हिंदी

रानमेवा कशाला म्हणतात? रानमेव्यात कोणती फळे येतात, याविषयी कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

रानमेवा कशाला म्हणतात? रानमेव्यात कोणती फळे येतात, याविषयी कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करा.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

रानमेवा विशेषत: उन्हाळ्यात बाजारात मिळतो. यामध्ये करवंदे, जांभळे, आवळे, जाम, आंबा, फणस, रायआवळे, ताडगोळे, राजण यांचा समावेश होतो. महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, कोकण, गुजरात सीमेकडील प्रदेशांत रानमेवा मोठ्या प्रमाणावर पिकतो. मुंबई-ठाणे, तसेच डहाणूकडील भागात जांभळे मोठ्या प्रमाणावर होतात. उन्हाळ्यात अंगाची काहिली झाल्यावर ही रसाळ, चटपटीत फळे जिभेचे चोचले पुरवतातच, सोबतच शरीर थंड ठेवण्यासही मदत करतात.

shaalaa.com
लेखन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: माझ्या अंगणात - चर्चा करा. सांगा. [पृष्ठ ८]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 3 माझ्या अंगणात
चर्चा करा. सांगा. | Q १ | पृष्ठ ८
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 3 माझ्या अंगणात (कविता)
चर्चा करा. सांगा. | Q १ | पृष्ठ ३०
बालभारती Integrated 7 Standard Part 1 [Hindi Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.3 माझ्या अंगणात (कविता)
चर्चा करा. सांगा. | Q १ | पृष्ठ ३०

संबंधित प्रश्न

खालील उतारा वाचा. त्याचा तुम्हांला समजलेला अर्थ सारांश रूपाने पुन्हा लिहा.

आपल्यासारख्या सामान्यांना शब्दावाचूनचे संवाद भावणारही नाहीत, की परवडणारही नाहीत. आपल्याला कठीण, साधे, सरळ, वक्र कसे का होईना; पण बोलणे आणि ठणठणीत बोलणेच हवे असते आणि या बोलण्याचे किती अनंत प्रकार असतात. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ अशी म्हण आहे. त्या चालीवर ‘माणसे तितकी बोलणी’ अशी म्हण बनवायला हरकत नाही. ‘मोकळा संवाद’ असे आपण म्हणतो; पण समाजात वावरताना या तथाकथित मोकळ्या संवादावर कशी आणि किती बंधने पडत असतात ते पाहिले म्हणजे गंमत वाटते. मित्रमंडळींशी गप्पा मारताना आपण खूप मुक्त, मोकळे असतो अशी आपली समजूत असते; पण ती खरी असते का? आपणाला एकमेकांचे अनेक गुणदोष, एकमेकांच्या जीवनातले बरेवाईट तपशील ठाऊक असतात; त्यामुळे तिथे कधी मोकळ्या गप्पा होत असल्या, तरी अनेकदा नात्यातल्या जवळिकीमुळेच कधी कधी एक चमत्कारिक अवघडलेपणही अनुभवाला येते. एकमेकांची मते, आग्रह, दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण शिताफीने टाळतो. वृत्तीतल्या हळव्या जागा, स्वाभिमानाची ठिकाणे माहीत असल्यामुळे बोलताना त्यांना कुठे धक्का लागणार नाही, समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही, याची सतत काळजी घ्यावी लागते.

खालील जाहिरातीचे वाचन व निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

(अ) उत्तरे लिहा.

  1. जाहिरातीचा विषय -
  2. जाहिरात देणारे (जाहिरातदार) -
  3. वरील जाहिरातीत सर्वांत जास्त आकर्षित करून घेणारा घटक -
  4. जाहिरात कोणासाठी आहे?

(आ) वरील जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी त्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा, असे तुम्हांला वाटते?

(इ) तुमच्या मते जाहिरातीमधील महत्त्वाची वैशिष्ट्ये.


‘तुम्ही पक्षी आहात’, अशी कल्पना करून तुम्हांला स्वच्छंदीपणे कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतील, ते लिहा.


नदी व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.

 


तुमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणारा सूचनाफलक तयार करा.


घाटातून जाताना घ्यायची काळजी याविषयीचे सूचनाफलक तयार करा.


'स' चा शब्दपंखा पूर्ण करा.

१. वर्णमालेतील बत्तीसावे अक्षर.
२. जंगलातील एक भित्रा प्राणी.
३. नेहमी.
४. एक शीतपेय.
५. रस्ता.
६. उत्सव.
७. ढीग या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द. रा...


तुमच्या परिसरातील ज्या घरी पाळीव प्राणी आहेत अशा पाच घरांना भेटी द्या. त्या घरातील लोक पाळीव प्राण्यांची काळजी कशी घेतात याची खालील मुद्‌द्यांच्या आधारे माहिती मिळवा व वर्गात सांगा.


खालील चित्रांचा सहसंबंध लावून गोष्ट तयार करा.


खालील सूचना वाचा. अशा आणखी सूचना तयार करा.

  • नदीच्या पाण्यात केरकचरा, निर्माल्य टाकू नये.
  • ओला कचरा, सुका कचरा ठेवा वेगवेगळा, तरच प्रदूषणाला बसेल आळा.

‘पर्यावरण संरक्षण’ याविषयी पाठाच्या शेवटी माणसाने केलेली प्रतिज्ञा तुमच्या शब्दांत लिहा.

प्रतिज्ञा

आम्ही आमचे वर्तन बदलू.

__________________

__________________

__________________


‘पाणी हेच जीवन’ यांवर आधारित दहा ओळी लिहा.


तुम्ही एखादा उपक्रम केला असेल, तर त्याबाबतची माहिती मित्राला पत्राने कळवा.


‘शब्द’ या विषयावर आधारित सुविचार मिळवा. त्यांचा संग्रह करा. त्याची सुंदर चिकटवही बनवा.


तुमचा आवडता मित्र/मैत्रीण यांमधील तुम्हांला कोणते गुण सर्वांत जास्त आवडतात?


खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?

तुमच्या मित्राने/मैत्रिणीने आज डबा आणला नाही.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×