English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 8th Standard

‘तुम्ही पक्षी आहात’, अशी कल्पना करून तुम्हांला स्वच्छंदीपणे कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतील, ते लिहा.

Advertisements
Advertisements

Question

‘तुम्ही पक्षी आहात’, अशी कल्पना करून तुम्हांला स्वच्छंदीपणे कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतील, ते लिहा.

Very Long Answer
Advertisements

Solution

त्या दिवशी बाई ग्रेस कवींची ‘पाऊसगाणे’ ही कविता शिकवत होत्या. कवितेच्या शेवटच्या ओळी होत्या, ‘जाता येता टाकीत होता तो चिमण्यांना दाणे’. चिमणीची एक सुंदर गोष्ट बाईंनी सांगितली. ती ऐकत असतानाच मला असे वाटले, की जणू मीच पक्षी झाले आहे..... आणि मग हे वेडं मनपाखरू आपल्या कल्पनांच्या आभाळात विहार करू लागलं आणि पाहता पाहता मी भुर्रकन खिडकीतून उडालेच.

मग मी ऐटीत माझा दिनक्रम निश्चित केला. सकाळी उठल्याबरोबर बाहेर उनाडायचे, म्हणजे कपडे बदलणं, चपला घालणं या गोष्टी करायची गरजच नाही. खिडकीतून थेट आकाशात झेप घेऊन फेरफटका मारायला खूप मजा येईल. मग एक फेरफटका मारून म्हणजे, की शाळेची तयारी करून उडतच शाळेत जायचं. म्हणजे शाळेला उशीर होणार नाही. थेट फांदीवरील वर्गाच्या खिडकीवरच आमचं विमान उतरेल. वर जाता जाता शाळेतल्या आंब्याच्या झाडावरच्या हिरव्यागार कैऱ्या चक्क चोचीने चाखता येतील. आम्हां पक्ष्यांच्या या शाळेत कोकिळाबाई, चिऊताई व मैनाबाई मला गाणे शिकवतील. कावळेदादा कावकाव करून माझा अभ्यास घेतील. मोर मला नाचायला शिकवेल. सुगरण घरटं बांधायला शिकवेल. मी सारं काही मन लावून शिकेन. शारीरिक शिक्षणाच्या तासाला तर माझ्या आकाशातल्या करामतींनी मी सगळ्या पक्ष्यांनाही अवाक् करून टाकीन आणि शिक्षा झाली तर ..... अहो शिक्षाही मला पाच फेऱ्या मारण्याची असेल म्हणजे माझ्या 'पंखांचा मळ'! मी दर रविवारी एक सहल करेन कारण सहलीच्या ठिकाणी जायला वाहन नको किंवा तिकीट नको.

पण खरंच, देवाने प्रत्येकाला काही ना काही असं विशेष दिलेलं आहे. माणसाला बुद्धी दिली, पक्ष्यांना पंख दिले, हत्तीला ताकद दिली, तर सरड्याला रंग दिले, सूर्याला प्रकाश दिला आणि प्रत्येकाकडे ते सारं कसं अगदी शोभून दिसते. आकाशात झेप घेणारा पक्षी किती सुंदर आणि प्रेरणादायी वाटतो. ती सर आपल्याला नाही येणार. म्हणूनच, ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्ती असो द्यावे समाधान’ देवाने आपल्याला छान घर दिले आहे. प्रेमळ आई-बाबा दिले आहेत. छान शाळा आणि भरपूर सवंगडी दिले आहेत. तेव्हा आपले पाय मातीतच घट्ट रोवलेले उत्तम, असा विचार करून मी माझे मनपाखरू परत जमिनीवर आणले.

shaalaa.com
लेखन
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: झुळूक - कल्पक होऊया [Page 34]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati Standard 8 Maharashtra State Board
Chapter 9 झुळूक
कल्पक होऊया | Q (१) | Page 34
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
Chapter 9 झुळूक (कविता)
कल्पक होऊया | Q १. | Page 29

RELATED QUESTIONS

खालील मुद्द्यांच्या आधारे ‘माझा आवडता खेळ’ या विषयावर आठ ते दहा ओळी निबंध लिहा.


