Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील जाहिरातीचे वाचन व निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

(अ) उत्तरे लिहा.
- जाहिरातीचा विषय -
- जाहिरात देणारे (जाहिरातदार) -
- वरील जाहिरातीत सर्वांत जास्त आकर्षित करून घेणारा घटक -
- जाहिरात कोणासाठी आहे?
(आ) वरील जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी त्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा, असे तुम्हांला वाटते?
(इ) तुमच्या मते जाहिरातीमधील महत्त्वाची वैशिष्ट्ये.

Advertisements
उत्तर
(अ)
- जाहिरातीचा विषय - जि. प. वरिष्ठ प्राथमिक डिजिटल शाळा पिसगाव येथे प्रवेश
- जाहिरात देणारे (जाहिरातदार) - शाळा व्यवस्थापन समिती पिसगाव
- वरील जाहिरातीत सर्वांत जास्त आकर्षित करून घेणारा घटक - घटक १००% गुणवत्तेची हमी
- इयत्ता पहिली ते आठवीमधील विद्यार्थ्यांसाठी.
(आ) वरील जाहिरातीमध्ये शाळेची वैशिष्ट्ये व विद्यार्थी योजना टॅबच्या आकारात बसवल्यास ते अधिक आकर्षक वाटेल. ‘तंत्रज्ञानाची कास धरत, घडवूया उद्याचा भारत’ असे वाक्य शाळेच्या नावाखाली टाकता येईल. याशिवाय, संपर्क क्रमांक अथवा वेबसाइट नमूद केल्यास संपर्काकरता योग्य माहिती उपलब्ध होईल.
(इ) तुमच्या मते जाहिरातीमधील महत्त्वाची वैशिष्ट्ये:

APPEARS IN
संबंधित प्रश्न
तुमच्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत ‘हस्ताक्षर सुंदर करूया!’ हे १० दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. त्यात तुम्हांला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्ग शिक्षकांना लिहा.
नदी व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.

मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा करून ‘जैव विविधतेची गरज’, या विषयावर आठ ते दहा ओळींचा निबंध लिहा.
तुमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणारा सूचनाफलक तयार करा.
खालील चित्रांचे निरीक्षण करा. चित्रातील हे दृश्य पाहून सूचनांचे फलक तयार करा.


खालील चित्रांचा सहसंबंध लावून गोष्ट तयार करा.
![]() |
![]() |
![]() |
![]() |
तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या पर्यटनस्थळाचे वर्णन करणारे पत्र मित्राला/मैत्रिणीला लिहा.
|
फुलांना रंग कशामुळे प्राप्त होतो? फुलांमध्ये दोन प्रकाची रंगद्रव्ये असतात. हरितद्रव्ये, कॅरोटिन यांमुळे नारिंगी, पिवळा, हिरवा हे रंग फुलांच्या पाकळ्यांना मिळतात. लाल, गुलाबी, निळा वगैरे रंग फुलांमधील अँथोसायनीन या रंगद्रव्यामुळे मिळतील. हि रंगद्रवे पाण्यात विरघळू शकतात. ज्या वेळी फुलांना जीवनरसाचा पुरवठा होतो, त्या वेळी त्यात हि रंगद्रव्ये विरघळतात. कोणत्या फुलांत कोणती रंगद्रवे असतात, हे त्यांतील गुणसूत्रे ठरवतात आणि गुणसूत्रे आनुवंशिक असल्यामुळे त्या त्या फुलांचा रंग ठरावीकच असतो, तो बदलत नाही. |
शाळेच्या परिसरात स्वच्छताविषयक पाट्या लावायच्या आहेत, तर तुम्ही कोणत्या पाट्या तयार कराल?

‘पाणी हेच जीवन’ यांवर आधारित दहा ओळी लिहा.
खालील चौकटीत दिलेली अपूर्ण गोष्ट पूर्ण करा.
|
एकदा काय झालं, आपल्या शरीराचे दोन हात, उजवा आणि डावा एक दिवस चक्क भांडायला लागले. उजवा हात म्हणाला, ‘‘आजपासून मी आराम करणार!’’ मग डावा म्हणाला, ‘‘का, काय झालं? तू का आराम करणार?’’ ‘‘मी मोठा आहे, तुझ्यापेक्षा माझा मान जास्त आहे.’’ उजवा हसून म्हणाला, ‘‘वा!वा! म्हणे मी मोठा आहे. अरे, जा मी तुला मोठा मानतच नाही. अरे माझ्याशिवाय पान हालत नाही माहीत आहे का तुला?’’ उजवा हात म्हणाला. दोन्ही हातांचे बराचवेळ भांडण चालले होते. इतकावेळ शांत बसलेले डोके मग रागाने म्हणाले, ‘‘अरे थांबा हे काय चाललंय? तुमच्या दोघांत चांगले काम कोण करतो हेच मी पाहणार आहे.’’ ‘‘हो! हो! पाहाच!’’ उजवा हात म्हणाला. ‘‘ मी पण तयार आहे.’’ डावा म्हणाला. दोन्ही हात तयार झाले. ‘‘चला तर मग, तो पाहा त्या तिथे एक दगड चिखलात रुतून बसलाय. बघू त्याला कोण बाहेर काढतंय.’’ डोक्याने असे म्हणताच उजवा म्हणाला, ‘‘मी काढणार! माझा पहिला नंबर.’’ तेव्हा डावा म्हणाला, ‘‘जा जा! तुझी किती ताकद आहे.’’ डावा असे म्हणताच मोठ्या ऐटीत उजवा निघाला ____________________________________ _________________________________________________________ _________________________________________________________ _________________________________________________________ _________________________________________________________ _________________________________________________________ _________________________________________________________ |
मराठी भाषेत विनोदी लेखन करणाऱ्या लेखकांची व त्यांच्या साहित्याची शिक्षक, पालक यांच्या मदतीने यादी करा. विनोदी गोष्टी वाचा व वर्गात सांगा.
शब्दांमुळे, भाषेमुळे दैनंदिन व्यवहारात कोणते फायदे होतात, या विषयावर मित्रांशी चर्चा करा.
‘शब्द’ या विषयावर आधारित सुविचार मिळवा. त्यांचा संग्रह करा. त्याची सुंदर चिकटवही बनवा.
तुमची लाडकी ताई घरात नसली, तर तुम्हांला काय वाटते, ते थोडक्यात सांगा.
सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत तुम्ही कोणकोणते खेळ खेळता?
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
तुमच्या मित्राने/मैत्रिणीने आज डबा आणला नाही.
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
शाळेत पिण्याच्या पाण्याचा नळ कोणीतरी विनाकारण सुरू ठेवला.
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
वर्गातील एका विद्यार्थ्याने वर्गात कचरा केला आहे व ते तुम्ही पाहिले.




