हिंदी

नदी व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

नदी व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.

 

लेखन कौशल
Advertisements

उत्तर

नदी: काय रे झाड दादा. कसा आहेस तू? तब्येतपाणी ठीक ना?
झाड: हो गं नदीताई. तुझ्या कृपेने सारं ठीक आहे. तुझ्या पाण्यात माझी मुळे टाकून मी लागेल तेव्हा निवांत पाणी पीत बसतो. हिरवा हिरवागार राहतो मी , तो तुझ्या मुळेच!
नदी: अरे! तू माझ्या काठी आहेस, म्हणून तुला पाणी मिळतंय बरं! पण दुष्काळी भागातील तुझ्या मित्रांना कुठे रे पाणी मिळेल!
झाड: हो ना! नदीताई, तू जीवनवाहिनी आहेस आमची! तुझ्यामुळेच तर आपला परिसर असा समृद्ध आहे.
नदी: अरे, त्यात माझं कसलं आलंय कौतुक! माझा स्वभाव आहे तो, सतत वाहण्याचा ! त्यामुळे मी झुळझुळ वाहत राहते. जिथे जाते, तिथे पाणी घेऊन जाते.
झाड: तुझ्या असण्याने सर्वांना पाणी मिळतं बघ. तू बारा महिने वाहत असतेस. त्यामुळे लोक, प्राणी-पक्षी सगळे आनंदाने तुझ्याजवळ येतात. तुझे पाणी पिऊन तृप्त होतात. पाण्याचा वापर करतात.
नदी: हं. तूही किती परोपकारी आहेस, झाडदादा. आपल्या प्रत्येक अवयवाचा वापर तू लोकांसाठी, पक्षी-प्राण्यांसाठी करतोस. कोणी तुझ्याशी वाईट वागो किंवा चांगले, तू सतत त्यांना मदतच करतोस.
झाड: अगं ताई, तुझ्याकडूनच तर शिकलो सर्वांना मदत करण्याचा गुण! 'ताई' आहेस तू माझी. छोट्या भावाला चांगले संस्कार देणारी. (दोघेही हसतात.)
shaalaa.com
लेखन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: झुळूक - चला संवाद लिहूया [पृष्ठ ३४]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 9 झुळूक
चला संवाद लिहूया | Q १. | पृष्ठ ३४
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 9 झुळूक (कविता)
चला संवाद लिहूया | Q १. | पृष्ठ २९

संबंधित प्रश्न

खालील उतारा वाचा व त्यास योग्य शीर्षक द्या.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुखदु:खाचे क्षण नेहमीच येत असतात. दु:खाच्या व अडचणीच्या प्रसंगांना जे खिलाडू वृत्तीने सामोरे जातात, जे जिंकण्याच्या उर्मीने हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी स्वयंप्रेरणेने काम करतात, तेच आयुष्यात यश मिळवतात. कोणतीही वाईट परिस्थिती तुम्हांला अडवू किंवा हरवू शकत नाही. वेळप्रसंगी तुम्हांला दोन पावले मागेही टाकावी लागतात; परंतु जर आपण मनानेच हरलो, तर पुढील कार्य पूर्ण करण्यासाठी आपण तयार होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत कायम आपले आपल्या मनावर नियंत्रण असणे आवश्यक असते.

नकारात्मक विचार करण्यापासून आपण स्वत:ला थांबवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या मनाला चांगल्या सवयी लावणेही आवश्यक आहे. आपल्या मनाला चांगली सवय लावणे हे कठीण असले, तरी अशक्य मात्र नक्कीच नाही! आपल्या अंगी असणाऱ्या चांगल्या सवयी, वाईट सवयींना जवळ येऊ देत नाहीत. मनाला चांगल्या विचारांची सवय लावली, तर ती सवय वाईट विचारांपासून तुम्हांला नक्कीच दूर ठेवील.

यासाठी तुम्हांला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. उदा., चांगले वाचन, चांगल्या मित्रमैत्रिणींची संगत, घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी असणारे जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध इत्यादी. जो दुसऱ्याच्यादु:खात नेहमी सहभागी होतो त्यालाच जीवनाचा खरा अर्थ कळतो. मानसिक आधार देऊन, विचारांच्या देवाणघेवाणीतून आपण एकमेकांचे दु:ख सहज हलके करू शकतो.

असे सुखदु:खाचे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात सतत येत असतात मात्र या प्रसंगांना जो धीराने सामोरा जातो, तोच जीवनात यशस्वी होतो.


