Advertisements
Advertisements
Question
नदी व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.

Advertisements
Solution
| नदी: | काय रे झाड दादा. कसा आहेस तू? तब्येतपाणी ठीक ना? |
| झाड: | हो गं नदीताई. तुझ्या कृपेने सारं ठीक आहे. तुझ्या पाण्यात माझी मुळे टाकून मी लागेल तेव्हा निवांत पाणी पीत बसतो. हिरवा हिरवागार राहतो मी , तो तुझ्या मुळेच! |
| नदी: | अरे! तू माझ्या काठी आहेस, म्हणून तुला पाणी मिळतंय बरं! पण दुष्काळी भागातील तुझ्या मित्रांना कुठे रे पाणी मिळेल! |
| झाड: | हो ना! नदीताई, तू जीवनवाहिनी आहेस आमची! तुझ्यामुळेच तर आपला परिसर असा समृद्ध आहे. |
| नदी: | अरे, त्यात माझं कसलं आलंय कौतुक! माझा स्वभाव आहे तो, सतत वाहण्याचा ! त्यामुळे मी झुळझुळ वाहत राहते. जिथे जाते, तिथे पाणी घेऊन जाते. |
| झाड: | तुझ्या असण्याने सर्वांना पाणी मिळतं बघ. तू बारा महिने वाहत असतेस. त्यामुळे लोक, प्राणी-पक्षी सगळे आनंदाने तुझ्याजवळ येतात. तुझे पाणी पिऊन तृप्त होतात. पाण्याचा वापर करतात. |
| नदी: | हं. तूही किती परोपकारी आहेस, झाडदादा. आपल्या प्रत्येक अवयवाचा वापर तू लोकांसाठी, पक्षी-प्राण्यांसाठी करतोस. कोणी तुझ्याशी वाईट वागो किंवा चांगले, तू सतत त्यांना मदतच करतोस. |
| झाड: | अगं ताई, तुझ्याकडूनच तर शिकलो सर्वांना मदत करण्याचा गुण! 'ताई' आहेस तू माझी. छोट्या भावाला चांगले संस्कार देणारी. (दोघेही हसतात.) |
RELATED QUESTIONS
खालील बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, उत्रौली या शाळेत कला शिबिराचा समारोप संपन्न.
|
दिनांक: २० डिसेंबर लोकप्रतिभा चित्रकला शिबिराचा समारोप उत्रौली (ता. भोर) : उत्रौली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत दहा दिवसांचे चित्रकला शिबिर नुकतेच संपन्न झाले. १९ डिसेंबर रोजी दुपारी ४.०० ते ६.०० या वेळात शिबिराचा समारोप समारंभ साजरा झाला. या शिबिराची सांगता प्रसिद्ध चित्रकार श्री. अविनाश शिवतरे यांच्या सप्रात्यक्षिक मनोगताने करण्यात आली. आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व सांगताना प्रत्येकाने कोणती-ना-कोणती कला शिकणे आवश्यक आहे, हा विचार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. समारंभाचे अध्यक्षस्थान उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. सदाशिव शिंदे यांनी भूषवले. कलाशिक्षिका श्रीमती सुनीता सोमण यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले. या निमित्ताने सर्व पंचवीस शिबिरार्थींच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. |
(१) कोण ते लिहा.
(अ) समारंभाचे प्रमुख पाहुणे-
(आ) समारंभाचे अध्यक्ष-
(इ) चित्रकला प्रदर्शनास प्रतिसाद देणारे-
(२) उत्तर लिहा.
(अ) शिबिरार्थींची संख्या-
(आ) शिबिरार्थींनी शिबिरात शिकलेली कला-
(इ) शिबिराचे ठिकाण-
(ई) शिबिर सुरू झाले ती तारीख-
(३) वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टींविषयी माहिती दिलेली आहे ते घटक लिहा.

खालील मुद्द्यांच्या आधारे ‘माझा आवडता खेळ’ या विषयावर आठ ते दहा ओळी निबंध लिहा.

