Advertisements
Advertisements
Questions
तुमच्या परिसरातील एखाद्या अनुभवी शेतकऱ्याची तुम्हांला मुलाखत घ्यायची आहे. त्यासाठी प्रश्नावली तयार करा.
शेतकऱ्याची मुलाखत घेण्यासाठी दहा प्रश्न तयार करा.
Advertisements
Solution
शेतकऱ्याची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली:
- सर्वप्रथम तुमच्याबद्दल थोडक्यात सांगा.
- तुम्ही कोणत्या विभागात शेती करता?
- तुम्ही कोणत्या प्रकारची शेती करता?
- शेतीचे क्षेत्र किती आहे?
- शेती करताना कोणकोणती कामे करावी लागतात?
- तुम्हांला कधी सुट्टी असते का? असली तर कधी सुट्टी असते?
- तुम्ही वर्षामागे कोणकोणती व किती पिके घेता?
- रसायने, सिंचन, वाहतूक, कर इत्यादी धरून तुमचा एकूण उत्पादन खर्च किती?
- तुम्ही काय भावाने पीक बाजारात विकता? त्यातून किती मोबदला मिळतो?
- सरकारकडून कोणत्या प्रकारचे साहाय्य मिळते?
- तुम्हांला शेतीत कोणते बदल करायचे आहेत?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
रानमेवा कशाला म्हणतात? रानमेव्यात कोणती फळे येतात, याविषयी कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करा.
तुमच्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत ‘हस्ताक्षर सुंदर करूया!’ हे १० दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. त्यात तुम्हांला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्ग शिक्षकांना लिहा.
खालील जाहिरातीचे वाचन व निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

(अ) उत्तरे लिहा.
- जाहिरातीचा विषय -
- जाहिरात देणारे (जाहिरातदार) -
- वरील जाहिरातीत सर्वांत जास्त आकर्षित करून घेणारा घटक -
- जाहिरात कोणासाठी आहे?
(आ) वरील जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी त्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा, असे तुम्हांला वाटते?
(इ) तुमच्या मते जाहिरातीमधील महत्त्वाची वैशिष्ट्ये.

मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा करून ‘जैव विविधतेची गरज’, या विषयावर आठ ते दहा ओळींचा निबंध लिहा.
तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या पर्यटनस्थळाचे वर्णन करणारे पत्र मित्राला/मैत्रिणीला लिहा.
खालील सूचना वाचा. अशा आणखी सूचना तयार करा.
- नदीच्या पाण्यात केरकचरा, निर्माल्य टाकू नये.
- ओला कचरा, सुका कचरा ठेवा वेगवेगळा, तरच प्रदूषणाला बसेल आळा.
दवाखान्याच्या ठिकाणी लावलेल्या पाट्या वाचा. त्या पाट्यांमध्ये आपल्याला सूचना दिलेल्या असतात. या सूचनांव्यतिरिक्त आणखी काही सूचनांच्या पाट्या तुम्ही तयार करा.

शाळेच्या परिसरात स्वच्छताविषयक पाट्या लावायच्या आहेत, तर तुम्ही कोणत्या पाट्या तयार कराल?

‘पाणी हेच जीवन’ यांवर आधारित दहा ओळी लिहा.
तुम्ही एखादा उपक्रम केला असेल, तर त्याबाबतची माहिती मित्राला पत्राने कळवा.
खालील उतारा वाचा. त्या उताऱ्यात पूर्णविराम (.) स्वल्पविराम (,) प्रश्नचिन्ह (?) उद्गारचिन्ह (!) आणि एकेरी अवतरणचिन्ह (‘-’) घाला व उतारा पुन्हा लिहा.
|
एका छोट्याशा गावात एक सधन शेतकरी राहत होता शेतात काम करणाऱ्या दोन बैलजोड्या त्याच्याकडे होत्या तसेच दोन म्हशीही होत्या आणि एक चांगली धष्टपुष्ट आणि पुष्कळ दूध देणारी कपिला नावाची गायही होती त्यामुळे त्याच्या घरी भरपूर दूधदुभते असे ते दूध तो साऱ्या गावात विकत असे. एकदा अशीच सारी गुरे नीट बांधून तो शेतकरी घरात जाऊन झोपला पण सकाळी उठून पाहतो तो त्याची गाय तिथे नव्हती. अगदी कासावीस झाला तो पांढरा आणि तपकिरी रंग असलेली ती गाय त्याची खूप लाडकी होती. लाेक मुद्दाम गाईचे दूध तूप दही नेत असत आता लाेकांना काय सांगणार काय करावे शेवटी तो शेजारच्या गावी दुसरी गाय विकत आणण्यासाठी गेला बाजार गुरांनी भरून गेला होता निरनिराळ्या रंगांच्या धिप्पाड मध्यम आणि बऱ्यापैकी दूध देणाऱ्या अशा अनेक गाई त्याने पाहिल्या गाई बघत तो असाच पुढे जात असताना एका गाईजवळ येऊन तो थांबला अन काय आश्चर्य कपिलेने त्याच्याकडे पाहिले त्याचे ही डोळे चमकले अरे ही तर आपली गाय कपिला नक्कीच या माणसाने त्या दिवशी माझी गाय चोरून नेली असावी आपल्या गाईच्या पाठीवर त्याने प्रेमाने थाप मारली कपिलेने त्याला ओळखले तिने आनंदाने कान व शिंगे हालवली. |
मराठी भाषेत विनोदी लेखन करणाऱ्या लेखकांची व त्यांच्या साहित्याची शिक्षक, पालक यांच्या मदतीने यादी करा. विनोदी गोष्टी वाचा व वर्गात सांगा.
अभ्यासाबरोबरच तुम्हांला इतर कोणत्या गाेष्टी करायला आवडतात? का ते लिहा.
तुमची लाडकी ताई घरात नसली, तर तुम्हांला काय वाटते, ते थोडक्यात सांगा.
सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत तुम्ही कोणकोणते खेळ खेळता?
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
तुमच्या मित्राने/मैत्रिणीने आज डबा आणला नाही.
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
शाळेत पिण्याच्या पाण्याचा नळ कोणीतरी विनाकारण सुरू ठेवला.