रानमेवा कशाला म्हणतात? रानमेव्यात कोणती फळे येतात, याविषयी कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करा.


तुमच्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत ‘हस्ताक्षर सुंदर करूया!’ हे १० दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. त्यात तुम्हांला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्ग शिक्षकांना लिहा.


खालील उतारा वाचा. त्याचा तुम्हांला समजलेला अर्थ सारांश रूपाने पुन्हा लिहा.

आपल्यासारख्या सामान्यांना शब्दावाचूनचे संवाद भावणारही नाहीत, की परवडणारही नाहीत. आपल्याला कठीण, साधे, सरळ, वक्र कसे का होईना; पण बोलणे आणि ठणठणीत बोलणेच हवे असते आणि या बोलण्याचे किती अनंत प्रकार असतात. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ अशी म्हण आहे. त्या चालीवर ‘माणसे तितकी बोलणी’ अशी म्हण बनवायला हरकत नाही. ‘मोकळा संवाद’ असे आपण म्हणतो; पण समाजात वावरताना या तथाकथित मोकळ्या संवादावर कशी आणि किती बंधने पडत असतात ते पाहिले म्हणजे गंमत वाटते. मित्रमंडळींशी गप्पा मारताना आपण खूप मुक्त, मोकळे असतो अशी आपली समजूत असते; पण ती खरी असते का? आपणाला एकमेकांचे अनेक गुणदोष, एकमेकांच्या जीवनातले बरेवाईट तपशील ठाऊक असतात; त्यामुळे तिथे कधी मोकळ्या गप्पा होत असल्या, तरी अनेकदा नात्यातल्या जवळिकीमुळेच कधी कधी एक चमत्कारिक अवघडलेपणही अनुभवाला येते. एकमेकांची मते, आग्रह, दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण शिताफीने टाळतो. वृत्तीतल्या हळव्या जागा, स्वाभिमानाची ठिकाणे माहीत असल्यामुळे बोलताना त्यांना कुठे धक्का लागणार नाही, समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही, याची सतत काळजी घ्यावी लागते.

खालील जाहिरातीचे वाचन व निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

(अ) उत्तरे लिहा.

  1. जाहिरातीचा विषय -
  2. जाहिरात देणारे (जाहिरातदार) -
  3. वरील जाहिरातीत सर्वांत जास्त आकर्षित करून घेणारा घटक -
  4. जाहिरात कोणासाठी आहे?

(आ) वरील जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी त्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा, असे तुम्हांला वाटते?

(इ) तुमच्या मते जाहिरातीमधील महत्त्वाची वैशिष्ट्ये.


‘तुम्ही पक्षी आहात’, अशी कल्पना करून तुम्हांला स्वच्छंदीपणे कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतील, ते लिहा.


तुमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणारा सूचनाफलक तयार करा.


खालील चित्रांचे निरीक्षण करा. चित्रातील हे दृश्य पाहून सूचनांचे फलक तयार करा.


तुमच्या परिसरातील एखाद्या अनुभवी शेतकऱ्याची तुम्हांला मुलाखत घ्यायची आहे. त्यासाठी प्रश्नावली तयार करा.


खालील चित्रांचा सहसंबंध लावून गोष्ट तयार करा.


तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या पर्यटनस्थळाचे वर्णन करणारे पत्र मित्राला/मैत्रिणीला लिहा.


‘पर्यावरण संरक्षण’ याविषयी पाठाच्या शेवटी माणसाने केलेली प्रतिज्ञा तुमच्या शब्दांत लिहा.

प्रतिज्ञा

आम्ही आमचे वर्तन बदलू.

__________________

__________________

__________________


मराठी भाषेत विनोदी लेखन करणाऱ्या लेखकांची व त्यांच्या साहित्याची शिक्षक, पालक यांच्या मदतीने यादी करा. विनोदी गोष्टी वाचा व वर्गात सांगा.


‘शब्द’ या विषयावर आधारित सुविचार मिळवा. त्यांचा संग्रह करा. त्याची सुंदर चिकटवही बनवा.


अभ्यासाबरोबरच तुम्हांला इतर कोणत्या गाेष्टी करायला आवडतात? का ते लिहा.


महाराष्ट्रातील प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांविषयीची माहिती आंतरजालावरून मिळवा.


सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत तुम्ही कोणकोणते खेळ खेळता?


खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?

तुमच्या मित्राने/मैत्रिणीने आज डबा आणला नाही.


खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?

वर्गातील एका विद्यार्थ्याने वर्गात कचरा केला आहे व ते तुम्ही पाहिले.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×