English

स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या?

Short/Brief Note
Advertisements

Solution

  1. स्वातंत्र्यपूर्व काळात पुढील सुधारणांसाठी स्त्री-चळवळी लढत होत्या-
  2. स्त्रियांवरील होणारा अन्याय दूर व्हावा. स्त्रियांचे शोषण थांबून त्यांना सन्मानाने जगता यावे. सार्वजनिक जीवनात स्त्रियांना सन्मानाने जगता यावे.
  3. स्त्रियांचे स्वातंत्र्य व स्त्रीला माणूस म्हणून दर्जा मिळणे हे प्रमुख विषय या चळवळींच्या केंद्रस्थानी होते.
  4. सतीप्रथा, विधवांची उपेक्षा, बहुपत्नी विवाहपद्धती, बालविवाह प्रथा इत्यादी सामाजिक प्रथा नष्ट व्हाव्यात. स्त्रीशिक्षण, स्त्रियांना मतदानाचा अधिकार, विधवा पुनर्विवाह अशा अनेक सुधारणा व्हाव्यात. 
  5. ईश्वरचंद्र विद्यासागर, राजा राममोहन रॉय, महात्मा फुले, महर्षी कर्वे या पुरोगामी विचारवंत पुरुषांसोबतच सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे अशा स्त्रियांच्या पुढाकाराने सतीप्रथा, बालविवाहासारख्या अनिष्ट रूढींना विरोध, विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, स्त्रियांना मतदानाचा अधिकार अशा सुधारणा घडल्या. 
shaalaa.com
भारतातील प्रमुख चळवळी
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.4: सामाजिक व राजकीय चळवळी - संक्षिप्त उत्तरे

APPEARS IN

SCERT Maharashtra History and Civics [Marathi] 10 Standard SSC
Chapter 2.4 सामाजिक व राजकीय चळवळी
संक्षिप्त उत्तरे | Q ९. (३)
Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2.4 सामाजिक व राजकीय चळवळी
स्वाध्याय | Q ३. (३) | Page 96
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×