Advertisements
Advertisements
Question
तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या पर्यटनस्थळाचे वर्णन करणारे पत्र मित्राला/मैत्रिणीला लिहा.
Advertisements
Solution
उत्तरा देशपांडे
१०२, शांतीकुंज,
सोमवार पेठ,
पुणे - ४११००२.
दि. ३०. एप्रिल, २०१७
प्रिय सई,
सप्रेम नमस्कार,
परीक्षा संपल्या आणि उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली. नेहमीप्रमाणे परीक्षा छानच झाल्या. ह्यावर्षी बाबांनी कबूल केल्याप्रमाणे, आम्हां सर्वांना महाबळेश्वरला नेले. मी, आई, बाबा आणि राघव आम्ही सगळेच २२ तारखेला निघालो.
सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण व प्रेक्षणीय स्थळ असणारे महाबळेश्वर महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. त्याला नंदनवन का म्हणतात याचा प्रत्यय तेथे पोहोचताच येऊ लागतो. तुला माहीत आहे? महाबळेश्वर ही ब्रिटिश राजवटीतील मुंबई परगण्याची उन्हाळ्यातील राजधानी होती.
महाबळेश्वरमध्ये निसर्गसाैंदर्य अफाट आहे. विल्सन पॉईंट, आर्थर सीट पॉईंट, लॉडविक पॉईंट, वेण्णा तलाव, काटे पॉईंट, एलिफंट पॉईंट अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे असून सिंडोला टेकडीवरील सर्वांत उंच पॉईंटवरून महाबळेश्वरमधील सूर्योदय व सूर्यास्त बघणे नेत्रसुख आहे.
भारताच्या स्ट्राबेरी उत्पादनापैकी ८५% स्ट्राबेरी उत्पादन महाबळेश्वरमध्ये होते. त्यामुळे, साहजिकच येथे आल्यावर आम्ही स्ट्राबेरीवर यथेच्छ ताव मारला. महाबळेश्वरमधील स्ट्राबेरी, रासबेरी, जांभळाचा मध तसेच, गुलकंद प्रसिद्ध आहे. अशा आल्हाददायक वातावरणात, ऊन्हाच्या झळांपासून दूर चार दिवस कसे गेले कळलेच नाही!
तू इथे असतीस तर तुलाही मी हट्टाने सोबत नेले असते. पुढची सहल आपण नक्की एकत्र करू. तुझा अभ्यास कसा सुरू आहे? इकडे सगळे मजेत आहेत. तुझ्या आईबाबांना माझा नमस्कार सांग. तुझ्या पत्राची वाट बघत आहे.
तुझी मैत्रीण,
उत्तरा
APPEARS IN
RELATED QUESTIONS
रानमेवा कशाला म्हणतात? रानमेव्यात कोणती फळे येतात, याविषयी कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करा.
तुमच्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत ‘हस्ताक्षर सुंदर करूया!’ हे १० दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. त्यात तुम्हांला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्ग शिक्षकांना लिहा.
खालील उतारा वाचा. त्याचा तुम्हांला समजलेला अर्थ सारांश रूपाने पुन्हा लिहा.
| आपल्यासारख्या सामान्यांना शब्दावाचूनचे संवाद भावणारही नाहीत, की परवडणारही नाहीत. आपल्याला कठीण, साधे, सरळ, वक्र कसे का होईना; पण बोलणे आणि ठणठणीत बोलणेच हवे असते आणि या बोलण्याचे किती अनंत प्रकार असतात. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ अशी म्हण आहे. त्या चालीवर ‘माणसे तितकी बोलणी’ अशी म्हण बनवायला हरकत नाही. ‘मोकळा संवाद’ असे आपण म्हणतो; पण समाजात वावरताना या तथाकथित मोकळ्या संवादावर कशी आणि किती बंधने पडत असतात ते पाहिले म्हणजे गंमत वाटते. मित्रमंडळींशी गप्पा मारताना आपण खूप मुक्त, मोकळे असतो अशी आपली समजूत असते; पण ती खरी असते का? आपणाला एकमेकांचे अनेक गुणदोष, एकमेकांच्या जीवनातले बरेवाईट तपशील ठाऊक असतात; त्यामुळे तिथे कधी मोकळ्या गप्पा होत असल्या, तरी अनेकदा नात्यातल्या जवळिकीमुळेच कधी कधी एक चमत्कारिक अवघडलेपणही अनुभवाला येते. एकमेकांची मते, आग्रह, दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण शिताफीने टाळतो. वृत्तीतल्या हळव्या जागा, स्वाभिमानाची ठिकाणे माहीत असल्यामुळे बोलताना त्यांना कुठे धक्का लागणार नाही, समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही, याची सतत काळजी घ्यावी लागते. |
‘तुम्ही पक्षी आहात’, अशी कल्पना करून तुम्हांला स्वच्छंदीपणे कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतील, ते लिहा.
मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा करून ‘जैव विविधतेची गरज’, या विषयावर आठ ते दहा ओळींचा निबंध लिहा.
घाटातून जाताना घ्यायची काळजी याविषयीचे सूचनाफलक तयार करा.

'स' चा शब्दपंखा पूर्ण करा.

१. वर्णमालेतील बत्तीसावे अक्षर.
२. जंगलातील एक भित्रा प्राणी.
३. नेहमी.
४. एक शीतपेय.
५. रस्ता.
६. उत्सव.
७. ढीग या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द. रा...
तुमच्या परिसरातील एखाद्या अनुभवी शेतकऱ्याची तुम्हांला मुलाखत घ्यायची आहे. त्यासाठी प्रश्नावली तयार करा.
खालील चित्रांचा सहसंबंध लावून गोष्ट तयार करा.
![]() |
![]() |
![]() |
![]() |
माहिती देण्यासाठी किंवा घेण्यासाठी अनेक साधने वापरली जातात. खाली माहिती देवाणघेवाण करण्याची/संवादाची काही साधने दिली आहेत. त्यांतील काही साधने एकतर्फी व दुतर्फी माहितीची/संवादाची देवाणघेवाण करतात. त्यांची माहिती मिळवा व दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा.
फॅक्स, पत्र, इ-मेल, मोबाइल, आंतरजाल, रेडिओ, वर्तमानपत्र, मोबाइल संदेश, चर्चा, मुलाखत, जाहिरात, भाषण, संभाषण.
| एकतर्फी माहितीची/संवादाची साधने | दुतर्फी माहितीची/संवादाची साधने |
|
फुलांना रंग कशामुळे प्राप्त होतो? फुलांमध्ये दोन प्रकाची रंगद्रव्ये असतात. हरितद्रव्ये, कॅरोटिन यांमुळे नारिंगी, पिवळा, हिरवा हे रंग फुलांच्या पाकळ्यांना मिळतात. लाल, गुलाबी, निळा वगैरे रंग फुलांमधील अँथोसायनीन या रंगद्रव्यामुळे मिळतील. हि रंगद्रवे पाण्यात विरघळू शकतात. ज्या वेळी फुलांना जीवनरसाचा पुरवठा होतो, त्या वेळी त्यात हि रंगद्रव्ये विरघळतात. कोणत्या फुलांत कोणती रंगद्रवे असतात, हे त्यांतील गुणसूत्रे ठरवतात आणि गुणसूत्रे आनुवंशिक असल्यामुळे त्या त्या फुलांचा रंग ठरावीकच असतो, तो बदलत नाही. |
खालील सूचना वाचा. अशा आणखी सूचना तयार करा.
- नदीच्या पाण्यात केरकचरा, निर्माल्य टाकू नये.
- ओला कचरा, सुका कचरा ठेवा वेगवेगळा, तरच प्रदूषणाला बसेल आळा.
‘पाणी हेच जीवन’ यांवर आधारित दहा ओळी लिहा.
तुम्ही एखादा उपक्रम केला असेल, तर त्याबाबतची माहिती मित्राला पत्राने कळवा.
महाराष्ट्रातील प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांविषयीची माहिती आंतरजालावरून मिळवा.
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
शाळेत पिण्याच्या पाण्याचा नळ कोणीतरी विनाकारण सुरू ठेवला.
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
वर्गातील एका विद्यार्थ्याने वर्गात कचरा केला आहे व ते तुम्ही पाहिले.




