर उडू लागली. आकाशात काळे ढग जमा झाले होते. आम्हाला काही कळायच्या आतच पाऊस जोरात कोसळू लागला. मातीचा गंघ दरवळला. सर्वांच्या ओठांत एकच धून घुमली, “पाऊस आला!' क्षणात वातावरण आनंदून गेले.
थेंबांचा वेग वाढला. सरीवर सरी बरसू लागल्या. ढगांचा गडगडाट झाला आणि विजांचा कडकडाट होऊ लागला. अचानक आलेला पाऊस संध्याकाळ झाली तरी बरसतच होता. कामावरून घरी परतणाऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. छत्री व रेनकोट कुणाकडेच नसल्याने काहीजण भिजत भिजत परतत होते. आज पावसाने खोडकर मुलांप्रमाणे सगळ्यांवर चाल खेळली. अंगणात दोरीवरून कपडे उतरवत असताना शेजारच्या काकू पावसाने भिजल्या. तरीही पावसाबद्दल सर्वांच्या चेहऱ्यावर कृतज्ञता होती. लहान मुले “पाऊस आला मोठ्ठा” असं भिजत भिजत म्हणत होती. झाडांच्या पानांवरची धूळ साफ झाली होती. पाने चकाकू लागली होती. धरती न्हाऊन निघाली होती. उन्हामुळे हैराण झालेले सर्व सुखावले होते.
सृष्टीत झालेला हा बदल मला खूप आवडला. पावसाने माझे मन सुखावले. उत्साह जाणवू लागला होता. निसर्गदेखील चेतन्याने फुलून आला होता. संध्याकाळी उशिरा कधीतरी पाऊस थांबला. पावसाने आज नव्या ऋतूची सुरुवात केली होती. असा हा जादुगार पाऊस सर्वांवर आनंदाची बरसात करून गेला होता.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
‘संदेश वहन के आधुनिक साधनों से लाभ-हानि’ विषय पर अस्सी से सौ शब्दों तक निबंध लिखिए।
‘हमारी सैर’ विषय पर निबंध लिखिए।
‘बुरी संगति किसी को भी दिशाहीन बना सकती है’ इसपर तर्क सहित अपने विचार लिखिए।
‘संगणक की आत्मकथा’ इस विषय पर अस्सी से सौ शब्दों में निबंध लिखिए।
आपके द्वारा आँखों देखी किसी घटना/दुर्घटना का विवरण अपने शब्दों में लिखिए।
निम्नलिखित दिए गए शीर्षक पर लगभग 150 शब्दों में रचनात्मक लेखन लिखिए।
बारिश की वह सबुह
निम्नलिखित विषय पर लगभग 70 से 80 शब्दों में निबंध लिखिए:
मैं पृथ्वी बोल रही हूँ...
निबंध लेखन -
कोरोना काल में दूरदर्शन की भूमिका
निबंध लेखन:
मेरा प्रिय खिलाड़ी
निबंध लिखिए:
घायल सैनिक की आत्मकथा
निम्नलिखित दिए गए शीर्षक पर लगभग 120 शब्दों में रचनात्मक लेख लिखिए।
जैसे ही मैंने अलमारी खोली
निम्नलिखित दिए गए शीर्षक पर लगभग 120 शब्दों में रचनात्मक लेख लिखिए।
मैच खेलने का अवसर
नीचे दिए गए अप्रत्याशित विषय पर लगभग 120 शब्दों में रचनात्मक लेख लिखिए।
लोकतंत्र में मीडिया की भूमिका
नीचे दिए गए अप्रत्याशित विषय पर लगभग 120 शब्दों में रचनात्मक लेख लिखिए।
दिया और तूफ़ान : मानव जीवन का सत्य
निबंध लिखिए:
वृक्षारोपण
निबंध लिखिए:
तनाव
निबंध लिखिए:
सफलता
निम्नलिखित विषय पर 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए।
एक किसान की आत्मकथा
निम्नलिखित विषय पर लगभग 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए:
पर्यावरण सुरक्षा में पक्षियों की भूमिका
निम्नलिखित विषयों में से किसी एक विषय पर 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए:
यदि पुस्तकें न होती........
