English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

महाराष्ट्रातील प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांविषयीची माहिती आंतरजालावरून मिळवा.

Advertisements
Advertisements

Question

महाराष्ट्रातील प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांविषयीची माहिती आंतरजालावरून मिळवा.

Very Long Answer
Advertisements

Solution

  1. डॉ. मंदाकिनी आमटे: या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाजसेविका असून त्या आनंदवन, चंद्रपूर येथील लोक बिरादरी प्रकल्पासाठी प्रसिद्ध आहेत. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या मंदाताईंनी आपले पती प्रकाश आमटे यांच्यासोबत लोकसेवेचे नि:स्वार्थ कार्य केले आहे. या पती-पत्नींना मॅगेसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
  2. मेधा पाटकर: 'नर्मदा बचाव' आंदोलनाच्या नेत्या म्हणून प्रसिद्ध आहेत. टाटा सामाजिक शास्त्र संस्थेतून एम. ए. झालेल्या मेधा पाटकर यांनी विविध स्वयंसेवी संस्थांमधून काम केले आहे. सिंगूर नंदीग्रामाच्या सहा प्रश्नांवर (नॅनो प्रकल्प) त्यांनी आंदोलन केले होते. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी धरणग्रस्तांसाठी 'नर्मदा बचाव' आंदोलनात झोकून दिले आहे.
  3. सिंधुताई सपकाळ: अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी आयुष्यात अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत, अनाथ मुलांचा सांभाळ करण्याचे समाजकार्य केले आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत.
  4. सावित्रीबाई फुले: महिला शिक्षणाच्या प्रणेती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाईंनी 1848 मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यांच्या या कार्यामुळे महिलांच्या शिक्षणात क्रांतिकारी बदल घडले. 
  5. कमल कुंभार: उद्योजक कमल कुंभार यांनी ग्रामीण महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंपूर्ण बनवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महिलांनी स्वतःचे उद्योग सुरू केले आहेत.
shaalaa.com
लेखन
  Is there an error in this question or solution?
Chapter 10: पंडिता रमाबाई - शोध घेऊया [Page 38]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati Standard 7 Maharashtra State Board
Chapter 10 पंडिता रमाबाई
शोध घेऊया | Q १ | Page 38
Balbharati Integrated 7 Standard Part 3 [Hindi Medium] Maharashtra State Board
Chapter 2.4 पंडिता रमाबाई
शोध घेऊया | Q १ | Page 36
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 7 Maharashtra State Board
Chapter 10 पंडिता रमाबाई
शोध घेऊया | Q १ | Page 35

RELATED QUESTIONS

खालील बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, उत्रौली या शाळेत कला शिबिराचा समारोप संपन्न.

दिनांक: २० डिसेंबर

लोकप्रतिभा

चित्रकला शिबिराचा समारोप

उत्रौली (ता. भोर) : उत्रौली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत दहा दिवसांचे चित्रकला शिबिर नुकतेच संपन्न झाले. १९ डिसेंबर रोजी दुपारी ४.०० ते ६.०० या वेळात शिबिराचा समारोप समारंभ साजरा झाला. या शिबिराची सांगता प्रसिद्ध चित्रकार श्री. अविनाश शिवतरे यांच्या सप्रात्यक्षिक मनोगताने करण्यात आली.

आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व सांगताना प्रत्येकाने कोणती-ना-कोणती कला शिकणे आवश्यक आहे, हा विचार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. समारंभाचे अध्यक्षस्थान उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. सदाशिव शिंदे यांनी भूषवले. कलाशिक्षिका श्रीमती सुनीता सोमण यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले.

या निमित्ताने सर्व पंचवीस शिबिरार्थींच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

(१) कोण ते लिहा.

(अ) समारंभाचे प्रमुख पाहुणे-

(आ) समारंभाचे अध्यक्ष-

(इ) चित्रकला प्रदर्शनास प्रतिसाद देणारे-

(२) उत्तर लिहा.

(अ) शिबिरार्थींची संख्या-

(आ) शिबिरार्थींनी शिबिरात शिकलेली कला-

(इ) शिबिराचे ठिकाण-

(ई) शिबिर सुरू झाले ती तारीख-

(३) वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टींविषयी माहिती दिलेली आहे ते घटक लिहा.


तुम्ही तुमच्या धाकट्या भावासाठी/बहिणीसाठी कोणकोणत्या भेटवस्तू घेता? कोणकोणत्या प्रसंगी घेता?


खालील मुद्द्यांच्या आधारे ‘माझा आवडता खेळ’ या विषयावर आठ ते दहा ओळी निबंध लिहा.


‘तुम्ही पक्षी आहात’, अशी कल्पना करून तुम्हांला स्वच्छंदीपणे कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतील, ते लिहा.


मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा करून ‘जैव विविधतेची गरज’, या विषयावर आठ ते दहा ओळींचा निबंध लिहा.


घाटातून जाताना घ्यायची काळजी याविषयीचे सूचनाफलक तयार करा.


