English

'टॉलस्टॉय पहिल्या दर्जाचा कलावंत ठरतो', या विधानाची यथार्थता पटवून द्या.

Advertisements
Advertisements

Question

'टॉलस्टॉय पहिल्या दर्जाचा कलावंत ठरतो', या विधानाची यथार्थता पटवून द्या.

Answer in Brief
Advertisements

Solution

टॉलस्टॉय हे प्रतिभासंपन्न साहित्यिक होतेच, शिवाय ते थोर तत्त्वचिंतक आणि शिक्षण शास्त्रज्ञ सुद्धा होते. त्यांनी सत्य, शांती, त्याग आणि सेवा या मूल्यांची आयुष्यभर उपासना केली. या मूल्यांचे दर्शन त्यांच्या साहित्यातून घडते, तसेच ते त्यांच्या अन्य लेखनातून ही घडते. त्यांनी आयुष्यभर जे कार्य केले, त्या कार्यातूनही या मूल्यांचेच दर्शन घडते.
प्रस्तुत पाठामध्ये टॉलस्टॉय यांच्या लेखक म्हणून झालेल्या घडामोडींचे चित्रण आले आहे. त्यांना स्वतःची कलाकृती सर्वश्रेष्ठ व्हावी, ही आस होतीच. पण एवढ्यावरच त्यांचे मन थांबले नव्हते. त्यांना आपली कलाकृती आदर्श व्हावी असे वाटत होते. आदर्श होण्यासाठी त्यांनी अमाप कष्ट उपसले. प्रचंड अभ्यास केला. त्यांच्या 'युद्ध व शांती' या कादंबरीचे उदाहरण पाहण्यासारखे आहे. या कादंबरीत हजारो घटना आहेत. पाचशेहून अधिक व्यक्ती आहेत. प्रत्येक व्यक्ती दुसरीपासून वेगळी आहे. प्रत्येकीचा वेगळेपणा त्यांनी जपला आहे. त्यासाठी बारीक-सारीक तपशिलांचा त्यांनी अभ्यास केला. वेगवेगळ्या वृत्तींच्या व्यक्तींचा अभ्यास केला आणि आपल्या कादंबरीतील व्यक्ती घडवल्या. प्रसंगांचा काटेकोर अभ्यास केला. त्यासाठी हजारो ग्रंथ अभ्यासले. कितीतरी व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या. शक्य तिथे ठिकाणांना भेटी दिल्या. कादंबरीतील युद्धाचे वर्णन प्रत्ययकारक व्हावे म्हणून दरम्यानच्या काळात होऊन गेलेल्या युद्धाचा त्यांनी अभ्यास केला. त्या युद्धात सामील झालेल्या व्यक्तींच्या भेटी घेतल्या. अशा प्रकारे अभ्यास करून २००० पृष्ठांची कादंबरी लिहिली. ती लिहिताना शब्दांचा काटेकोरपणाही पाळला. शेकडो परिच्छेद, पानेच्या पाने पुन्हा पुन्हा लिहून काढली.
त्यांच्या आयुष्यातील त्यांचे एक खास कार्य सांगितलेच पाहिजे. युरोपात जाऊन तिथल्या शिक्षण व्यवस्थेचा त्यांनी अभ्यास केला आणि स्वतःच्या गावी येऊन शेतकऱ्यांच्या मुलांसाठी स्वतंत्र शाळा उघडली. त्या शाळेत प्रचलित अभ्यासक्रम, शिक्षण पद्धती आणि मूल्यमापन पद्धती यांना बाजूला सारले. एक नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम आणि शिक्षण पद्धती सुरू केली. टॉलस्टॉय यांचे मोठेपण व्यक्त करण्यासाठी ही घटना खूप महत्त्वाची आहे.

shaalaa.com
गद्य (Prose) (11th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.11: वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार - कृती [Page 52]

APPEARS IN

Balbharati Marathi Yuvakbharati [English] Standard 11 Maharashtra State Board
Chapter 2.11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार
कृती | Q (५) (अ) | Page 52

RELATED QUESTIONS

कारणे लिहा.

'रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहे', कारण __________


प्र. के. अत्रेयांच्या प्रस्तावना लेखनाची तुम्हांला जाणवलेली वैशिष्ट्येलिहा.


बहिणाबाईंच्या काव्यातील भाषेची वैशिष्ट्ये लिहा.


'मानवी जीवनात संवादाचे महत्त्व' याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.


कारणे लिहा.
उषाताईंचा हा कार्यक्रम शेवटचा होता, कारण____


कारणे लिहा.

मुंबईत आलेल्या पाहुण्यांची पंचाईत होते; कारण ______


फरक स्पष्ट करून तक्ता पूर्ण करा.

उषावहिनींचा सल्ल निशावहिनींचा सल्ल
   
   
   

कृती करा.
निशाताईंच्या सल्ल्याचा आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांची अवस्था


पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
'कीड मुळापासून उपटून काढली पाहिजे, तरच झाड जगेल'


वहिनींचा सल्ला 'सुसाट' वाटण्याची तुम्हांला समजलेली कारणे लिहा.


खऱ्या उषावहिनींनी आपल्या बहिणीच्या कामाला दिलेल्या पसंतीविषयी' तुमच्या प्रतिक्रिया लिहा.


टॉलस्टॉयच्या ज्ञानेंद्रियांच्या तल्लख संवेदनेची पाठातील उदाहरणे देऊन खालील तक्ता पूर्ण करा.

ज्ञानेंद्रिये संवेदनांची उदाहरणे
(१) डोळे  
(२) कान  
(३) नाक  
(४) त्वचा  

आकृत्या पूर्ण करा.
टॉलस्टॉय ची दैनंदिनी लेखनाची प्रयोजने


आकृत्या पूर्ण करा.
लिओ टॉलस्टॉयची कोवळ्या वयातील विलक्षण शक्ती


आकृत्या पूर्ण करा.
टॉलस्टॉयने वाचलेले लेखक


सूचनेप्रमाणे सोडवा
खालील शब्दांसाठी पाठात आलेल्या उपमा लिहा.

  1. मन:पटलावरील प्रतिमा
  2. 'युद्ध आणि शांती' ही कादंबरी

'कादंबरी' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.


चुकीचे विधान शोधा.


फरक स्पष्ट करा.

नाटक इतर साहित्यप्रकार
   
   

स्वमत.

‘नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहे’, या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.


स्वमत.
नाट्यसंहिता लिहिण्यासाठी आवश्यक अशा पूर्वतयारीच्या घटकांसंबंधी तुमचे मत स्पष्ट करा.


स्वमत.
व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


टॉलस्टॉयच्या तरल संवेदनेची सूचक आठवण तुमच्या शब्दांत वर्णन करा


'ज्या जमिनीत कथाबीज पेरायचे तिची खूप कसून नांगरणी चालली होती,' या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×