English

पुढील संकल्पना स्पष्ट करा. कामगार चळवळ

Advertisements
Advertisements

Question

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

कामगार चळवळ

Answer in Brief
Advertisements

Solution

भारतातील कामगार चळवळींमागे औद्योगिकीकरणाची पार्श्वभूमी आहे.

१. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतामध्ये कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या अशा उद्योगांना सुरुवात झाली होती. १८९९ मध्ये आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात याकरता रेल्वे कामगारांनी संप केला.

२. १९२० मध्ये कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी 'ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस' या व्यापक संघटनेची स्थापना झाली.

३. स्वातंत्र्योत्तरकाळात १९६० व ७० च्या दशकात कामगार चळवळ अधिक प्रभावी ठरली; मात्र १९८० पासून ही चळवळ विखुरली गेली.

४. सध्या जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे भारतभर कामगारांचे नवनवे प्रश्न उभे राहत आहेत. अस्थिर रोजगार, कंत्राटी कामगार, आर्थिक असुरक्षितता, कामगार कायद्यांचे संरक्षण नसणे, अमर्याद कामाचे तास, कामाच्या ठिकाणी असणारी असुरक्षितता, अनारोग्य इत्यादी आजच्या कामगार चळवळीसमोरील समस्या आहेत.

shaalaa.com
भारतातील प्रमुख चळवळी
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.4: सामाजिक व राजकीय चळवळी - संकल्पना स्पष्ट करा

APPEARS IN

SCERT Maharashtra Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2.4 सामाजिक व राजकीय चळवळी
संकल्पना स्पष्ट करा | Q ८. (अ) (२)
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×