'स' चा शब्दपंखा पूर्ण करा.

१. वर्णमालेतील बत्तीसावे अक्षर.
२. जंगलातील एक भित्रा प्राणी.
३. नेहमी.
४. एक शीतपेय.
५. रस्ता.
६. उत्सव.
७. ढीग या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द. रा...


तुमच्या परिसरातील ज्या घरी पाळीव प्राणी आहेत अशा पाच घरांना भेटी द्या. त्या घरातील लोक पाळीव प्राण्यांची काळजी कशी घेतात याची खालील मुद्‌द्यांच्या आधारे माहिती मिळवा व वर्गात सांगा.


माहिती देण्यासाठी किंवा घेण्यासाठी अनेक साधने वापरली जातात. खाली माहिती देवाणघेवाण करण्याची/संवादाची काही साधने दिली आहेत. त्यांतील काही साधने एकतर्फी व दुतर्फी माहितीची/संवादाची देवाणघेवाण करतात. त्यांची माहिती मिळवा व दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा.

फॅक्स, पत्र, इ-मेल, मोबाइल, आंतरजाल, रेडिओ, वर्तमानपत्र, मोबाइल संदेश, चर्चा, मुलाखत, जाहिरात, भाषण, संभाषण.

एकतर्फी माहितीची/संवादाची साधने दुतर्फी माहितीची/संवादाची साधने
   

              फुलांना रंग कशामुळे प्राप्त होतो?

         फुलांमध्ये दोन प्रकाची रंगद्रव्ये असतात. हरितद्रव्ये, कॅरोटिन यांमुळे नारिंगी, पिवळा, हिरवा हे रंग फुलांच्या पाकळ्यांना मिळतात. लाल, गुलाबी, निळा वगैरे रंग फुलांमधील अँथोसायनीन या रंगद्रव्यामुळे मिळतील. हि रंगद्रवे पाण्यात विरघळू शकतात. ज्या वेळी फुलांना जीवनरसाचा पुरवठा होतो, त्या वेळी त्यात हि रंगद्रव्ये विरघळतात.

         कोणत्या फुलांत कोणती रंगद्रवे असतात, हे त्यांतील गुणसूत्रे ठरवतात आणि गुणसूत्रे आनुवंशिक असल्यामुळे त्या त्या फुलांचा रंग ठरावीकच असतो, तो बदलत नाही.


खालील सूचना वाचा. अशा आणखी सूचना तयार करा.

  • नदीच्या पाण्यात केरकचरा, निर्माल्य टाकू नये.
  • ओला कचरा, सुका कचरा ठेवा वेगवेगळा, तरच प्रदूषणाला बसेल आळा.

तुम्ही एखादा उपक्रम केला असेल, तर त्याबाबतची माहिती मित्राला पत्राने कळवा.


खालील चौकटीत दिलेली अपूर्ण गोष्ट पूर्ण करा.

एकदा काय झालं, आपल्या शरीराचे दोन हात, उजवा आणि डावा एक दिवस चक्क भांडायला लागले. उजवा हात म्हणाला, ‘‘आजपासून मी आराम करणार!’’ मग डावा म्हणाला, ‘‘का, काय झालं? तू का आराम करणार?’’ ‘‘मी मोठा आहे, तुझ्यापेक्षा माझा मान जास्त आहे.’’ उजवा हसून म्हणाला, ‘‘वा!वा! म्हणे मी मोठा आहे. अरे, जा मी तुला मोठा मानतच नाही. अरे माझ्याशिवाय पान हालत नाही माहीत आहे का तुला?’’ उजवा हात म्हणाला. दोन्ही हातांचे बराचवेळ भांडण चालले होते. इतकावेळ शांत बसलेले डोके मग रागाने म्हणाले, ‘‘अरे थांबा हे काय चाललंय? तुमच्या दोघांत चांगले काम कोण करतो हेच मी पाहणार आहे.’’ ‘‘हो! हो! पाहाच!’’ उजवा हात म्हणाला. ‘‘ मी पण तयार आहे.’’ डावा म्हणाला. दोन्ही हात तयार झाले. ‘‘चला तर मग, तो पाहा त्या तिथे एक दगड चिखलात रुतून बसलाय. बघू त्याला कोण बाहेर काढतंय.’’ डोक्याने असे म्हणताच उजवा म्हणाला, ‘‘मी काढणार! माझा पहिला नंबर.’’ तेव्हा डावा म्हणाला, ‘‘जा जा! तुझी किती ताकद आहे.’’ डावा असे म्हणताच मोठ्या ऐटीत उजवा निघाला ____________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________


शब्दांमुळे, भाषेमुळे दैनंदिन व्यवहारात कोणते फायदे होतात, या विषयावर मित्रांशी चर्चा करा.


तुमची लाडकी ताई घरात नसली, तर तुम्हांला काय वाटते, ते थोडक्यात सांगा.


सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत तुम्ही कोणकोणते खेळ खेळता?


खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?

तुमच्या मित्राने/मैत्रिणीने आज डबा आणला नाही.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×