Advertisements
Advertisements
Question
खालील मुद्द्यांच्या आधारे ‘माझा आवडता खेळ’ या विषयावर आठ ते दहा ओळी निबंध लिहा.

Advertisements
Solution
माझा आवडता खेळ
खेळ म्हणजे माझा जीव की प्राण! अगदी गोट्या, कॅरमपासून क्रिकेटपर्यंत सर्व प्रकारचे खेळ खेळायला आणि विविध खेळांचे सामने दूरदर्शनवर पाहायला मला खूप आवडते; परंतु, माझा सर्वांत आवडता खेळ म्हणजे ‘कबड्डी’. हा महाराष्ट्राच्या मातीतला खेळ आहे, त्यामुळे तो रांगडा खेळ आहे. ‘हुतूतू’ या नावानेही हा खेळ प्रसिद्ध आहे. हा मैदानी खेळ खेळण्यासाठी कोणत्याही साधनसामग्रीची गरज नसते. आहे त्या परिस्थितीत हा खेळ खेळता येतो म्हणूनच मला तो खूप आवडतो. प्रतिस्पर्ध्यांवर चढाई करणे, पेच वापरून आपले कौशल्य पणाला लावून आपल्या संघाला जिंकवून देणे यातील आनंद अवर्णनीय आहे.
कबड्डीचे मैदान दोन भागांत विभागलेले असते. त्याला कोर्ट म्हणतात. दोन्ही कोर्टच्या मध्यावर एक रेषा असते. या मध्यरेषेपासून सुमारे तीन मीटर अंतरावर दोन्ही कोर्टमध्ये एक टचलाइन असते. टचलाइनपासून एक मीटर अंतरावर दोन्ही कोर्टमध्ये बोनसलाइन असते. दोन संघात प्रत्येकी १२ खेळाडू असतात. सात खेळाडू मुख्य, तर चार राखीव खेळाडू असतात. मला सात मुख्य खेळाडूंपैकी एक म्हणून खेळायला फार आवडते. खेळाडू मैदानात उतरले, की नाणेफेक जिंकणारा संघ सर्वप्रथम आपला खेळाडू प्रतिस्पर्धी संघात पाठवतो. या खेळाडूने सतत ‘कबड्डी कबड्डी’ म्हणायचे असते. जर त्याने हे थांबवले, तर तो ‘बाद’ म्हणून घोषित होतो. प्रत्येक संघात पकडण्यात तरबेज असणारे आणि स्पर्श करून पळण्यात तरबेज असणारे खेळाडू असतात. ते आपापल्या युक्त्या, पेच-डावपेच वापरून खेळ खेळत राहतात.
हा खेळ साधारणत: २०-२० मिनिटांच्या दोन भागांत खेळला जातो; हा खेळ मुख्यत: मातीत खेळला जातो; परंतु सध्या इनडोअर स्टेडिअममध्ये मॅटवर हा खेळ खेळला जात आहे. दोन्हींकरता शारीरिक क्षमता महत्त्वाची आहे. श्वासाचे तंत्र, चढाईचे व पकडीचे कौशल्य, चपळाई, शारीरिक सक्षमता, ही या खेळासाठीची आवश्यक कौशल्ये आहेत. ही कौशल्ये वाढवण्यासाठी नियमित सराव करणे, प्रशिक्षण घेणे, व्यायाम करणे, संतुलित आहार घेणे, पुरेशी विश्रांती घेणे हे सर्व प्रयत्न मी करत आहे.
सध्याच्या प्रो-कबड्डी लीगमधील अनुपकुमार हे माझे या खेळातील प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या खेळातून प्रेरणा घेऊन मीही व्यावसायिक कबड्डीपटू बनण्याचे स्वप्न पाहिले आहे. ‘कबड्डी’ हा खेळ आता केवळ भारतापुरताच मर्यादित राहिला नसून इतर देशांनीही तो स्वीकारला आहे. याचा मला अभिमान वाटतो. हा आपल्या मातीतला रांगडा खेळ मला फार आवडतो.
RELATED QUESTIONS
तुम्ही तुमच्या धाकट्या भावासाठी/बहिणीसाठी कोणकोणत्या भेटवस्तू घेता? कोणकोणत्या प्रसंगी घेता?
खालील जाहिरातीचे वाचन व निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

(अ) उत्तरे लिहा.
- जाहिरातीचा विषय -
- जाहिरात देणारे (जाहिरातदार) -
- वरील जाहिरातीत सर्वांत जास्त आकर्षित करून घेणारा घटक -
- जाहिरात कोणासाठी आहे?
(आ) वरील जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी त्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा, असे तुम्हांला वाटते?
(इ) तुमच्या मते जाहिरातीमधील महत्त्वाची वैशिष्ट्ये.

‘तुम्ही पक्षी आहात’, अशी कल्पना करून तुम्हांला स्वच्छंदीपणे कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतील, ते लिहा.
तुमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणारा सूचनाफलक तयार करा.
तुमच्या परिसरातील ज्या घरी पाळीव प्राणी आहेत अशा पाच घरांना भेटी द्या. त्या घरातील लोक पाळीव प्राण्यांची काळजी कशी घेतात याची खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती मिळवा व वर्गात सांगा.

खालील चित्रांचा सहसंबंध लावून गोष्ट तयार करा.
![]() |
![]() |
![]() |
![]() |
माहिती देण्यासाठी किंवा घेण्यासाठी अनेक साधने वापरली जातात. खाली माहिती देवाणघेवाण करण्याची/संवादाची काही साधने दिली आहेत. त्यांतील काही साधने एकतर्फी व दुतर्फी माहितीची/संवादाची देवाणघेवाण करतात. त्यांची माहिती मिळवा व दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा.
फॅक्स, पत्र, इ-मेल, मोबाइल, आंतरजाल, रेडिओ, वर्तमानपत्र, मोबाइल संदेश, चर्चा, मुलाखत, जाहिरात, भाषण, संभाषण.
| एकतर्फी माहितीची/संवादाची साधने | दुतर्फी माहितीची/संवादाची साधने |
तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या पर्यटनस्थळाचे वर्णन करणारे पत्र मित्राला/मैत्रिणीला लिहा.
खालील सूचना वाचा. अशा आणखी सूचना तयार करा.
- नदीच्या पाण्यात केरकचरा, निर्माल्य टाकू नये.
- ओला कचरा, सुका कचरा ठेवा वेगवेगळा, तरच प्रदूषणाला बसेल आळा.
‘पाणी हेच जीवन’ यांवर आधारित दहा ओळी लिहा.
मराठी भाषेत विनोदी लेखन करणाऱ्या लेखकांची व त्यांच्या साहित्याची शिक्षक, पालक यांच्या मदतीने यादी करा. विनोदी गोष्टी वाचा व वर्गात सांगा.
‘शब्द’ या विषयावर आधारित सुविचार मिळवा. त्यांचा संग्रह करा. त्याची सुंदर चिकटवही बनवा.
अभ्यासाबरोबरच तुम्हांला इतर कोणत्या गाेष्टी करायला आवडतात? का ते लिहा.
‘माझा आवडता मित्र/मैत्रीण’ या विषयावर थोडक्यात माहिती लिहा.
सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत तुम्ही कोणकोणते खेळ खेळता?
तुमचा आवडता मित्र/मैत्रीण यांमधील तुम्हांला कोणते गुण सर्वांत जास्त आवडतात?
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
तुमच्या मित्राने/मैत्रिणीने आज डबा आणला नाही.
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
वर्गातील एका विद्यार्थ्याने वर्गात कचरा केला आहे व ते तुम्ही पाहिले.