खालील उतारा वाचा व त्यास योग्य शीर्षक द्या.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुखदु:खाचे क्षण नेहमीच येत असतात. दु:खाच्या व अडचणीच्या प्रसंगांना जे खिलाडू वृत्तीने सामोरे जातात, जे जिंकण्याच्या उर्मीने हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी स्वयंप्रेरणेने काम करतात, तेच आयुष्यात यश मिळवतात. कोणतीही वाईट परिस्थिती तुम्हांला अडवू किंवा हरवू शकत नाही. वेळप्रसंगी तुम्हांला दोन पावले मागेही टाकावी लागतात; परंतु जर आपण मनानेच हरलो, तर पुढील कार्य पूर्ण करण्यासाठी आपण तयार होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत कायम आपले आपल्या मनावर नियंत्रण असणे आवश्यक असते.

नकारात्मक विचार करण्यापासून आपण स्वत:ला थांबवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या मनाला चांगल्या सवयी लावणेही आवश्यक आहे. आपल्या मनाला चांगली सवय लावणे हे कठीण असले, तरी अशक्य मात्र नक्कीच नाही! आपल्या अंगी असणाऱ्या चांगल्या सवयी, वाईट सवयींना जवळ येऊ देत नाहीत. मनाला चांगल्या विचारांची सवय लावली, तर ती सवय वाईट विचारांपासून तुम्हांला नक्कीच दूर ठेवील.

यासाठी तुम्हांला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. उदा., चांगले वाचन, चांगल्या मित्रमैत्रिणींची संगत, घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी असणारे जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध इत्यादी. जो दुसऱ्याच्यादु:खात नेहमी सहभागी होतो त्यालाच जीवनाचा खरा अर्थ कळतो. मानसिक आधार देऊन, विचारांच्या देवाणघेवाणीतून आपण एकमेकांचे दु:ख सहज हलके करू शकतो.

असे सुखदु:खाचे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात सतत येत असतात मात्र या प्रसंगांना जो धीराने सामोरा जातो, तोच जीवनात यशस्वी होतो.


रानमेवा कशाला म्हणतात? रानमेव्यात कोणती फळे येतात, याविषयी कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करा.


तुमच्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत ‘हस्ताक्षर सुंदर करूया!’ हे १० दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. त्यात तुम्हांला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्ग शिक्षकांना लिहा.


खालील जाहिरातीचे वाचन व निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

(अ) उत्तरे लिहा.

  1. जाहिरातीचा विषय -
  2. जाहिरात देणारे (जाहिरातदार) -
  3. वरील जाहिरातीत सर्वांत जास्त आकर्षित करून घेणारा घटक -
  4. जाहिरात कोणासाठी आहे?

(आ) वरील जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी त्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा, असे तुम्हांला वाटते?

(इ) तुमच्या मते जाहिरातीमधील महत्त्वाची वैशिष्ट्ये.


नदी व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.

 


मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा करून ‘जैव विविधतेची गरज’, या विषयावर आठ ते दहा ओळींचा निबंध लिहा.


तुमच्या परिसरातील ज्या घरी पाळीव प्राणी आहेत अशा पाच घरांना भेटी द्या. त्या घरातील लोक पाळीव प्राण्यांची काळजी कशी घेतात याची खालील मुद्‌द्यांच्या आधारे माहिती मिळवा व वर्गात सांगा.


माहिती देण्यासाठी किंवा घेण्यासाठी अनेक साधने वापरली जातात. खाली माहिती देवाणघेवाण करण्याची/संवादाची काही साधने दिली आहेत. त्यांतील काही साधने एकतर्फी व दुतर्फी माहितीची/संवादाची देवाणघेवाण करतात. त्यांची माहिती मिळवा व दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा.

फॅक्स, पत्र, इ-मेल, मोबाइल, आंतरजाल, रेडिओ, वर्तमानपत्र, मोबाइल संदेश, चर्चा, मुलाखत, जाहिरात, भाषण, संभाषण.