खालील उतारा वाचा व त्यास योग्य शीर्षक द्या.
|
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुखदु:खाचे क्षण नेहमीच येत असतात. दु:खाच्या व अडचणीच्या प्रसंगांना जे खिलाडू वृत्तीने सामोरे जातात, जे जिंकण्याच्या उर्मीने हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी स्वयंप्रेरणेने काम करतात, तेच आयुष्यात यश मिळवतात. कोणतीही वाईट परिस्थिती तुम्हांला अडवू किंवा हरवू शकत नाही. वेळप्रसंगी तुम्हांला दोन पावले मागेही टाकावी लागतात; परंतु जर आपण मनानेच हरलो, तर पुढील कार्य पूर्ण करण्यासाठी आपण तयार होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत कायम आपले आपल्या मनावर नियंत्रण असणे आवश्यक असते. नकारात्मक विचार करण्यापासून आपण स्वत:ला थांबवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या मनाला चांगल्या सवयी लावणेही आवश्यक आहे. आपल्या मनाला चांगली सवय लावणे हे कठीण असले, तरी अशक्य मात्र नक्कीच नाही! आपल्या अंगी असणाऱ्या चांगल्या सवयी, वाईट सवयींना जवळ येऊ देत नाहीत. मनाला चांगल्या विचारांची सवय लावली, तर ती सवय वाईट विचारांपासून तुम्हांला नक्कीच दूर ठेवील. यासाठी तुम्हांला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. उदा., चांगले वाचन, चांगल्या मित्रमैत्रिणींची संगत, घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी असणारे जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध इत्यादी. जो दुसऱ्याच्यादु:खात नेहमी सहभागी होतो त्यालाच जीवनाचा खरा अर्थ कळतो. मानसिक आधार देऊन, विचारांच्या देवाणघेवाणीतून आपण एकमेकांचे दु:ख सहज हलके करू शकतो. असे सुखदु:खाचे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात सतत येत असतात मात्र या प्रसंगांना जो धीराने सामोरा जातो, तोच जीवनात यशस्वी होतो. |
खालील जाहिरातीचे वाचन व निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

(अ) उत्तरे लिहा.
- जाहिरातीचा विषय -
- जाहिरात देणारे (जाहिरातदार) -
- वरील जाहिरातीत सर्वांत जास्त आकर्षित करून घेणारा घटक -
- जाहिरात कोणासाठी आहे?
(आ) वरील जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी त्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा, असे तुम्हांला वाटते?
(इ) तुमच्या मते जाहिरातीमधील महत्त्वाची वैशिष्ट्ये.

'स' चा शब्दपंखा पूर्ण करा.

१. वर्णमालेतील बत्तीसावे अक्षर.
२. जंगलातील एक भित्रा प्राणी.
३. नेहमी.
४. एक शीतपेय.
५. रस्ता.
६. उत्सव.
७. ढीग या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द. रा...
खालील चित्रांचे निरीक्षण करा. चित्रातील हे दृश्य पाहून सूचनांचे फलक तयार करा.


तुमच्या परिसरातील एखाद्या अनुभवी शेतकऱ्याची तुम्हांला मुलाखत घ्यायची आहे. त्यासाठी प्रश्नावली तयार करा.
माहिती देण्यासाठी किंवा घेण्यासाठी अनेक साधने वापरली जातात. खाली माहिती देवाणघेवाण करण्याची/संवादाची काही साधने दिली आहेत. त्यांतील काही साधने एकतर्फी व दुतर्फी माहितीची/संवादाची देवाणघेवाण करतात. त्यांची माहिती मिळवा व दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा.
फॅक्स, पत्र, इ-मेल, मोबाइल, आंतरजाल, रेडिओ, वर्तमानपत्र, मोबाइल संदेश, चर्चा, मुलाखत, जाहिरात, भाषण, संभाषण.
| एकतर्फी माहितीची/संवादाची साधने | दुतर्फी माहितीची/संवादाची साधने |
‘पर्यावरण संरक्षण’ याविषयी पाठाच्या शेवटी माणसाने केलेली प्रतिज्ञा तुमच्या शब्दांत लिहा.
|
प्रतिज्ञा आम्ही आमचे वर्तन बदलू. __________________ __________________ __________________ |
दवाखान्याच्या ठिकाणी लावलेल्या पाट्या वाचा. त्या पाट्यांमध्ये आपल्याला सूचना दिलेल्या असतात. या सूचनांव्यतिरिक्त आणखी काही सूचनांच्या पाट्या तुम्ही तयार करा.

शाळेच्या परिसरात स्वच्छताविषयक पाट्या लावायच्या आहेत, तर तुम्ही कोणत्या पाट्या तयार कराल?

‘पाणी हेच जीवन’ यांवर आधारित दहा ओळी लिहा.
तुम्ही एखादा उपक्रम केला असेल, तर त्याबाबतची माहिती मित्राला पत्राने कळवा.
शब्दांमुळे, भाषेमुळे दैनंदिन व्यवहारात कोणते फायदे होतात, या विषयावर मित्रांशी चर्चा करा.
‘शब्द’ या विषयावर आधारित सुविचार मिळवा. त्यांचा संग्रह करा. त्याची सुंदर चिकटवही बनवा.
सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत तुम्ही कोणकोणते खेळ खेळता?
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
शाळेत पिण्याच्या पाण्याचा नळ कोणीतरी विनाकारण सुरू ठेवला.
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
सहलीत तुमचा मित्र किल्ल्याच्या भिंतीवर नावे लिहीत आहे.
