English

खालीलपैकी फरक स्पष्ट करा: प्राथमिक सार्वजनिक विक्री (IPO) आणि नंतरची सार्वजनिक विक्री (FPO) - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

Questions

खालीलपैकी फरक स्पष्ट करा:

प्राथमिक सार्वजनिक विक्री (IPO) आणि नंतरची सार्वजनिक विक्री (FPO)

खालील मध्ये फरक स्पष्ट करा:

प्राथमिक भाग विक्री (IPO) आणि पुढील भाग विक्री (FPO)

Distinguish Between
Advertisements

Solution

मुद्दे प्राथमिक सार्वजनिक विक्री नंतरची सार्वजनिक विक्री
अर्थ प्राथमिक सार्वजनिक विक्री म्हणजे असूचिबद्ध सार्वजनिक कंपनीने प्रथमच जनतेला प्रतिभूती देऊ करणे. नंतरची सार्वजनिक विक्री म्हणजे सूचिबद्ध सार्वजनिक कंपनीने भांडवल उभारणीसाठी जनतेला प्रतिभूती देऊ करणे.
जारीकर्ता कंपनीचा प्रकार असूचिबद्ध कंपनीकडून अशा प्रकारच्या भागांची विक्री केली जाते. सूचिबद्ध कंपनीकडून अशा प्रकारच्या भागांची विक्री केली जाते.
कधी जारी केले जातात. जेव्हा एखाद्या विद्यमान कंपनीला जनतेकडून प्रथमच भांडवल उभारणी करायची इच्छा असते तेव्हा या प्रकारे भागांची विक्री केली जाते. जेव्हा एखाद्या सूचिबद्ध कंपनीला जनतेकडून जादा भांडवलाची उभारणी करावयाची आवश्यकता असते तेव्हा या प्रकारे भागांची विक्री केली जाते.
जारी करण्याचा क्रम प्राथमिक सार्वजनिक विक्री ही नंतरच्या सार्वजनिक विक्रीच्या आधी केली जाते. समभागांच्या प्रथमत: केल्या जाणाऱ्या विक्रीस प्राथमिक सार्वजनिक विक्री असे म्हणतात. नंतरची सार्वजनिक विक्री ही नेहमी प्राथमिक सार्वजनिक विक्रीच्या नंतरच केली जाते. नंतरची सार्वजनिक विक्री ही समभागांची दुसऱ्यांदा किंवा त्यानंतरची होणारी समभागांची सार्वजनिक विक्री होय.
सूचिबद्ध प्राथमिक सार्वजनिक विक्रीच्या आधी प्रत्कये कंपनीला स्वत:ला सूचिबद्ध करून घ्यावे लागते. नंतरची सार्वजनिक विक्री करणारी कंपनी ही अगोदरच सूचिबद्ध केलेली असते.
जोखीम ही गुंतवणूकदारासाठी जास्त जोखमीची असते कारण कंपनीच्या कामगिरीचा अंदाज गुंतवणूकदार करू शकत नाही. यामध्ये गुंतवणूकदाराची जोखीम कमी असते कारण कंपनीच्या मागील कामगिरीवरून तिच्या पुढील कामगिरीचे अंदाज बांधता येऊ शकतात.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Board Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×