एकतर्फी माहितीची/संवादाची साधने दुतर्फी माहितीची/संवादाची साधने
   

              फुलांना रंग कशामुळे प्राप्त होतो?

         फुलांमध्ये दोन प्रकाची रंगद्रव्ये असतात. हरितद्रव्ये, कॅरोटिन यांमुळे नारिंगी, पिवळा, हिरवा हे रंग फुलांच्या पाकळ्यांना मिळतात. लाल, गुलाबी, निळा वगैरे रंग फुलांमधील अँथोसायनीन या रंगद्रव्यामुळे मिळतील. हि रंगद्रवे पाण्यात विरघळू शकतात. ज्या वेळी फुलांना जीवनरसाचा पुरवठा होतो, त्या वेळी त्यात हि रंगद्रव्ये विरघळतात.

         कोणत्या फुलांत कोणती रंगद्रवे असतात, हे त्यांतील गुणसूत्रे ठरवतात आणि गुणसूत्रे आनुवंशिक असल्यामुळे त्या त्या फुलांचा रंग ठरावीकच असतो, तो बदलत नाही.


खालील सूचना वाचा. अशा आणखी सूचना तयार करा.

  • नदीच्या पाण्यात केरकचरा, निर्माल्य टाकू नये.
  • ओला कचरा, सुका कचरा ठेवा वेगवेगळा, तरच प्रदूषणाला बसेल आळा.

शाळेच्या परिसरात स्वच्छताविषयक पाट्या लावायच्या आहेत, तर तुम्ही कोणत्या पाट्या तयार कराल?


खालील चौकटीत दिलेली अपूर्ण गोष्ट पूर्ण करा.

एकदा काय झालं, आपल्या शरीराचे दोन हात, उजवा आणि डावा एक दिवस चक्क भांडायला लागले. उजवा हात म्हणाला, ‘‘आजपासून मी आराम करणार!’’ मग डावा म्हणाला, ‘‘का, काय झालं? तू का आराम करणार?’’ ‘‘मी मोठा आहे, तुझ्यापेक्षा माझा मान जास्त आहे.’’ उजवा हसून म्हणाला, ‘‘वा!वा! म्हणे मी मोठा आहे. अरे, जा मी तुला मोठा मानतच नाही. अरे माझ्याशिवाय पान हालत नाही माहीत आहे का तुला?’’ उजवा हात म्हणाला. दोन्ही हातांचे बराचवेळ भांडण चालले होते. इतकावेळ शांत बसलेले डोके मग रागाने म्हणाले, ‘‘अरे थांबा हे काय चाललंय? तुमच्या दोघांत चांगले काम कोण करतो हेच मी पाहणार आहे.’’ ‘‘हो! हो! पाहाच!’’ उजवा हात म्हणाला. ‘‘ मी पण तयार आहे.’’ डावा म्हणाला. दोन्ही हात तयार झाले. ‘‘चला तर मग, तो पाहा त्या तिथे एक दगड चिखलात रुतून बसलाय. बघू त्याला कोण बाहेर काढतंय.’’ डोक्याने असे म्हणताच उजवा म्हणाला, ‘‘मी काढणार! माझा पहिला नंबर.’’ तेव्हा डावा म्हणाला, ‘‘जा जा! तुझी किती ताकद आहे.’’ डावा असे म्हणताच मोठ्या ऐटीत उजवा निघाला ____________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________


‘शब्द’ या विषयावर आधारित सुविचार मिळवा. त्यांचा संग्रह करा. त्याची सुंदर चिकटवही बनवा.


महाराष्ट्रातील प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांविषयीची माहिती आंतरजालावरून मिळवा.


तुमची लाडकी ताई घरात नसली, तर तुम्हांला काय वाटते, ते थोडक्यात सांगा.


‘माझा आवडता मित्र/मैत्रीण’ या विषयावर थोडक्यात माहिती लिहा.


खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?

तुमच्या मित्राने/मैत्रिणीने आज डबा आणला नाही.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×